ETV Bharat / bharat

IAS VS IPS In Karnataka: महिला आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमधील भांडण आलं समोर.. राज्य सरकारने दोघींचीही केली बदली

author img

By

Published : Feb 21, 2023, 6:15 PM IST

कर्नाटकातील महिला आयएएस आणि आयपीएस यांच्यातील भांडण जगजाहीर झाल्यानंतर चांगलीच चर्चा झाली होती. त्यावर आता कर्नाटक सरकारने कठोर पावले उचलली आहेत. दोन्ही महिला अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांना अद्याप कोणत्याही विभागात पदस्थापना देण्यात आलेली नाही.

IPS officer D Roopa Moudgil and IAS officer Rohini Sindhuri transferred
महिला आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांमधील भांडण आलं समोर.. राज्य सरकारने दोघींचीही केली बदली

बेंगळुरू (कर्नाटक): सार्वजनिकपणे वाद निर्माण करणाऱ्या आयएएस अधिकारी रोहिणी सिंधुरी आणि आयपीएस अधिकारी डी रूपा यांची कर्नाटक राज्य सरकारने बदली केली आहे. दोघींनाही अद्याप पर्यंत कोणताही विभाग देण्यात आलेला नाही. या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांवर उघडपणे एकमेकांवर टीका करून अनुशासनहीनता केल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणामुळे राज्य सरकारही दोन्ही अधिकाऱ्यांवर संतापले होते.

नवीन अधिकाऱ्यांच्या केल्या नियुक्त्या: कालच सरकारने दोन्ही महिला अधिकाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. आता हिंदू धार्मिक एंडॉवमेंट विभागाच्या आयुक्त रोहिणी सिंधुरी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी कौशल्य विकास, उद्योग आणि उपजीविका विभागाचे सहसचिव बसवराजेंद्र यांची त्या पदावर बदली करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक राज्य हस्तकला विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डी रूपा यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डी.भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आयपीएस पतीचीही बदली: सरकारने डी. रूपा यांचे पती मुनीष मौदगिल यांची कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव म्हणून बदली केली आहे. ते सर्वेक्षण सेटलमेंट आणि भूमी अभिलेख आयुक्त या पदावर कार्यरत होते. सीएन श्रीधर यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक मंत्र्यांनी त्यांच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली होती आणि सेवा नियमांचे उल्लंघन केल्याचे कारण देत कारवाईचा इशारा दिला होता.

सोशल मीडियावर केले होते फोटो शेअर: आयपीएस रुपा यांनी रोहिणीची काही खाजगी छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट केली होती. त्यानंतर रोहिणी आणि रोहिणी सिंधुरी यांच्यातील भांडण सोमवारी मुख्य सचिव वंदिता शर्मा यांच्या कार्यालयात पोहोचले. दोघांनी एकमेकांवर कारवाईची मागणी करत भूमिका मांडली होती. यावर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी रात्री सांगितले होते की, 'मुख्य सचिवांनी दोन्ही अधिकाऱ्यांना अखिल भारतीय सेवा आचार नियमांचे पालन करण्याच्या तोंडी आणि लेखी सूचना दिल्या आहेत आणि त्यांनी ते मान्य केले आहे.'

मुख्यमंत्र्यांकडे झाल्या होत्या तक्रारी: कर्नाटकात IPS आणि IAS यांच्यातील भांडणाचा मुद्दा सीएम बोम्मईपर्यंत पोहोचला होता. सोमवारी दोन्ही अधिकाऱ्यांनी सीएसची भेट घेऊन एकमेकांच्या तक्रारी केल्या होत्या. दोन्ही महिला अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आयएएस अधिकाऱ्याचे काही वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. वास्तविक, दोन अधिकाऱ्यांमधील वादाची गोष्ट जुनी आहे.

हेही वाचा: Javed Akhtar On Pakistan: पाकिस्तानात जाऊन जावेद अख्तर यांनी पाकिस्तानलाच झापलं.. कंगना म्हणाली, 'घरात घुसून मारलं'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.