Kiss Day 2023 : 'किस डे' ला अनुभवा स्वर्गीय चुंबनाची जादु..., पण कशी?..., मग वाचा सविस्तर

author img

By

Published : Feb 11, 2023, 4:12 PM IST

Updated : Feb 13, 2023, 8:08 AM IST

Kiss Day 2023

14 फेब्रुवारीला 'व्हॅलेंटाईन डे' असून 7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. कपल्स या दिवसांची आतुरतेने वाट बघत असतात. 13 फेब्रुवारीला 'किस डे' येतो, चला तर जाणून घेवूया या किस डे ची जादू कशी अनुभवायची आणि चुंबनाच्या स्वर्गीय सुखाचा आनंद घेण्यास तुम्ही कशी तयारी करायला हवी. वाचा सविस्तरपणे...

चुंबन ही एक कला आहे. ती एक उत्स्फूर्त प्रेमाची अनुभूती आहे. फ्लाईंग किस पासून फ्रेंच किस पर्यंत चुंबनाचे अनेक प्रकारही आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, की चुंबनाचेही एक शास्त्र आहे. हो तुम्ही अगदी बरोबर वाचलंत... चुंबनाचे एक शास्त्रही आहे. चुंबन दिन व्हॅलेंटाईन वीकच्या भाषेत 'किस डे' च्या निमित्ताने तुम्हाला फ्रेंच किस कसा घ्यायचा याची माहिती आम्ही देणार आहोत. तुम्ही फर्स्ट टाईम किस घेणार असाल किंवा अगदी निष्णात चुंबन घेणारे असाल. तरी ही माहिती वाचल्यावर तुमच्या चुंबनाचा आनंद नक्कीच द्विगुणीत होईल यात शंकाच नाही.

चुंबन घ्यायचे म्हटल्यावर त्यासाठी थोडी पूर्वतयारी करावी लागते बरं का... त्याचं काय आहे. गूज ओठांनी ओठांना सांगायचं म्हटल्यावर तुमचे ओठ मृदू मुलायम असायला पाहिजेत. त्यासाठी पाणी भरपूर प्या, ओठ मऊ राखण्यासाठी साय, तूप किंवा इतर बाजारात मिळणाऱ्या सौंदर्य प्रसाधन साधनांचा आवर्जुन वापर करा. त्यामुळे तुमचे ओठ ताजेतवाने राहतील. मुखदुर्गंधी येणार नाही, याचीही काळजी घ्या. त्यासाठी ब्रश करा, लसूण-कांदा खाण्यापासून किस करण्यापूर्वी दूर राहा. एकूणच या सगळ्या गोष्टींच्यामुळे तुमचा किसचा खरा आनंद मिळेल.

काही गोष्टींमध्ये अजिबात धसमुसळेपणा करुन चालत नाही. किसचेही असेच आहे. 'स्ट्राईक द राईट कॉर्ड, राईट टाईम' हा वाक्प्रचार तुम्हाला माहीतच असेल. चुंबनाचेही तसेच आहे. नेमका क्षण गाठून किस घेतला तर त्याची मजा काही औरच असते. फ्रेंच किससाठी एकांत खूपच महत्वाचा. कारण हे दीर्घ चुंबन असल्याने, कोणताही डिस्टर्ब नसणारा एकांत यासाठी महत्वाचा असतो. त्यामुळे कबाब में हड्डी कुणीही येणार नाही याची काळजी घ्या.

अशा पद्धतीने 'राईट प्लेस आणि राईट मोमेंट' जुळून आला की इंटिमसी अर्थात जवळीक आपोआप निर्माण होते. या जवळ येण्यातही एक रोमान्स असतो. त्यात रोमांचक असा फ्रेंच किस घ्यायचा असेल तर हळुवार तिच्या केसांमध्ये हात घालून तिला अलगद जवळ ओढून घ्या. तीही हलकेच तुमच्या छातीवर दोन्ही हात ठेवून हळुवार ते तुमच्या गालांवर आणेल. एकदा दोघेही जवळ आले की नाक नाकाला लागणार नाही अशी थोडी ॲडजेस्टमेंट करुन हलकेच ओठावर ओठ टेकवून चुंबन घ्या.

याच चुंबनाचा आवेग वाढवत ओठ आणि जिभेचा वापर करुन पुन्हा हळुवारपणे मौखिक चुंबनाचा आस्वाद घ्या. यामध्ये ओठ आणि जीभेच्या वापराचे टेक्निक एकदा जमले की, या चुंबनाचे स्वर्गीय सुख तुम्हाला मिळणार हे नक्की. फ्रेंच किसमध्ये नुसत्या ओठांचा नाही तर हातांचाही वापर करणे अपेक्षित आहे. त्यामध्ये त्याने आणि तिने एकमेकांच्या केसांना कुरवाळणे, मानेवर हात फिरवणे यामुळे फ्रेंच किस अधिक सेन्सिबल आणि सेन्सिटीव्ह होतो.

जाता-जाता एक खबरदारीची सूचना... जर तुमच्या जोडीदाराच्या दातांना ब्रिसेस म्हणजेच चिमटा किंवा साखळी लावली असेल तर, जरा जपून. कारण अशावेळी फ्रेंच किस करताना जीभ कापण्याची शक्यता असते. एकमेकांच्या दातांना आणि ओठांना दुखापत होणार नाही याची दोघांनीही काळजी घ्यावी. दुसरी आणि खूपच महत्वाची गोष्ट म्हणजे दोघांचीही संमती असेल आणि मूड असेल तरच फ्रेंच किसचा मजा घ्या. आणि व्हॅलेंटाईन वीकमधील एक महत्वाचा दिवस असलेल्या किस डेचा आनंद द्विगुणित करा.

हेही वाचा : DDLJ in Valentine week : दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे 37 शहरांमध्ये पुन्हा रिलीज

Last Updated :Feb 13, 2023, 8:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.