ETV Bharat / bharat

बेपत्ता विमानाचे बंगालच्या उपसागरात आढळले अवशेष; लक्ष्मीकांत त्रिपाठीच्या घरावर कोसळला दु:खाचा डोंगर

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 14, 2024, 9:18 AM IST

AIR Force Plane : बंगालच्या उपसागरात साडेसात वर्षापूर्वी बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष मिळाले आहेत. या विमानात असलेल्या प्रयागराजच्या लक्ष्मीकांत त्रिपाठी यांचा समावेश होता.

AIR Force Plane
लक्ष्मीकांत त्रिपाठी यांचे आई वडील

लखनऊ AIR Force Plane : भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष बंगालच्या उपसागरात मिळाले आहेत. हे विमान साडेसात वर्षापूर्वी बेपत्ता झालं होतं. या विमानात 29 जण प्रवास करत होते. प्रयागराज इथल्या राजगुरुपूरच्या लक्ष्मीकांत त्रिपाठी या विमानात प्रवास करत होते. मात्र विमानाचं अवशेष बंगालच्या उपसागरात मिळाल्याचं वृत्त समजताच त्यांचं कुटुंबीय शोकाकूल झालं आहे.

बेपत्ता विमानाचे बंगालच्या उपसागरात आढळले अवशेष

लक्ष्मीकांत त्रिपाठी भारतीय वायूसेनेत होते तैनात : भारतीय हवाई दलाचं विमान एएन 32 हे विमान साडेसात वर्षापूर्वी बेपत्ता झालं होतं. याविमानात प्रयागराज इथल्या लक्ष्मीकांत त्रिपाठी यांचा समावेश होता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशन टेक्नॉलॉजीच्या ऑटोनॉमस अंडरवॉटर व्हेईकलनं (एयूव्ही) घेतलेल्या छायाचित्रांवरून वामानाच्या अवशेषांची माहिती उघड झाली आहे. या विमानाचे अवशेष चेन्नईच्या किनाऱ्यापासून 310 किमी अंतरावर समुद्रात आढळून आले आहेत. विमानाचे अवशेष आढळून आल्याची माहिती लक्ष्मीकांत त्रिपाठी यांच्या आई-वडिलांना समजताच त्यांना अश्रू अनावर झाले. "लक्ष्मीकांत 2012 मध्ये भारतीय वायुसेनेत अंदमान निकोबारमध्ये तैनात होता. यानंतर 2016 मध्ये सुट्टी घेऊन लक्ष्मीकांत त्रिपाठी घरी आला होता. विमान अपघात होण्याच्या दोन दिवस आधी लक्ष्मीकांत घरुन निघाला होता. त्याची LAC पोस्टवर नियुक्ती करण्यात आल्याचं त्यानं आम्हाला सांगितलं होतं." अशी माहिती लक्ष्मीकांत त्रिपाठीच्या आईनं दिली.

मुलगा परत येण्याची होती अपेक्षा : भारतीय हवाई दलाचं विमान 22 जुलै 2016 रोजी बंगालच्या उपसागरात बेपत्ता झाल्याची माहिती लक्ष्मीकांत त्रिपाठी यांच्या कुटुंबीयांना मिळाली होती. मात्र त्यानंतर त्यांना मुलगा परत येण्याची अपेक्षा होती. शुक्रवारी विमानाचे अवशेष मिळाल्यानं त्यांच्या कुटुंबीयांना शोक अनावर झाला. त्यांचा मुलगा परत येईल, अशी त्यांना अपेक्षा असल्याचं त्यांचे वडील शोक करताना सांगत आहेत. लक्ष्मीकांत हे त्यांच्या कुटुंबीयांचा सर्वात मोठा मुलगा होता. भारतीय हवाई दलाचं एएन 32 हे विमान बंगालच्या उपसागरात बेपत्ता झालं होतं. या विमानात हवाई दलाचे 29 कर्मचारी होते. या विमानाच्या शोधासाठी मोहीम राबवण्यात आली. मात्र त्याचा कुठंही शोध लागला नाही.

हेही वाचा :

  1. ज्योतिरादित्य सिंधियांकडून पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनलची पाहणी
  2. Training Aircraft Crashed : बारामतीजवळ प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं; एकजण जखमी
  3. चक्क उड्डाणपुलाखाली अडकले विमान, फोटो घेण्यासाठी लोकांची गर्दी; पाहा व्हिडिओ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.