ETV Bharat / bharat

Dalit Woman Rape In AP : विवाहित महिलेचे अपहरण करून बलात्कार; लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया

author img

By

Published : Jan 11, 2023, 3:41 PM IST

विवाहित महिलेला महिनाभर डांबून (Kidnapping of married woman) ठेवून तिच्यावर दोन ठिकाणी बलात्कार (rape of married woman) करण्यात आल्याचा आरोप दलित समाजातील नेत्यांनी (rape of dalit woman) केला आहे. घटनेला अनुसरून आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील चंद्रगिरी येथे मंगळवारी पीडितेसोबत पत्रकार परिषद (press conference of rape victim) घेण्यात आली. यामध्ये पीडितेने धक्कादायक खुलासा केला.

Dalit Woman Rape In AP
विवाहित महिलेचे अपहरण करून बलात्कार

चंद्रगिरी (आंध्र प्रदेश) : सुत्रांकडून प्राप्त माहितीप्रमाणे, विवाहित महिला तिरुपती येथील एका खाजगी शाळेत स्वच्छता कर्मचारी म्हणून कामाला होती. (Kidnapping of married woman) आंध्र प्रदेशातील बालीजापल्ली येथील व्यक्ती गेल्या वर्षी १७ नोव्हेंबर रोजी विवाहित महिला काम करत असलेल्या शाळेत गेला होता. (rape of married woman) त्याने पीडितेवर दबाव टाकून बॅंकेचे लोन घेण्याचा आग्रह केला. एवढेच नव्हे तर तिला कर्ज घेण्यास भाग पाडले. (rape of dalit woman) पीडितेने यासाठी सुरुवातीला नकार दिला; मात्र आरोपीने शाळेच्या आवारात तिला धमकावून मारहाण केली. यानंतर तिला धाक दाखवून दुचाकीवरून अज्ञात स्थळी नेले. (press conference of rape victim) आरोपीने पीडितेला एका खोलीत कोंडून तिच्यावर पाच दिवस बलात्कार केला.

दलित समाजात प्रचंड आक्रोश : नराधमाने पीडितेला पकाला मंडळाच्या दमलाचेरुवू येथेही नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर तिला तिच्या गावी सोडून पसार झाला. बलात्कारानंतर मानसिक धक्का बसल्याने पीडितेने तिच्या घरीच आत्महत्येचा प्रयत्न केला; मात्र कुटुंबीयांनी तिला असे करण्यापासून रोखले. या प्रकरणी दलित समाजाच्या नेत्यांनी एकत्रित येत गावातील ज्येष्ठ मंडळी आणि कुटुंबीयांच्या सहकार्यानंतर तिरुपती जिल्ह्याचे एसपी आणि दिशा पोलीस ठाण्याचे डीएसपी रामा राजू यांच्याकडे यावर्षी ६ जानेवारीला तक्रार दाखल केली.

यापूर्वीही बलात्काराचे धक्कादायक प्रकार : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या जिल्ह्यात मे, 2022 मध्ये एक धक्कादायक घटना घडली होती. वायएसआर जिल्ह्यातील प्रोद्दातूरमध्ये एका तरुणाने त्याच्या 9 मित्रांसह एका अल्पवयीन मुलीवर अनेक महिन्यांपासून वारंवार बलात्कार केला. पीडित मुलगी गरोदर राहिल्याने ही घटना उघडकीस आली होती. याबाबत पोलिसांनी तडकाफडकी कोणतीही कारवाई केलेली नाही. अल्पवयीन मुलगी भिक्षेकरु असल्याची माहिती मिळाली. तिचे वडीलही भिक्षेकरू होते. काही वर्षांपूर्वी पीडितेच्या आईचे निधन झाले होते. त्याच परिसरात राहणारा चेंबू नवाच्या तरुणाने आपल्या मित्रांसह अनेक महिने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. यातून ती गर्भवती राहिल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली आहे.

पोलिसांमुळे प्रकरण आले समोर : याबाबत 4 मे रोजी महिला कॉन्स्टेबल मल्लेश्वरी यांनी पीडितेला विश्वासात घेऊन तिची विचारपूस केली असता तिने या धक्कादायक घटनेबाबत वाच्यता केली. चेंबू आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर बलात्कार केल्याचे पीडितेने सांगितले. कॉन्स्टेबल मल्लेश्वरी यांनी मुलीने दिलेल्या सर्व माहितीचे छायाचित्रणही केले आहे. त्यानंतर सर्व हकीकत सीआयला सांगितली. सीआयने पीडितेला ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमृतनगर येथील आश्रमात हलवण्याच्या सूचना दिल्या. या सर्व प्रकारानंतरही ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्याचे सांगण्यात येत आहे. 8 मे, 2022 ला पीडित मुलीला एका खासगी धर्मादाय संस्थेच्या आश्रमात हलवण्यात आले होते. या घटनेने राज्यात एकच खळबळ माजली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.