ETV Bharat / bharat

Bageshwar Dham Sarkar : बागेश्वर धामचे सत्य आले समोर, बाबांनी स्वीकारले आव्हान.. करून दाखवला 'असा' चमत्कार

author img

By

Published : Jan 20, 2023, 1:44 PM IST

मध्य प्रदेशातील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्र शास्त्री लोकांनी न सांगता त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचा दावा करतात. त्यांच्या या ज्ञानाला नागपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिले होते. त्यानंतर आता बाबांनी त्यांचे आव्हान स्वीकारले आहे.

Bageshwar Dham Sarkar
बागेश्वर सरकार

रायपुर (छत्तीसगड) : बागेश्वर धाम मध्य प्रदेशातील छतरपूर जवळ आहे. तेथील बाबा धीरेंद्र शास्त्री हे परमात्म्याच्या नावाने दरबार भरवत असतात. या दरबारात ते कथाही सांगतात आणि लोकांच्या समस्या सोडवण्याचा दावा करतात.

BAGESHWAR DHAM SARKAR DHIRENDRA SHASTRI
बाबा धीरेंद्र शास्त्री हे परमात्म्याच्या नावाने दरबार भरवत असतात
BAGESHWAR DHAM SARKAR DHIRENDRA SHASTRI
या दरबारात ते कथा सांगतात

याठिकाणी लोक त्यांच्या समस्या घेऊन येतात. धीरेंद्र शास्त्री हे लोकांच्या समस्या कागदावर लिहून देतात. या समस्यांवर ते उपायही सांगत असल्याचे कळते. धीरेंद्र शास्त्रींना हनुमानजी आणि त्यांच्या दिवंगत आजोबांचा इतका आशीर्वाद लाभला की, त्यांना दैवी अनुभूती जाणवू लागली आणि त्यांनी लोकांच्या दु:ख दूर करण्यासाठी आजोबांप्रमाणे 'दिव्य दरबार' आयोजित करण्यास सुरुवात केली. धीरेंद्र शास्त्री सांगतात की, त्यांनी हनुमानजी आणि सिद्ध महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन घेतले आहे. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांनी हनुमानजी बालाजी सरकारची भक्ती, सेवा, ध्यान आणि उपासना सुरू केली. या साधनेचा त्यांच्यावर इतका परिणाम झाला की बालाजींच्या कृपेने त्यांना लोकांचे विचार कळू लागले, असे म्हणतात.

BAGESHWAR DHAM SARKAR DHIRENDRA SHASTRI
तसेच ते लोकांच्या समस्या सोडवण्याचा दावा करतात
BAGESHWAR DHAM SARKAR DHIRENDRA SHASTRI
धीरेंद्र शास्त्री हे लोकांच्या समस्या कागदावर लिहून देतात.

बागेश्वर धाममध्ये मंगळवारी अर्ज केला जातो. अर्ज करण्यासाठी लोक आपली इच्छा सांगून लाल कपड्यात नारळ बांधतात, तो नारळ येथे एका ठिकाणी बांधतात आणि रामनामाचा जप करतात आणि मंदिराची 21 परिक्रमा करतात. बागेश्वर धाम मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील गाडा गावात आहे. येथे हनुमानजीचे मंदिर आहे. या मंदिराजवळ धीरेंद्र कृष्णाचे आजोबा आणि गुरुजींची समाधी बांधलेली आहे. येथे लोक मंगळवारी येथे येतात आणि त्यांच्या समस्या अर्ज करून मांडतात. बागेश्वर धाममध्येच भव्य दरबार भरवला जातो.

BAGESHWAR DHAM SARKAR DHIRENDRA SHASTRI
धीरेंद्र शास्त्री सांगतात की, त्यांनी हनुमानजी आणि सिद्ध महाराजांचे प्रत्यक्ष दर्शन घेतले आहे.
BAGESHWAR DHAM SARKAR DHIRENDRA SHASTRI
बाबांचे हे कार्य विज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्यांना अंधश्रद्धा वाढवणारे वाटते.

पंडित धीरेंद्र शास्त्री दरबारातील कोणालाही नावाने हाक मारतात आणि ती व्यक्ती त्यांच्यापर्यंत पोहोचते तेव्हा शास्त्रीजी त्यांचे नाव आणि पत्ता एका कागदावर त्यांच्या समस्या आणि उपायांसह लिहितात. बागेश्वर धाममध्ये केलेला अर्ज कधीच चुकत नाही, अशी लोकांची धारणा आहे. पंडित धीरेंद्र शास्त्री लोकांनी न सांगता त्यांच्या समस्या जाणून घेतल्याचा दावा करतात. त्यांच्या या ज्ञानाला नागपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आव्हान दिले होते. त्यानंतर आता बाबांनी त्यांचे आव्हान स्वीकारले आहे.

BAGESHWAR DHAM SARKAR DHIRENDRA SHASTRI
बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्रीच्या नावाची केवळ भारतातचं नाही तर जगभरात मोठी चर्चा आहे.
BAGESHWAR DHAM SARKAR DHIRENDRA SHASTRI
धीरेंद्र शास्त्री भोपाळच्या खासदार प्रज्ञा ठाकूर सोबत

बाबांचे हे कार्य विज्ञानावर विश्वास ठेवणाऱ्यांना अंधश्रद्धा वाढवणारे वाटते. या त्यांच्या दरबारात येणाऱ्या लोकांनी बाबांना न विचारता त्यांच्या समस्या दाखवण्यास सांगितले आहे. चमत्कार सिद्ध केल्यास समितीने 30 लाखांची ऑफरही दिली आहे. मात्र समितीची ३० लाखांची ऑफरही त्यांनी नाकारली आहे. त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मोफत देणार असल्याचे त्यांनी सांगितले. समितीच्या सदस्यांना 20 आणि 21 जानेवारी रोजी रायपूर येथे होणाऱ्या दरबारात त्यांनी बोलावले आहे.

महाराजांवर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पोलिसांकडे केली आहे

छत्तीसगड राज्यातील रायपूरमध्ये 20 आणि 21 जानेवारीला बागेश्वर धामचा दिव्य दरबार भरवला जाणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना दरबारात आमंत्रित करण्यात आल्याची माहिती पंडित धीरेंद्र कुमार शास्त्रींनी दिली आहे. मात्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून ही शक्यता फेटाळून लावली आहे. दावा सिद्ध करण्यासाठी एका त्रयस्थ ठिकाणची गरज आहे. नागपूर हे पोल खोल शहर असल्याने त्यांनी नागपुरात येऊन आपला दावा सिद्ध करावा.

BAGESHWAR DHAM SARKAR DHIRENDRA SHASTRI
धीरेंद्र शास्त्रीं सोबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी
BAGESHWAR DHAM SARKAR DHIRENDRA SHASTRI
बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री

फ्रॉड अँड प्रूफ कंडिशन अंतर्गत पंडित धीरेंद्र कृष्णा शास्त्री यांनी दिव्यशक्ती सिद्ध करून दाखवल्यास मी स्वतः त्यांच्या पायावर डोके ठेवून जाहीर माफी मागेल आणि 40 वर्षांत जी संस्था अंधश्रद्धा निर्मूलन समिती उभी केलेली आहे, ती क्षणात बंद करेल असे देखील श्याम मानव म्हणाले. बागेश्वर धामचे मुख्य पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्री हे पळपुटे आहेत. त्यांनी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर आयोजित रामकथा नियोजित वेळेत पूर्ण न करता दोन दिवसांआधीच गुंडाळून पळ काढल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला होता. तेव्हापासूनचं पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीत सुरू झालेला वाद रोज नवनवीन वळण घेत आहे.

BAGESHWAR DHAM SARKAR DHIRENDRA SHASTRI
बागेश्वर धाम सरकार या नावाने प्रसिद्ध आहेत धीरेंद्र शास्त्री
BAGESHWAR DHAM SARKAR DHIRENDRA SHASTRI
त्यांच्यावर अंधश्रद्धा पसरवण्याचे आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे

गेल्या आठवड्यात म्हणजेच ५ ते १३ जानेवारी दरम्यान नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर बागेश्वर धामचे मुख्य पंडित धीरेंद्र कृष्णशास्त्री यांच्या रामकथा पाठचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सोशल मीडियावरील अनेक प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांचा मुक्काम नागपुरात नऊ दिवस असून त्यांच्या दरबारात हजेरी लावण्यासाठी आणि रामकथा ऐकण्यासाठी देशाच्या प्रत्येक भागातून लोक आले होते. सर्वाधिक गर्दी मध्यप्रदेशातून आलेल्या लोकांची होती. परंतु, १३ जानेवारी ऐवजी ११ जानेवारीलाचं कथेचा समारोप करण्यात आला.

BAGESHWAR DHAM SARKAR DHIRENDRA SHASTRI
बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री
BAGESHWAR DHAM SARKAR DHIRENDRA SHASTRI
क्रिकेट खेळताना धीरेंद्र शास्त्री

रामकथा सुरू असताना धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी अनेकांना त्यांच्या व्यासपीठावर आमंत्रित केले. त्यानंतर त्या व्यक्तीने काहीही सांगण्याच्यापूर्वी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी व्यासपीठावर आलेल्या व्यक्तीच्या जीवनातील समस्या आणि प्रश्न एका कागदावर लिहून काढल्या. इथूनच खरा वाद सुरू झाला. बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र शास्त्रींनी 'रामकथेच्या नावाने' अंधश्रद्धेचा खेळ सुरू केला, असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव आणि त्याच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. श्याम मानव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे उत्तर न देताच महाराजांनी नागपुरातून काढता पाय घेतला, असे आरोप सुरू झाले.

BAGESHWAR DHAM SARKAR DHIRENDRA SHASTRI
बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री
BAGESHWAR DHAM SARKAR DHIRENDRA SHASTRI
बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री

मध्यप्रदेशच्या छतरपूर येथील बागेश्वर धाम आणि धीरेंद्र कृष्ण शास्त्रीच्या नावाची केवळ भारतातचं नाही तर जगभरात मोठी चर्चा आहे. नागपुरात रामकथेच्या नावाने धीरेंद्र शास्त्री यांनी जादूटोणा आणि अंधश्रद्धा पसरवण्याचे काम केल्याचा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव यांनी केला. 'दिव्य दरबार' आणि 'प्रेत दरबार'च्या नावाखाली जादूटोण्याला प्रोत्साहन दिले जात आहे. या शिवाय देव-धर्माच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट, फसवणूक, पिळवणूक होत असून, महाराजांवर कारवाई करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून पोलिसांकडे केली आहे.

BAGESHWAR DHAM SARKAR DHIRENDRA SHASTRI
त्यांच्या या ज्ञानाला नागपूरच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आव्हान
BAGESHWAR DHAM SARKAR DHIRENDRA SHASTRI
बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींना आव्हान दिले आहे. त्यांनी आमच्यामध्ये दैवी चमत्कारी दरबार आयोजित करावा. सर्व सत्य सांगाल तर आम्ही त्यांना 30 लाख रुपये भेट देऊ. त्यांचे आवाहन धीरेंद्र कृष्ण शास्त्रींनी स्वीकार केले आहे. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी या वादावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आहे की, गेल्या सात दिवसांपासून ते नागपुरात राम कथा आयोजित होती. त्यादरम्यान कोणीही आव्हान दिले नाही.

BAGESHWAR DHAM SARKAR DHIRENDRA SHASTRI
बागेश्वर धाम सरकार धीरेंद्र शास्त्री

मात्र कथेवरून परत येताच सनातन धर्माच्या विरोधकांनी अपप्रचार सुरू केला आहे. त्यांच्यावर झालेल्या आरोपावर सुद्धा त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 'हाथी चले बाजार, कुत्रा भोंके हजार' असे उत्तर दिले आहे. बागेश्वर धामचे मुख्य पुजारी धीरेंद्र शास्त्रींच्या रामकथेला भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील समावेश आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.