ETV Bharat / bharat

Offered Money : भाजपमध्ये सामील होण्यासाठी दाखवले पैशाचे आमिष - आमदार एच विश्वनाथ यांचा खुलासा

author img

By

Published : Dec 16, 2022, 2:21 PM IST

भाजप आमदार एच विश्वनाथ यांनी मोठा खुलासा केला आहे. जेडीएसमध्ये मी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार होतो तेव्हा खासदार श्रीनिवास प्रसाद यांनी मला जेडीएसचा राजीनामा देण्यास आणि येडियुरप्पा यांचा मुलगा बी वाय विजयेंद्र यांच्या बेंगळुरू येथील अपार्टमेंटमध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्यास सांगितले होते. यावेळी विजयेंद्रने मला पैशाचे आमिष दाखवले होते. ( Offered Money To Join Bjp )

Karnataka Bjp Mlc
भाजप आमदार एच विश्वनाथ

म्हैसूर : ( Karnataka ) भाजपचे आमदार एच विश्वनाथ ( Vishwanath ) यांनी मोठा खुलासा केला आहे. एच विश्वनाथ यांनी गुरुवारी म्हैसूरमध्ये सांगितले की, येडियुरप्पा आणि खासदार श्रीनिवास प्रसाद दोघेही जेव्हा येडियुरप्पा यांचा मुलगा विजयेंद्र मला भाजपमध्ये सामील होण्यासाठी पैसे द्यायला आला तेव्हा तिथे उपस्थित होते. बंगळुरू येथील विजयेंद्र यांच्या अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. हा मुद्दा माझ्या बॉम्बे डेज या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात आहे. ( Offered Money To Join Bjp )

पैशाचे आमिष दाखवले : पत्रकार भवन येथे पत्रकारांना ते म्हणाले, जेडीएसमध्ये मी प्रदेशाध्यक्ष आणि आमदार होतो तेव्हा खासदार श्रीनिवास प्रसाद यांनी मला जेडीएसचा राजीनामा देण्यास आणि येडियुरप्पा यांचा मुलगा बी वाय विजयेंद्र यांच्या बेंगळुरू येथील अपार्टमेंटमध्ये भाजपमध्ये प्रवेश करण्यास सांगितले होते. यावेळी विजयेंद्रने मला पैशाचे आमिष दाखवली होती. यावर किती पैसे घेतले? असा प्रश्न केेल्यावर विश्वनाथ म्हणाले की, 'माझ्या बॉम्बे डेज' या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात या प्रकरणाचा उल्लेख आहे. बॉम्बे डेज हे पुस्तक पुढच्या निवडणुकांपर्यंत प्रसिद्ध होईल, असे संकेत त्यांनी दिले.

एमएलसी यादीत नाव : विश्वनाथ म्हणाले की, 'मी भाजपमध्ये आल्यानंतर माझ्याशी चांगले वागले नाही. मी पोटनिवडणूक हरल्यानंतर येडियुरप्पा मला एमएलसी बनवण्यास कचरत होते. त्यावेळी आरएसएसच्या मुकुंद यांनी भाजपच्या एमएलसी यादीत माझे नाव समाविष्ट केले. येडियुरप्पा यांनी एमएलसी बनवले नाही. पोटनिवडणुकीत माझा पराभव झाला तेव्हा भाजपचा एकही नेता माझ्या मदतीला आला नाही.

श्रीनिवास प्रसाद यांच्यावर टीका : लोकसभेत चामराजनगरचे प्रतिनिधित्व करणारे पक्षाचे खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांनी काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेतली तेव्हा त्यांना राजकीय भटके म्हटले. याबाबत विश्वनाथ यांनी खासदार श्रीनिवास प्रसाद यांच्यावर टीका केली. राजकीय भटके म्हणून त्यांच्यावर टीका करणे योग्य नाही, असे ते म्हणाले. तुम्ही किती पक्ष बदललात? तुम्ही एकाच पक्षात दोनदा सामील झाला. विश्वनाथ म्हणाले की, मी कोणत्याही काँग्रेस नेत्याला गुपचूप भेटलो नाही. मी थेट भेटलो आहे जेणेकरून सर्व मीडिया लोकांना कळेल. मी अनेक वर्षे काँग्रेसमध्ये होतो आणि माझे अनेक काँग्रेस मित्र आहेत. मी मल्लिकार्जुन खरगे, डीके शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांना सौजन्याने भेटलो. मी काँग्रेसमध्ये जाईन असे कुठेही म्हटले नाही. आता मी भाजपचा विधान परिषदेचा सदस्य आहे. मी पुढची निवडणूक लढवण्याबद्दल बोलणार नाही, 2023 च्या निवडणुकीत काय होईल हे माहित नाही. सर्व रिअल इस्टेट खरेदीदार तिकीट मिळविण्यासाठी गुंतवणूक करत आहेत. पुढच्या निवडणुकीचा विचार करताना मला भीती वाटते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.