ETV Bharat / bharat

आदत से मजबूर! 'लालू प्रसाद यादव यांची पक्ष फोडण्याची जुनी सवय'

author img

By

Published : Nov 26, 2020, 4:44 PM IST

व्हायरल ऑडिओ प्रकरणी लालू यादव अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात जनहीत याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. भाजपाचे नेते अनुरंजन अशोक यांनी ही याचिका दाखल केली आहे. तसेच संबधित प्रकरणाची चौकशी एनआयएकडून व्हावी, अशीही मागणी त्यांनी याचिकेत केली आहे.

जीतन राम मांझी
जीतन राम मांझी

पाटणा - बिहार विधानसभा अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांचे ऑडिओ क्लीप प्रकरण चांगलेच गाजले आहे. बिहारचे भाजपा नेते सुशील मोदी यांच्या आरोपानंतर आता माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनीही लालूंवर पक्ष फोडण्याचे आरोप केले आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीमध्ये महागठबंधनच्या उमेदवाराला जिंकण्यासाठी लालूंनी मलाही फोन केला होता. लालू प्रसाद यांची ही सवय फारच जूनी आहे. लहान-लहान पक्षांना ते नेहमीच फोडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, यावेळी त्यांची कोणतीच चाल यशस्वी झाली नाही, असे मांझी म्हणाले.

एनडीए मजबूत आहे. आमचा पक्ष लहान असला तरी आम्ही इमानदारीने एनडीएसोबत राहू, असेही ते म्हणाले. तसेच सरकारने गरीब कामगारांचे हित पाहून निर्णय घ्यायला हवा, अशी प्रतिक्रिया त्यांनी कामगारांच्या आंदोलनावर दिली.

व्हायरल ऑडिओ प्रकरणी लालू यादव अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात जनहीत याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. भाजपाचे नेते अनुरंजन अशोक यांनी ही याचिका दाखल केली आहे. तसेच संबधित प्रकरणाची चौकशी एनआयएकडून व्हावी, अशीही मागणी त्यांनी याचिकेत केली आहे.

माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांची लालूंवर टीका

काय आहे व्हायरल ऑडिओ प्रकरण?

बिहार विधानसभा अध्यक्षपदासाठी होत असलेल्या निवडणुकीमध्ये महागठबंधनच्या बाजूने मतदान करण्यासाठी, लालूप्रसाद यादव यांनी एनडीएच्या आमदारांना फोन करून त्यांना मंत्रीपदाचे आमिष दाखवले, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केला आहे. सुशील मोदी यांनी एक ऑडिओही जारी केला आहे. ज्यामध्ये लालूप्रसाद यादव एनडीएच्या आमदारांना मंत्रीपदाचे आश्वानस देत असून कोरोनाचं कारण देत अनुपस्थित राहण्यासाठी सांगत आहेत. तसेच संबधित आमदाराने आपल्याला लालू यादव यांचा फोन आल्याची कबूली दिली आहे. लालू प्रसाद यादव यांचा फोन आल्याचे समजल्यानंतर सर्वच जण चकीत झाले. सुदैवाने सर्व संभाषण फोनमध्ये रेकार्ड झाले, असे पीरपैती येथील भाजपाचे आमदार ललन पासवान यांनी सांगितले.

हेही वाचा - कृषी आंदोलन : फरीदाबाद ते दिल्लीकडे जाणार्‍या सर्व सीमारेषांवर कलम 144 लागू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.