ETV Bharat / bharat

Bus Driver Saves Girl : बस चालकाचे प्रसंगावधान, तलावात उडी मारून वाचवले बुडणाऱ्या दोन मुलींचे प्राण!

author img

By

Published : Jan 30, 2023, 1:20 PM IST

Bus Driver Saves Girl
बसचा चालक मंजुनाथ

कर्नाटक परिवहन बसचा चालक मंजुनाथ याला बस चालवत असताना दोन मुली तलावात बुडताना दिसल्या. ते पाहताच त्याने तत्काळ बस थांबवून तलावात उडी मारली आणि दोघींनाही पाण्यातून बाहेर काढले.

तुमकूर (कर्नाटक) : कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस चालकाने प्रसंगावधान राखून तलावात बुडणाऱ्या दोन बहिणींना वाचवले. ही घटना कर्नाटकच्या तुमकूर जिल्ह्यातील हंडीकुंटे येथे घडली आहे. महामंडळाच्या शिरा युनिटचा बस चालक मंजुनाथ याने बुडणाऱ्या मुलींचा तलावात उडी मारून जीव वाचवला.

काय आहे प्रकरण ? : चालक मंजुनाथ नागेनहल्ली येथून शिरा मार्गे बस चालवत होता. यावेळी त्याला दोन मुली पाण्यात बुडताना दिसल्या. ते पाहताच त्याने तत्काळ बस थांबवून तलावात उडी मारली आणि दोघींनाही पाण्यातून बाहेर काढले. हंडीकुंटे अग्रहार तलावात कपडे धुण्यासाठी गेलेल्या या मुली पाय घसरून पाण्यात पडल्या होत्या. या बहिणींवर बारागुरु प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले. चालकाने वेळीच प्रसगावधान राखल्याने ही भावंडे वाचली. मंजुनाथ यांच्या या मानवतावादी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांचा सत्कार करण्यात आला आहे.

संचालकांनी केले कौतुक : राज्य मार्ग परिवहन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक व्ही. अनबुकुमार यांनी सांगितले की, राज्य परिवहनाच्या शिरा युनिटचे ड्रायव्हर मंजुनाथ एम. नागप्पानहल्ली गेट मार्गावर बस चालवत होते. त्यांनी हंडीकुंटे येथील अग्रहारा तलावातून दोन मुलींची सुटका केल्याची माहिती मला मिळाली. काल दुपारी 2:15 च्या सुमारास ही घटना घडली. त्यांनी बुडणाऱ्या मुलींना वाचवण्यासाठी वाहन थांबवून तलावात उडी मारली. नंतर दोघींचाही जीव वाचवून त्यांना किनाऱ्यावर आणले. मानवतेच्या दृष्टीकोनातून काम केल्याने बहुमोल जीव वाचतात. ते सर्व कर्मचाऱ्यांसाठी एक आदर्श आहेत. आमच्या ड्रायव्हिंग कर्मचार्‍यांची कार्यक्षमता हा संस्थेचा अभिमान आणि सन्मान आहे. मंजुनाथ यांच्यासारखे कर्मचारी ही आमची संपत्ती आहेत.

नांदेडमध्ये अस्वलाला वाचवले : नांदेडच्या घोटी शिवारात एका शेतातील विहिरीत पडलेल्या अस्वलाला विहिरीतून बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले. रविवारी पहाटे पाच वाजता दोन अस्वलांपैकी एक अस्वल विहिरीत पडले होते. किनवट वनविभागाने विदर्भातील खरबी वन्यजीव विभागाच्या मदतीने रेस्क्यू करून अस्वल पिंजऱ्यात बंद केले. जेसीबीच्या सहाय्याने पिंजरा विहिरीत सोडून अस्वलाला पिंजऱ्यात बंद करण्यात आले. अशाप्रकारे विहिरीत पडल्यानंतर तब्बल सहा तासानंतर अस्वल बाहेर आले. हे अस्वल वन्यजीव क्षेत्रात सोडण्यात येणार आहे. अस्वलाला पाहण्यासाठी आसपासच्या नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा : Morena Plane Crash : मुरैना विमान दुर्घटना; कर्नाटकचे विंग कमांडर हनुमंत राव सारथी यांना वीरमरण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.