ETV Bharat / bharat

kartik somvati amavasya 2023 : कार्तिक सोमवती अमावस्येला स्नान आणि दानाचं विशेष महत्त्व

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 13, 2023, 10:12 AM IST

kartik somvati amavasya 2023 : कार्तिक सोमवती अमावस्या 2023 तिथी कार्तिक महिन्यातील अमावास्येला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. यावर्षी कार्तिक अमावस्येला सोमवती अमावस्येचा विशेष योगायोग आहे. या दिवशी पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पूजा करणे आणि दान करणे खूप शुभ मानले जाते. अशा स्थितीत यंदा सोमवती अमावस्येच्या दिवशी लक्ष्मीपूजनासह पितरांच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे.

kartik somvati amavasya 2023
कार्तिक सोमवती अमावस्या

हैदराबाद : kartik somvati amavasya 2023 पौराणिक ग्रंथांमध्ये कार्तिक महिना भगवान विष्णूचा प्रिय महिना मानला जातो. हिंदू धर्मातील अनेक प्रमुख सण कार्तिक महिन्यात येतात, त्यामुळं हा महिना सर्वात महत्त्वाचा आहे. आज (सोमवार, १३ नोव्हेंबर) कार्तिक महिन्यातील सोमवती अमावस्या आहे. या दिवशी दिवाळीही साजरी केली जात असल्यानं सोमवती अमावस्या फलदायी मानली जाते. ही वर्षातील शेवटची सोमवती अमावस्यादेखील आहे. ही अमावस्या महत्त्वाची आहे. कारण या दिवशी स्नान केल्यानंतर दान केलं जातं. या अमावस्येच्या दिवशी पितरांसाठीही कार्य केलं जातं. त्यांची पूजा केली जाते. या दिवशी पवित्र नदीत स्नान करून दान केल्यानं अनेक पटींनी फल मिळतं, असा विश्वास आहे. जाणून घेऊया त्याचं महत्त्व आणि आंघोळीचा शुभ काळ कोणता आहे.

सोमवती अमावस्येला स्नान करण्याचा शुभ मुहूर्त : ईटीव्ही भारतशी बोलताना पंडित टिळक राज यांनी सांगितले की, या दिवशी विशेषत: पवित्र नदीत स्नान केल्यानंतर काहीतरी दान केल्याने विशेष फळ मिळते. हिंदू कॅलेंडरनुसार, सोमवती अमावस्या 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:44 वाजता सुरू होत आहे. तर ती 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:56 वाजता संपेल. त्याच वेळी, स्नान करण्याचा शुभ मुहूर्त 13 नोव्हेंबरला पहाटे 4:56 ते 5:59 पर्यंत आहे, तर शुभ अभिजीत मुहूर्त 11:40 ते 12:27 पर्यंत असेल.

घरात सुख, समृद्धी आणि शांती राहण्यासाठी करा हे उपाय : अमावस्येच्या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी कपडे, अन्नपदार्थ किंवा पैसे गरजू लोकांना दान करावेत. असे केल्यानं त्यांच्या घरात सुख-समृद्धी येते. सर्व प्रकारचे रोग व दोष दूर होतात. या दिवशी दान केल्यानं शाश्वत फळ मिळते. या दिवशी एखाद्या व्यक्तीनं कोणत्याही प्रकारचे अन्नदान केल्यास त्याला दीर्घायुष्य लाभते. या दिवशी लक्ष्मी आणि गणेशाची पूजा करण्याचा विधी आहे. घरात सुख-समृद्धीसाठी लक्ष्मी माता आणि गणेशाची पूजा केली जाते. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या अमावस्याला सर्वात मोठी अमावस्या म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीच्या दर्शनासाठी येते.

सोमवती अमावस्येच्या दिवशी महत्त्वाच्या गोष्टी : सोमवती अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी पवित्र नदी किंवा तलावात स्नान करावे. त्यानंतर लक्ष्मी, भगवान गणेश, भगवान विष्णू आणि आपल्या पूर्वजांची पूजा करावी. त्यानंतर गरजूंना दान द्यावे. असे केल्याने व्यक्तीला अनेक प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते. तसेच घरात सुख-समृद्धी येते. कार्तिक महिन्यातील अमावास्येला विष्णु पुराणाचे पठण करावे. दिवा दान केल्यानं उत्तम फळ मिळते.

हेही वाचा :

  1. Diwali 2023 home decor tips : दिवाळीत असं सजवा घर; जाणून घ्या टिप्स
  2. Diwali Rangoli 2023 : दिवाळीत काढा अशा सुंदर रांगोळी, घर आणि अंगणाला येईल छान शोभा
  3. Laxmi pooja 2023 : दिवाळीत पुजेसाठी पुजारी मिळत नसतील तर, 'अशा' प्रकारे लक्ष्मी-गणेशजींची करा पुजा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.