ETV Bharat / bharat

पाकचा कट फसला! भारतीय तटरक्षक दलाने बोट अडवली; 280 कोटींचे हेरॉईन जप्त

author img

By

Published : May 3, 2022, 7:29 AM IST

भारताने पाकिस्तानचा एक मोठा कट उधळून लावला आहे. भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (Gujarat Anti-Terrorism Squad) राज्याच्या किनारपट्टीपासून अरबी समुद्रात (Arabian Sea) नऊ क्रू सदस्यांसह एक पाकिस्तानी बोट पकडली आहे. या बोटीतून 280 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले

भारतीय तटरक्षक दलाने बोट अडवली
भारतीय तटरक्षक दलाने बोट अडवली

नवी दिल्ली - भारताने (India) पाकिस्तानचा एक मोठा कट उधळून लावला आहे. भारतीय तटरक्षक दल (Indian Coast Guard) आणि गुजरात दहशतवाद विरोधी पथकाने (Gujarat Anti-Terrorism Squad) राज्याच्या किनारपट्टीपासून अरबी समुद्रात (Arabian Sea) नऊ क्रू सदस्यांसह एक पाकिस्तानी बोट पकडली आहे. या बोटीतून 280 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले

  • ATS and Indian Coast Guard intercepted a boat namely ‘Al Hajj’. On searching the boat 56packets, approximately 56 kg of Heroin worth Rs 280 crore was found on the boat. Subsequently, a case was registered at ATS PS and all nine Pakistani sailors were arrested: Gujarat ATS (02.05)

    — ANI (@ANI) May 2, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

एटीएस आणि भारतीय तटरक्षक दलाने ‘अल हज’ नावाची बोट अडवली. बोटीची झडती घेतली असता 56 पॅकेट्स बोटीमध्ये अंदाजे 280 कोटी रुपये किमतीचे 56 किलो हेरॉईन सापडले. त्यानंतर, एटीएस पीएसमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि सर्व नऊ पाकिस्तानी खलाशांना अटक करण्यात आली: गुजरात एटीएस (02.05)


प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले आहे की, तटरक्षक दलाच्या जहाजांनी 'अल हज' नावाची पाकिस्तानी बोट भारतीय पाण्यात घुसल्यावर तिला चेतावणी दिली आणि पकडले. अधिकाऱ्यांना बोटीवर 280 कोटी रुपयांचे हेरॉईन सापडले. पुढील तपासासाठी बोट आणि त्यातील चालक दलातील सदस्यांना गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ बंदरात नेण्यात आले, असे निवेदनात म्हटले आहे.

तटरक्षक दलाच्या प्रवक्त्याने एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, ही एक मासेमारी करणारी बोट होती. बोट वेगाने पुढे जात होती. ही बोट रोखण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाला गोळीबार करावा लागला. एक क्रू जखमी झाला आणि इतर दोघांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. बोट जड असल्याने ICGS अंकितला मदतीसाठी वळवण्यात आले आहे.

हेही वाचा - Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयाला दान-धर्माला का आहे विशेष महत्व?; पाहा, VIDEO...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.