ETV Bharat / bharat

२०२४ मध्ये मोदी सरकारची सत्ता येण्याची जनतेची इच्छा - एकनाथ शिंदे

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 15, 2023, 4:30 PM IST

Maharashtra cm eknath shinde
एकनाथ शिंदे

राजस्थानचे नवे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जयपूरला गेले आहेत. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, 2024 मध्ये मोदी सरकारची पुनरावृत्ती होणार आहे, त्याची सुरुवात तीन राज्यात विजयाने झाली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जयपूर : राजस्थानचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या शपथविधी सोहळ्याला हजेरी लावण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जयपूरमध्ये गेले आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना २०२४ मध्ये पुन्हा मोदी सरकार येईल, असा विश्वास व्यक्त केला. याची सुरुवात तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमधून झाल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होण्याची हमी : जयपूरमधील रामनिवस बागमधील अल्बर्ट हॉलच्या बाहेर भजनलाल शर्मा यांचा शपथविधी झाला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, आजचा दिवस खूप आनंदाचा दिवस आहे. भजनलाल शर्मा यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे. २०२४ मध्ये मोदी सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे. याची गॅरंटी झालेली आहे. जयपूर विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राजस्थानमधील जनतेनं भाजपावर पुन्हा विश्वास दाखवला आहे. राजस्थान आणि महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन करतो. दोन्ही राज्यातील लोकांनी मोदी यांना पंतप्रधान होण्याची गॅरंटी दिली आहे. देशाची प्रगती करण्याचं जनतेनं ठरवलय. संपूर्ण देशात भारताचं आदरानं नाव घेतलं जातं. २०२४ मध्ये मोदी सरकार पुन्हा यावे, अशी जनतेची इच्छा आहे. याची सुरुवात राजस्थान, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशमधील जनतेनं केली आहे.

शपथविधीनिमित्त एनडीएचं शक्तिप्रदर्शन : जयपूरच्या रामनिवास बागेतील ऐतिहासिक अल्बर्ट हॉलसमोर होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच इतर अनेक राजकीय व्यक्ती सहभागी झाले होते. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राजनाथ सिंह, गजेंद्र सिंह शेखावत, अर्जुन राम मेघवाल, नितीन गडकरी, जेपी नड्डा, मनसुख मांडविय, रामदास आठवले, कैलाश चौधरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, मध्य प्रदेशचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री मोहन यादव, छत्तीसगडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री विष्णू देव साई यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले. भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह एकूण 18 लोक या समारंभाला राज्य पाहुणे म्हणून उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. देशपातळीवर विरोधकांची इंडिया आघाडी! मात्र पुण्याच्या जागेबाबत आघाडीत बिघाडी, तर महायुतीत देखील अनेक दावेदार
  2. देशपातळीवर विरोधकांची इंडिया आघाडी! मात्र पुण्याच्या जागेबाबत आघाडीत बिघाडी, तर महायुतीत देखील अनेक दावेदार
  3. शिवसेना आमदार अपात्र प्रकरण; निर्णय घेण्यासाठी राहुल नार्वेकरांना मुदतवाढ, वाचा नवीन तारीख काय
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.