ETV Bharat / bharat

आव्हाडांनी संस्कृत वाचलं नसेल, अर्थाचा अनर्थ केला; कथाकार अनिरुद्धाचार्य यांची टीका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 6, 2024, 2:57 PM IST

Jitendra Awhad Controversial Statement :प्रभू रामांना मांसाहारी म्हटल्यानं आमदार जितेंद्र आव्हाड चांगलेच वादात सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्याचा सर्वत्र विरोध होत आहे. कथाकार अनिरुद्धाचार्य यांनी आव्हाडांनी चुकीचा अर्थ लावलेल्या शब्दाचा सविस्तर खुलासा केलाय.

Jitendra Awhad
Jitendra Awhad

कथाकार अनिरुद्धाचार्य

मथुरा (उत्तर प्रदेश) Jitendra Awhad Controversial Statement : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावरुन सध्या वाद सुरु झालाय. यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिलंय. तरी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अशातच वृंदावन येथील गौरी गोपाल आश्रमात कथाकार अनिरुद्धाचार्य महाराज यांनीही जितेंद्र आव्हाडांवर टीका केलाय. त्यांनी याविषयी ईटीव्ही भारतशी खास संवाद साधला.

आमदारांना धर्मग्रंथांचं ज्ञान नाही : कथाकार अनिरुद्धाचार्य महाराज म्हणाले की, श्रीराम त्यांच्या घरी स्थायिक होत आहेत. देशातील प्रत्येक रामभक्ताचं यात योगदान आहे. हे मंदिर पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात बांधलं जातंय. त्यांच्या कार्यकाळात भव्य राम मंदिराचा पाया रचला गेला. अशातच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भगवान राम हे मांसाहारी असल्याचं वर्णन केल्यावर कथाकार अनिरुद्धाचार्य महाराज म्हणाले की, "या आमदाराला धर्मग्रंथांचं ज्ञान नाही. संस्कृतमध्ये मानसम म्हणजे फळाचा लगदा. हा शब्द फळासाठी वापरला जातो. नेताजींनी संस्कृत वाचलं नसेल. त्यामुळं त्यांनी चुकीचा अर्थ लावला. लोकांना धर्मग्रंथांचे योग्य ज्ञान नसेल तर ते त्यांचा चुकीचा अर्थ लावतात. त्यामुळं धर्मग्रंथांचं वाचन करणं अत्यंत आवश्यक आहे."

विवाहपूर्व प्रेमसंबंध म्हणजे केवळ वासना : विवाहापूर्वी तरुण-तरुणींमध्ये प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याबाबत कथाकार अनिरुद्धाचार्य महाराज म्हणाले की, "विवाहपूर्व प्रेमसंबंध ही केवळ वासना असते. सनातन धर्मात जातिवाद नाही. फूट पाडा आणि राज्य करा या तत्त्वावर त्याची सुरुवात ब्रिटिशांनी केली. सनातनमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे चार भाऊ आहेत." चित्रकूटमधील गोस्वामी तुलसीदासजींचे जन्मस्थान, सोरो शुक्र परिसर आणि राजापूर याविषयी ऋषी-संतांमध्ये संभ्रमावस्था आणि विरोधाभासाच्या स्थितीवर ते म्हणाले, "रामाचा जन्म कुठं झाला यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्यांनी किती काम केलं ते पाहिलं पाहिजे."

हेही वाचा :

  1. आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन शरद पवार गटात नाराजी, भाजपाकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी
  2. "राम मांसाहारी होता" वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाड अडचणीत, राज्यात ठिकठिकाणी गुन्हे दाखल
  3. भावना दुखावल्या असतील तर खेद व्यक्त करतो, पण कोणतंही भाष्य अभ्यासाशिवाय केलेलं नाही- जितेंद्र आव्हाड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.