ETV Bharat / bharat

Odisha Goods Train Derailed : सोसाट्याच्या वाऱ्याने ओडिशात मालगाडी घसरली रुळावरून, 6 मजुरांचा मृत्यू

author img

By

Published : Jun 7, 2023, 6:37 PM IST

Updated : Jun 7, 2023, 7:08 PM IST

Odisha Goods Train Derailed
ओडिशात मालगाडी रुळावरून घसरली

ओडिशातील जाजपूर रोड रेल्वे स्थानकावर काही मजूर मालगाडीच्या खाली आले. या घटनेत आत्तापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

जाजपूर (ओडिशा) : बालासोरच्या घटनेनंतर ओडिशातील जाजपूर रोड रेल्वे स्टेशनवर रेल्वेचा आणखी एक अपघात झाला. येथे एक मालगाडी जोरदार वाऱ्यामुळे रुळावरून घसरली. या अपघातात मालगाडीच्या खाली आश्रयास असलेले 6 मजूर ठार झाले.

तिघांचा जागीच मृत्यू : प्राथमिक माहितीनुसार, ही मालगाडी जाजपूर रेल्वे स्थानकावर इंजिनशिवाय उभी होती. मात्र नॉर्वेस्टरच्या प्रभावामुळे जोरदार वादळ आले, जे टाळण्यासाठी काही मजूर मालगाडीखाली बसले. मात्र जोरदार वाऱ्यामुळे एक बोगी पुढे सरकली आणि त्याखाली बसलेले मजूर अडकले. अशाप्रकारे प्रथम तिघांचा जागीच मृत्यू झाला. नंतर मृतांची संख्या 6 झाली.

मध्य प्रदेशातही मालगाडीचे डबे घसरले : मध्य प्रदेशातील जबलपूर रेल्वे विभागात मालगाडीचे दोन तेलाचे टँकर रुळावरून घसरले. घटनास्थळी मदतीचे कार्य सुरु आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी राहुल श्रीवास्तव यांनी सांगितले की, मंगळवारी रात्री तेलाचे टँकर रुळावरून घसरले. यावेळी मालगाडी भिटोनी रेल्वे स्थानकाजवळील तेल डेपोच्या साइडिंग लाइनवर होती. आज सकाळी सूर्योदयानंतर मदत कार्याला सुरुवात झाली, असे ते म्हणाले. साइडिंग लाईनवर ही घटना घडली असल्याने, जबलपूर - इटारसी सेक्शनवरील मुख्य रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर त्याचा परिणाम झाला नाही, असे ते म्हणाले.

रेल्वेच्या अपघातांमध्ये वाढ : 5 जून रोजी बारगडमधील मेंधापली येथे मालगाडी रुळावरून घसरली होती. भाटली ब्लॉकमधील सांबरधाराजवळ चुनखडीने भरलेल्या मालगाडीचे पाच डबे रुळावरून घसरले. मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. त्यानंतर 6 जून रोजी गंजम जिल्ह्यातील ब्रह्मपूर रेल्वे स्थानकावर आलेल्या सिकंदराबाद - अगरतळा एक्स्प्रेस ट्रेनमध्ये धूर निघताना दिसला. शॉर्ट सर्किटमुळे ट्रेनला आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाचा :

  1. Odisha Train Accident : ओडिशा रेल्वे अपघात, सीबीआयने दाखल केला एफआयआर
  2. Neha Singh Rathore : ओडिशा ट्रेन अपघातावर लोकगायिका नेहा सिंग राठौरनेचे नवीन गाणे ट्विटवर व्हायरल
  3. Odisha Train Accident : 51 तासानंतर बालासोर अपघातस्थळावरून रेल्वे रवाना, बेवारस मृतदेहाबाबत बोलताना रेल्वेमंत्र्यांना कोसळले रडू
Last Updated :Jun 7, 2023, 7:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.