ETV Bharat / bharat

Urination On Tribal Man : भाजप नेत्याचे किळसवाणे कृत्य!, दारुच्या नशेत आदिवासी व्यक्तीच्या चेहऱ्यावर केली लघुशंका

author img

By

Published : Jul 4, 2023, 10:49 PM IST

मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यातून एक लाजिरवाणा व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये एक तरुण मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीच्या चेहऱ्यावर लघुशंका करताना दिसत आहे. हा तरुण हा भाजपचा नेता असल्याचे कॉंग्रेसने म्हटले आहे.

Urination On Tribal Man
आदिवासी व्यक्तीवर लघवी

पहा व्हिडिओ

सीधी (मध्य प्रदेश) : असे म्हणतात की, सत्तेची नशा डोक्यात गेली की माणूस काहीही करू लागतो. मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात माणुसकीला लाजवेल असा एक प्रकार समोर आला आहे. येथे भाजपच्या तथाकथित नेत्याने एका आदिवासी तरुणाच्या चेहऱ्यावर लघवी केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सीधी जिल्ह्यातील भाजपचे आमदार पंडित केदारनाथ शुक्ला यांचे प्रतिनिधी प्रवेश शुक्ला यांचा असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या प्रकरणावरून आता राजकारण तीव्र झाले आहे.

मानसिकदृष्ट्या आजारी आदिवासीवर लघवी : हा व्हिडिओ सुमारे 9 दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. सीधी जिल्ह्यातील कुबरी बाजार येथे हा मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्ती बसला होता. तेथे प्रवेश शुक्लाने नशेच्या अवस्थेत त्याच्यावर लघवी केली. मिळालेल्या माहितीनुसार, कुबरी गावचा रहिवासी असलेला प्रवेश शुक्ला हा माजी आमदाराचा प्रतिनिधी होता. सध्या तो भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आहे. माहितीनुसार, दशमत रावत (36) असे पीडित व्यक्तीचे नाव आहे. तो साधी जिल्ह्यातील करौंडी गावचा रहिवासी आहे.

  • मेरे संज्ञान में सीधी जिले का एक वायरल वीडियो आया है...

    मैंने प्रशासन को निर्देश दिए हैं कि अपराधी को गिरफ्तार कर कड़ी से कड़ी कार्रवाई कर एनएसए भी लगाया जाए।

    — Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) July 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे ट्विट : हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान ट्विट केले आहे. त्यांनी प्रशासनाला दोषीला अटक करून त्याच्यावर एनएसए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यास सांगितले. शिवराज सिंह यांनी ट्विट केले की, 'सीधी जिल्ह्याचा एक व्हायरल व्हिडिओ माझ्या निदर्शनास आला आहे. मी प्रशासनाला दोषीला अटक करून कठोर कारवाई करण्याचे आणि NSA लादण्याचे निर्देश दिले आहेत.

पोलीस काय म्हणाले? : याच प्रकरणाबाबत अतिरिक्त एसपी सिद्धी अंजुलता पटले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, 'व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आम्ही या व्हिडिओतील व्यक्ती कोण होती याचा तपास करत आहोत'. दुसरीकडे, या व्हिडिओबाबत आमदार पंडित केदारनाथ शुक्ला यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या व्हिडिओमधील व्यक्ती प्रवेश शुक्ला असल्याचे स्पष्ट नाकरले. प्रवेश शुक्ला याच्यावर एससी - एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

  1. Bihar Man Lick Spit : बिहार पोलिसांचे लाजिरवाणे कृत्य, तरुणाला मारहाण करत थुंकी चाटायला लावली ; हे आहे कारण
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.