ETV Bharat / bharat

'भारतीय नौदल दिन' का साजरा करण्यात येतो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 4, 2023, 10:37 AM IST

Indian Navy Day 2023 : भारतीय नौदलाचं यश साजरं करण्यासाठी दरवर्षी ४ डिसेंबर रोजी 'भारतीय नौदल दिन' साजरा केला जातो. हा दिवस विशेषतः 1971 मध्ये भारत पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन ट्रायडंट सुरू केल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.

Indian Navy Day 2023
भारतीय नौदल दिन

हैदराबाद : भारतीय नौदल दलांचा सन्मान करण्याचा आणि त्यांच्या योगदानाची प्रशंसा करण्यासाठी नौदल दिन हा विशेष दिवस आहे. 'भारतीय नौदल दिन' हा विशेषत: 1971 मध्ये भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन ट्रायडंट सुरू केल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या युद्धात भारतीय नौदलाचा मोठा वाटा होता. युद्धात प्राणांची आहुती देणाऱ्या खलाशांच्या स्मरणार्थ दरवर्षी 'भारतीय नौदल दिन' साजरा करण्यात येतो

  • Saluting the Guardians of Our Seas! On this Indian Navy Day, we honour the valour, dedication and indomitable spirit of our naval forces and the invaluable support and sacrifice of their families. Their unwavering commitment to safeguarding our nation and ensuring national… pic.twitter.com/ACnrD1RoFi

    — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 4, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'भारतीय नौदल दिना'चा इतिहास : ईस्ट इंडिया कंपनीनं भारतीय नौदलाची स्थापना 1612 मध्ये केली होती. भारत-पाकिस्तान 1971 मध्ये युद्ध झाले. युद्धादरम्यान ३ डिसेंबर रोजी पाकिस्ताननं भारतीय विमानतळांवर हल्ला केला. त्यांच्या आक्रमक हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय नौदलानं 4 आणि 5 डिसेंबरच्या रात्री हल्ले करण्याची योजना आखली. कारण पाकिस्तानकडं बॉम्बफेक करण्यासाठी विमानं नव्हती. या हल्ल्यात पाकिस्तानी नौदलाचे शेकडो सैनिक मारले गेले. कमोडोर कासारगोड पट्टनशेट्टी गोपाल राव यांनी भारतीय नौदलाच्या संपूर्ण मोहिमेचं नेतृत्व केलं.

भारतीय नौदल दिन 2023 चे महत्त्व : मे 1972 मध्ये वरिष्ठ नौदल अधिकारी परिषदेत, 1971 च्या भारत-पाक युद्धादरम्यान भारतीय नौदलाच्या प्रयत्नांची आणि उपलब्धींची कबुली देण्यासाठी 4 डिसेंबर रोजी 'भारतीय नौदल दिन' साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. 'भारतीय नौदल दिन 2023' हा भारतीय नौदलाच्या क्षेपणास्त्र नौकांनी कराचीमध्ये ऑपरेशन ट्रायडेंटच्या विजयासाठी साजरा केला. ऑपरेशन ट्रायडंटच्या विजयाचा गौरव करण्यासाठी दरवर्षी 'भारतीय नौदल दिन' साजरा केला जातो.

भारतीय नौदलाबद्दल माहिती : भारतीय नौदलाची स्थापना ईस्ट इंडिया कंपनीने १६१२ मध्ये केली. त्याला नंतर रॉयल इंडिया नेव्ही असे नाव देण्यात आले आणि स्वातंत्र्यानंतर 1950 मध्ये भारतीय नौदल म्हणून त्याची पुनर्रचना करण्यात आली. भारतीय नौदल ही भारतीय सशस्त्र दलांची नौदल शाखा आहे आणि तिचे नेतृत्व भारताचे राष्ट्रपती कमांडर-इन-चीफ म्हणून करतात. नौदल प्रमुख हा भारतीय नौदलाच्या लष्करी कर्मचाऱ्यांचा प्रमुख असतो. सध्या अॅडमिरल आर हरी कुमार हे नौदल प्रमुख आहेत. मराठा सम्राट, छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौदलाचे जनक मानले जाते.

भारतीय नौदलाला एक्सच्या माध्यमातून केला सलाम : "भारतीय नौदल दिनानिमित्त, आम्ही आमच्या नौदल दलांच्या शौर्याचा, समर्पणाचा आणि अदम्य भावनेचा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अमूल्य पाठिंब्याचा आणि त्यागाचा सन्मान करतो. आपल्या देशाची सुरक्षा आणि राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी त्यांची अटल वचनबद्धता प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे." असं देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर लिहीलं.

हेही वाचा :

  1. 'आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मूलन दिवस' कधी आणि का साजरा केला जातो, जाणून घ्या
  2. 'जागतिक संगणक साक्षरता दिवस' कोणी आणि केव्हा सुरू केला? जाणून घ्या
  3. 'जागतिक दिव्यांग दिन' 2023; जाणून घ्या इतिहास, थीम आणि महत्त्व
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.