ETV Bharat / bharat

Top News Today : एका क्लिकवर जाणून घ्या, आजच्या महत्त्वाच्या बातम्या

author img

By

Published : Dec 27, 2022, 7:06 AM IST

देशभरासह राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर (Top News Today ) वाचा. आज दिवसभरात आजच्या महत्त्वाच्या घटना काय असतील ते जाणून घेवू (Top News Today in Marathi) या. कथित गायरान जमीन घोटाळाप्रकरणी अब्दुल सत्तार विधानसभेत आरोपांना उत्तर देण्याची शक्यता आहे. अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस आहे. आज तुनिषा शर्माच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Top News Today
आजच्या महत्त्वाच्या बातम्या

मुंबई : आज हिवाळी अधिवेशनाचा आठवा दिवस (Top News Today) आहे. आज अब्दुल सत्तार विधानसभेत विरोधकांतच्या आरोपांना उत्तर देण्याची शक्यता आहे. आज तुनिषा शर्माच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तसेच आज वंचित बहुजन आघाडीचा नागपुरात इशारा मोर्चा निघू (Top News in Marathi) शकतो.

हिवाळी अधिवेशनाचा आजचा आठवा दिवस : आज हिवाळी अधिवेशनाचा आठवा दिवस ( eighth day of winter session) आहे. काल उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरुन विधानपरिषदेत शिंदे सरकारवर हल्लाबोल केला. तसेच केंद्रशासित प्रदेशासाठी महाराष्ट्रानं ठराव मंजूर केला पाहिजे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आज सरकारकडून महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावरुन ठराव मांडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले (Top News Today in Marathi) आहे.

आज अब्दुल सत्तार विधानसभेत देणार आरोपांना उत्तर : कथित गायरान जमीन घोटाळाप्रकरणी सत्तारांनी (Abdul Sattar Gayran land scam case) राजीनामा द्यावा, अशी मागणी महाविकास आघाडीने केली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. दिलीप वळसे पाटील आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीही अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या प्रकरणात अब्दुल सत्तार आज विधानसभेत उत्तर देणार आहेत.

आज तुनिषा शर्मावर अंत्यसंस्कार : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माचे (Tunisha Sharma Funeral) पार्थिव आज मीरा रोडवर तिच्या निवासस्थानी नेण्यात येणार आहे. आज दुपारनंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

आज वंचित बहुजन आघाडीचा नागपुरात इशारा मोर्चा : आज नागपूर- वंचित बहुजन आघाडीचा (MVA Warning march in Nagpur) नागपुरात इशारा मोर्चा असून प्रकाश आंबेडकर स्वतः या मोर्चाचं नेतृत्व करणार आहेत. हा मोर्चा यशवंत स्टेडियम वरून विधानभवनाच्या दिशेने निघेल. महापुरुषांचा अपमान, गायरान जमिनीचा प्रश्न, शेती उत्पन्नाला हमीभाव आदी मागण्यांसाठी हा मोर्चा निघणार (Marathi news) आहे.

आज भाजपचे आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयात : आज नागपूर- विधिमंडळचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सकाळी 8 वाजता भाजपचे सर्व आमदार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबाग कार्यालयात जाणार (BJP MLAs at Reshimbagh office) आहेत. त्याठिकाणी आमदार आद्य सरसंघचालक डॅा. हेडगेवार यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेणार आहेत. या वेळी संघाचे नेते भाजपच्या आमदारांना मार्गदर्शन करत संघाच्या कार्याची माहिती देणार आहेत.

आरोग्य सुविधांच्या पडताळणीसाठी आज मॉक ड्रील : आज देशभरातील सर्व आरोग्य सुविधांच्या पडताळणीसाठी मॉक ड्रील (Mock drill for verification of health facilities) आयोजित करण्यात आली आहे. मॉक ड्रीलचा उद्देश कोविड वाढला तर त्याचं व्यवस्थापन व्यवस्थित करता यावे हाच आहे.

बडनेरामध्ये आज कालीचरण महाराजांची सभा : आज अमरावतीतील बडनेरामध्ये कालीचरण महाराजांची सभा (Meeting of Kalicharan Maharaj) होणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजप प्रवक्ता शिवराय कुलकर्णी राहणार आहेत. या कार्यक्रमाला विश्व हिंदू परिषद बजरंग दल, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान, श्रीराम सेना, भारत रक्षा मंच आणि हिंदू जनजागृती समितीने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.