ETV Bharat / bharat

Udaipur Kanhaiya Lal Murder : 'हा माझा हिंदुस्थान आहे, इथे हिंदूंचा जीव महत्त्वाचा', बबिता फोगटचे उदयपूर घटनेवर ट्विट

author img

By

Published : Jun 29, 2022, 6:42 PM IST

उदयपूर येथील कन्हैया लाल हत्याकांडाने ( Udaipur Kanhaiya Lal Murder Case ) माणुसकीला काळीमा फासला आहे. या प्रकरणाचा खेळातील अनेक दिग्गजांनी निषेध केला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणनंतर आता महिला कुस्तीपटू बबिता फोगटनेही ट्विट करुन प्रतिक्रिया देली आहे.

Wrestler Babita Fogat
Wrestler Babita Fogat

हैदराबाद : राजस्थानमधील उदयपूर येथील कन्हैया लाल हत्याकांडाने माणुसकीला काळीमा फासला आहे. या प्रकरणाचा खेळातील अनेक दिग्गजांनी निषेध केला आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणनंतर आता महिला कुस्तीपटू बबिता फोगटनेही याप्रकरणी तीव्र प्रतिक्रिया ( Babita Fogat on Kanhaiya Lal Murder ) दिली आहे.

राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेती बबिता ( Commonwealth Gold Medalist Babita ) हिने सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'हिंदू लाइव्ह्स मॅटर' मोहिमेचा एक भाग म्हणून ट्विट केले. बबिता म्हणाली की, माझ्या हिंदुस्थानातील हिंदूंचे जीवन महत्त्वाचे आहे. यापूर्वी इरफान पठाण म्हणाला होता की, अशी घटना घडवून आणणारी व्यक्ती कोणत्याही धर्माची मानणारी असावी, हे योग्य नाही. अशा घटना माणुसकीला काळीमा फासतात.

बबिता फोगटचे ट्विट -

बबिता फोगट या भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) नेत्या आहेत. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले ( Babita Fogat tweet on Udaipur incident ) की, 'हा माझा हिंदुस्थान आहे! इथे हिंदूंच्या जीव महत्त्वाचा आहे!!' या ट्विटमध्ये बबिताने हॅशटॅगसह 'हिंदू लाइव्ह्स मॅटर' #HinduLivesMatters देखील लिहिले आहे.

बबिताने आतापर्यंत देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत. 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते. याशिवाय बबिताने 2010 आणि 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते. बबिताने 2012 च्या जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदकही जिंकले आहे.

हे मानवतेला दुखावण्यासारखे आहे: इरफान पठान

इरफान पठाणने ट्विटमध्ये लिहिले की, 'काही फरक पडत नाही, तुम्ही कोणत्याही धर्मावर विश्वास ठेवता. एखाद्या निष्पापाच्या जीवाला हानी पोहोचवणे म्हणजे मानवतेला दुखावण्यासारखे आहे. इरफानच्या या ट्विटला चाहत्यांनीही प्रतिसाद देत पाठिंबा दिला. त्याचवेळी, एकाने म्हटले - हे थेट तुमच्या समुदायाला सांगण्याची हिंमत बाळगा.

  • No matter which faith you follow. HURTING AN INNOCENT LIFE IS LIKE HURTING THE WHOLE HUMANITY.

    — Irfan Pathan (@IrfanPathan) June 28, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अखेर उदयपूर हत्याकांड काय आहे?

राजस्थानच्या उदयपूरमध्ये भरदिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेनंतर संपूर्ण राज्यात कलम 144 लागू करण्यात आले असून अनेक ठिकाणी इंटरनेट बंद करण्यात आले आहे. तसेच तरुणाची निर्घृण हत्या करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

कन्हैयालाल असे मृताचे नाव आहे. त्याच्या आठ वर्षांच्या मुलाने मोबाईलवरून नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे सांगितले जात आहे. यानंतर काही लोक संतप्त झाले आणि तीन आरोपींनी त्याच्याच दुकानात घुसून तरुणाची निर्घृण हत्या केली. या घटनेनंतर हिंदू संघटनेत संताप आहे. या प्रकरणी आरोपींनी व्हिडीओ जारी करून हत्येची जबाबदारीही स्वीकारली आहे.

हेही वाचा - Malaysia Open 2022 : विजयासह सिंधू पुढील फेरीत दाखल, तर पराभवानंतर सायना बाहेर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.