ETV Bharat / bharat

Kedarnath Yatra Stop : उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर; अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने केदारनाथ यात्रा थांबवली

author img

By

Published : Jul 9, 2022, 5:52 PM IST

उत्तराखंडमध्ये पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने केदारनाथ यात्रा थांबवली ( Kedarnath Yatra has been stopped ) आहे. सोनप्रयागच्या पलीकडे कोणत्याही प्रवाशाला जाण्याची परवानगी नाही आहे.

Kedarnath Yatra Stop
केदारनाथ यात्रा थांबवली

रुद्रप्रयाग : उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक भागात दरडी कोसळण्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता लक्षात घेऊन केदारनाथ यात्रा थांबवण्यात आली ( Kedarnath Yatra has been stopped ) आहे. रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार सोनप्रयागमध्ये यात्रेकरूंना थांबवण्यात आले आहे.

केदारनाथ यात्रा तात्पुरती थांबवली - उत्तराखंडमध्ये पावसाने कहर केला आहे. राज्यभरात नद्या-नाले तुंबले आहेत. पावसामुळे अनेक भागात भीषण अपघात झाले आहेत. पावसाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचवेळी, मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर रुद्रप्रयाग जिल्हा प्रशासनाने केदारनाथ यात्रा तात्पुरती थांबवली आहे. हवामान योग्य झाल्यानंतरच प्रवाशांना सोनप्रयागच्या पलीकडे पाठवले जाईल. सध्या सर्व प्रवासी सोनप्रयागमध्येच आहेत.

अनेक ठिकाणी भूस्खलन - मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे राज्यभरातील १२२ हून अधिक रस्ते बंद आहेत. अनेक मुख्य रस्तेही बंद आहेत. अनेक ठिकाणी डोंगरावरून सतत ढिगारा पडत आहे. चमोली जिल्ह्यात ऋषिकेश-बद्रीनाथ महामार्ग बंद आहे.

पंतप्रधानांसाठी झाली होती पहिली पूजा - बाबा केदारनाथचे दरवाजे 6 मे रोजी सकाळी 7:30 वाजता सर्वसामान्य भाविकांसाठी उघडण्यात आले होते. दरवाजे उघडण्याच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री पुष्कर धामीही उपस्थित होते. ( Doors Of Kedarnath Temple Open ) केदारनाथ धामचे दरवाजे उघडल्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पहिली पूजा करण्यात आली. भक्त आतुरतेने बाबांचे दरवाजे उघडण्याची वाट पाहत होते. केदारनाथ धामचे दरवाजे उघडताच भाविकांची सहा महिन्यांची प्रतीक्षा संपली होती. दरम्यान, हर हर महादेवच्या जयघोषाने धाम दुमदुमून गेला होता. आता पुन्हा पावसामुळे केदारनाथ धाम यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

हेही वाचा - Pithoragarh Landslide Video : उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर; लोक रस्ता ओलांडत असताना कोसळली दरड, पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.