ETV Bharat / bharat

Bus Shelters : घुमटाच्या आकाराच्या बस स्टँडवर चालविणार बुलडोझर -भाजप नेत्याचा इशारा

author img

By

Published : Nov 15, 2022, 9:35 AM IST

कर्नाटकचे भाजप खासदार प्रताप सिम्हा ( karnataka Mp Pratap Simha ) यांच्या एका वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. म्हैसूर येथील घुमट असलेले बसस्थानक बुलडोझरने पाडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. ( Bulldoze Gumbaz Type Bus Shelters )

Karnataka BJP MP Pratap Simha
बसस्थानक

कर्नाटक : कर्नाटकातील भाजप खासदार प्रताप सिंह ( Karnataka BJP MP Pratap Simha ) यांनी शहरभर बांधल्या जाणाऱ्या घुमटासारख्या बसस्थानकांवर बुलडोझर फिरवणार असल्याचे सांगून वादाला तोंड फोडले आहे. रविवारी म्हैसूरमध्ये एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात बोलत होते. ( Bulldoze Gumbaz Type Bus Shelters )

बसस्थानक बुलडोझरने पाडण्याचा इशारा : कर्नाटकचे भाजप खासदार प्रताप सिम्हा यांच्या एका वक्तव्याने वाद निर्माण झाला आहे. म्हैसूर येथील घुमट असलेले बसस्थानक बुलडोझरने पाडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. वास्तविक हे बसस्थानक म्हैसूर-उटी रस्त्यावर बांधले आहे. बसस्थानकावर तीन घुमट आहेत, ज्यामुळे बसस्थानक हे दुरून मशिदीसारखे दिसते.

Bus Shelters
कर्नाटकचे भाजप खासदार प्रताप सिम्हा

चार दिवसात तोडले नाही तर मी स्वतः पाडेन : म्हैसूरच्या खासदाराने रविवारी 'टीपू निजाकंसुगलु' (टीपूचे खरे स्वप्न) या कार्यक्रमात बोलताना ही टिप्पणी केली. खासदार प्रताप म्हणाले, 'सोशल मीडियावर हे बसस्थानक पाहिले होते. यात 3 घुमट आहेत, मध्यभागी एक मोठा आणि त्याला लागून लहान दोन घुमट आहेत. मी अभियंत्यांना तीन-चार दिवसांत बांधकाम पाडण्यास सांगितले आहे. त्यांनी तसे न केल्यास मी स्वत: जेसीबी आणून घुमटाच्या आकाराच्या बस स्टँडवर बुलडोझर चालविणार असे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.