Devendra Fadnavis on Urban Naxal : विद्यापीठात शहरी नक्षलवाद्यांचा घुसण्याचा प्रयत्न, राष्ट्रप्रेमी नागरिकांनी त्याविरुद्धात लढले पाहिजे - देवेंद्र फडणवीस
Published: May 27, 2023, 12:11 PM


Devendra Fadnavis on Urban Naxal : विद्यापीठात शहरी नक्षलवाद्यांचा घुसण्याचा प्रयत्न, राष्ट्रप्रेमी नागरिकांनी त्याविरुद्धात लढले पाहिजे - देवेंद्र फडणवीस
Published: May 27, 2023, 12:11 PM
पुण्यातील शुभारंभ लॉन्स येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय कार्यकारणी सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरी नक्षलवादाविषयी विधान केले. नक्षलवाद्यांकडे आता शस्त्रे नसले तरी ते शहरी नक्षलवाद्यांच्या मदतीने विद्यापीठात प्रवेश करत असल्याचे प्रतिपादन देवेंद्र फडणवीस यांनी केले.
पुणे : राज्य सरकारकडे आलेल्या माहितीनुसार नक्षलवाद्यांकडे आता शस्त्र नसले तरी शहरी नक्षलवादाच्या माध्यमातून ते विद्यापीठात घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या सर्वाचा विरोध सरकार म्हणून आपल्याला करायचाच आहे. त्याचबरोबर राष्ट्रभक्ती करणाऱ्या नागरिकांनी याचा विचार करून ही चळवळ मोठी केली पाहिजे, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात व्यक्त केले.
इतिहास पुन्हा नव्याने शिकवण्याची गरज : पुण्यातील शुभारंभ लॉन्स येथे आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची राष्ट्रीय कार्यकारणी सभा आयोजित करण्यात आली होती. त्या सभेच्या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकारणी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून उद्योजक बाबा कल्याणी, माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. याचबरोबर देशभरातील राष्ट्रीय कार्यकारिणीचे सर्व सदस्य विद्यार्थी परिषदेचे सर्व कार्यकर्ते, पुणे शहराचे विद्यार्थी परिषदेचे अनिल ठोंबरे हे उपस्थित होते.
युवा देश घडवतील : ज्या-ज्या वेळी लोकांना शास्त्रीय इतिहास माहीत झाला. त्या- त्या वेळी त्या-त्या देशाने प्रगती केली, मग ती रशिया असो जपान असो. यामुळे परत एकदा आपल्याला या सगळ्या उत्खननामध्ये आपली संस्कृती आपला इतिहास माहिती होत आहे. तोच इतिहास पुन्हा आपल्याला भारतामध्ये रुजवायचा आहे. त्यासाठी समोर बसलेले सगळे युवा कार्यकर्ते यांच्याकडे आता देश घडवण्याची जबाबदारी आहे आणि ते नक्की, करतील असा आशावाद सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला. जगामध्ये भारताची प्रतिमा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी केलेली आहे. जेव्हा ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सही घेण्यासाठी थांबतात, जगातल्या अनेक राष्ट्राचे राष्ट्राध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आल्यानंतर उभे राहून त्यांचे स्वागत करतात, मिठी मारतात. भारताची एक वेगळी ओळख जगामध्ये तयार झालेली आहे. आता भारत समृद्ध झालेला आहे, परंतु काही भारतविरोधी शक्ती आपल्याविरोधात उभा ठाकल्या आहेत. त्या देशाबाहेरच नाही तर देशात सुद्धा आहेत. त्या सगळ्यांबरोबर आपल्याला लढायचे आहे आणि भारत समृद्ध करायचा आहे. ती समृद्ध करण्याची जबाबदारी जेवढी आमच्या पिढीची आहे, तेवढीच माझ्यासमोर बसलेल्या नव्या पिढीची आहे. तोच आशावाद घेऊन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद काम करत आहे असेही देवेंद्र फडवणीस म्हणाले.
नेतृत्त्व तयार करते विद्यार्थी परिषद : विद्यार्थी परिषद ही अशी संघटना आहे, ज्यामुळे आपल्यातले नेतृत्व गुण तयार होतात. विद्यापीठ स्तरावर मी विद्यार्थी परिषदेत काम करत असताना वेगवेगळे आंदोलन विद्यापीठात होत होते. परंतु ज्या वेळेस काश्मीरच्या लाल चौकामध्ये कोणीही तिरंगा फडकवत नव्हते कोणी हिंमत करत नव्हते, त्यावेळेस विद्यार्थी परिषदेने हे काम नेटाने केले. त्याचा भाग मला होता आले याचा मला आनंद आहे. तेव्हापासून माझी नेतृत्व क्षमता वाढीला लागली ,एक वेगळे नेतृत्व तयार झाले असे देवेंद्र फडवणीस यावेळी म्हणाले.
भारत एक अशी संस्कृती आहे जी 10 हजार वर्षांपूर्वी सुद्धा अस्तित्वात होती. ती एक समृद्ध संस्कृती होती. परंतु स्वातंत्र्यानंतर सुद्धा काही मेकाले भारतात राहिले आणि त्यांनी आपल्यापासून खरा इतिहास बाजूला ठेवला. तो इतिहास पुन्हा नव्याने शिकवण्याची गरज आहे - देवेंद्र फडवणीस
हेही वाचा -
