ETV Bharat / bharat

Terrorist Hideout In Ramban : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त, मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला

author img

By

Published : Apr 5, 2023, 10:02 PM IST

जम्मू-काश्मीर पोलीस आणि आर्मीच्या 23 जवानांनी रामबन भागात दहशतवाद्यांच्या एका अड्ड्याचा पर्दाफाश केला आहे. या ठिकाणाहून सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Terrorist Hideout In Ramban
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त

बनिहाल (जम्मू आणि काश्मीर) : सुरक्षा दलांनी जम्मू आणि काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात दहशतवाद्यांचे लपण्याचे ठिकाण उद्ध्वस्त केले आहे. लष्कर आणि जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी संयुक्त शोध सुरू केली असून या शोध मोहिमेदरम्यान मोर्टार बॉम्ब, काडतुसे आणि इतर संबंधित सामग्रीसह विविध दारुगोळाही जप्त करण्यात आला.

पोलिसांचा तपास सुरु : जम्मू काश्मीर पोलिसांनी या प्रकरणी माहिती दिली आहे. मंगळवारी संध्याकाळी जमालवान जंगलात शोध मोहिमेदरम्यान लपण्याचे ठिकाण उघडकीस आले, असे रामबनचे पोलीस उप अधीक्षक प्रदीप कुमार यांनी पत्रकारांना सांगितले. बनिहाल पोलिस स्टेशनमध्ये शस्त्रास्त्र कायद्यान्वये एफआयआर नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे.

जप्त केलेले साहित्य गांजलेल्या अवस्थेत : पोलिसांनी 52 मिमी मोर्टार बॉम्ब व्यतिरिक्त, शोध पक्षांनी चार डिटोनेटर्स, कॉर्डटेक्स वायर (डेटोनेटिंग कॉर्ड), एके असॉल्ट रायफलची पाच मॅगझिन, दोन पिस्तूल मॅगझिन, एक एलएमजी दारूगोळा बेल्ट बॉक्स, विविध दारुगोळ्याच्या 292 राउंड आणि इतर अनेक वस्तू जप्त केल्या आहेत. 'जप्त केलेल्या साहित्याची गंजलेली स्थिती पाहता, हे लपण्याचे ठिकाण जुने असल्याचे (जेव्हा एक दशकापूर्वी या भागात दहशतवादी कार्यरत होते) त्यांनी म्हटले आहे. रामबनमध्ये दहशतवादाचा आलेख घसरत चालला असून गेल्या अनेक महिन्यांपासून येथे कुठलीही मोठी घटना घडलेली नाही.

पोलीस गस्त घालत आहेत : गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये गुल येथील पोलीस चौकीबाहेर झालेल्या ग्रेनेड हल्ल्याचा संदर्भ देत कुमार म्हणाले की, जिल्ह्यातील दहशतवादाशी संबंधित ही शेवटची घटना होती. विश्वसनीय माहितीच्या आधारे ही शोध मोहीम राबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डीएसपी म्हणाले की, 'सध्या या भागात बर्फ वितळायला सुरुवात झाली आहे. लष्कर, पोलिस आणि इतर सुरक्षा एजन्सीज येथे दक्षता राखण्यासाठी गस्त घालत आहेत'.

हे ही वाचा : Maharashtra Karnataka Dispute : सीमावर्ती भागातील लोकांना विमा देण्याचा निर्णय मागे घ्या, अन्यथा.. , बसवराज बोम्मईंचा इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.