ETV Bharat / bharat

International flights : पुढील आदेशापर्यंत आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंदच राहणार

author img

By

Published : Feb 28, 2022, 1:06 PM IST

नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (Director General of Civil Aviation) सोमवारी सांगितले की, पुढील आदेश येईपर्यंत नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी सेवा बंदच (International flights suspended ) राहिल. कोविड महामारीमुळे 23 मार्च पासून भारतात आंतरराष्ट्रीय उड्डाने (Indian International Flights) बंद करण्यात आली आहेत. दोन देशातील तात्पुरत्या प्रवास व्यवस्थेला मात्र परवानगी असणार आहे.

International flights
आंतरराष्ट्रीय उड्डाण

नवी दिल्ली: भारतातून नियोजित आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी सेवा पुढील आदेशापर्यंत बंद राहिल असे नागरी विमान वाहतूक महासंचालकांनी (DGCA) सोमवारी स्पष्ट केले आहे. 26 नोव्हेंबर 2021 च्या परिपत्रकात अंशत: बदल करून, सक्षम प्राधिकाऱ्याने पुढील आदेशापर्यंत आंतरराष्ट्रीय व्यावसायिक प्रवासी सेवा बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे निर्बंध आंतरराष्ट्रीय सर्व-कार्गो ऑपरेशन्स आणि विशेषत: डीजीसीएने मंजूर केलेल्या फ्लाइट्सना लागू होणार नाहीत, असे विमान वाहतूक नियामक DGCA ने परिपत्रकात म्हटले आहे. डीजीसीएने सांगितले की, तात्पुरत्या हवाई प्रवास योजनेला हा नियम लागु असणार नाही. भारतातील नियोजित आंतरराष्ट्रीय प्रवासी उड्डाणांवरील बंदी यावर्षी 28 फेब्रुवारीपर्यंत लागू होती. कोविड महामारीमुळे, 23 मार्चपासून भारतात आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद करण्यात आली आहेत, परंतु द्विपक्षीय हवाई प्रवास व्यवस्थेअंतर्गत जुलै 2020 पासून विशेष प्रवासी उड्डाणे कार्यरत आहेत.

हेही वाचा : Indian students stuck in Ukraine : युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण, राहुल गांधींचे टि्वट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.