ETV Bharat / bharat

ICC Women T20 World Cup : भारताने पाकिस्तानला ठोकले; महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव

author img

By

Published : Feb 12, 2023, 9:25 PM IST

Updated : Feb 12, 2023, 10:26 PM IST

महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला आहे. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम गोलदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तान संघाने प्रथम फलंदाजी करीत २० षटकांत ४ बाद १४९ धावा केल्या आहे. पाकिस्ताने भारतीय संघासमोर १५० धावांचे लक्ष्य ठेवले.

INDIA VS PAKISTAN
INDIA VS PAKISTAN

केपटाउन : महिला T20 विश्वचषक 2023 मधील पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 150 धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात भारताने 19 षटकांत 3 गडी गमावून पाकिस्तानचा धुव्वा उडवला. जेमिमा रॉड्रिग्जने भारतीय संघासाठी चांगली कामगिरी करीत नाबाद अर्धशतक झळकावले. तसेच रिचा घोष, राधा यादव यांनीही महत्त्वाचे योगदान दिले.

भारताचा शानदार विजय : पाकिस्तानने दिलेल्या धांवाचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून युस्तिका भाटिया, शेफाली वर्मा यांनी सुरवातीला फलंदाजी केली. शेफालीने 25 चेंडूत 33 धावा केल्या, तसेच 4 चौकार ठोकले. युस्तिकाने 2 चौकारांच्या मदतीने 17 धावा केल्या. कर्णधार हरमनप्रीत कौरने 12 चेंडूत 16 धावा केल्या. तसेच 2 चौकार ठोकले. जेमिमाने शानदार कामगिरी करत नाबाद अर्धशतक झळकावले. तीने 38 चेंडूंचा सामना करत 53 धावा केल्या. जेमिमानाने 8 चौकारांचा वर्षाव केला. रिचा घोषाने 20 चेंडूत नाबाद 31 धावा केल्या. तीने 5 चौकार मारले. या विश्वचषकात भारताने पाकिस्तानला धुळ चारत 150 धावांचे लक्ष 3 गडी गमावून शानदार विजय मिळवला.

पाकिस्तान संघाने 20 षटकांत केल्या 149 धावा : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध T20 विश्वचषक स्पर्धा केपटाऊनमध्ये जिंकला आहे. प्रथम नाणेफेक जिंकून पाकिस्तानने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधार बिस्माहच्या अर्धशतकामुळे पाकिस्तानने 149 धावा केल्या होत्या. बिस्मा मारूफने जोरदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले होते. बिस्मा मारूफने आक्रमक फलंदाजी करत पाकिस्तानची धावसंख्या वाढवली. बिस्मा मारूफ, आयशा नसीम यांच्या भागादारीच्या जोरावर पाकिस्तान संघाने 20 षटकांत 149 धावांचा पल्ला गाठला होता.

भारताला 20 षटकांत 150 धावांचे अव्हान : भारताला विजयासाठी निर्धारित 20 षटकांत 150 धावांचे अव्हान पाकिस्तानने दिले होते. पाकिस्तानची कर्णधार बिस्मा मारूफने 55 चेंडूत सात चौकारांसह 68 धावा केल्या. बिस्मा मारूफ, आयशा नसीम दोघींनी फलादांजी करता भारतीय गोलंदाजांना घाम फोडला. दोघींनी 47 चेंडूत नाबाद 81 धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या जोरावर पाकिस्ताने 149 धावांपर्यंत मजल मारली. आयशा नसीम हिने 25 चेंडूत झटपट 43 धावांची खेळी केली. भारताकडून राधा यादव हिने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. दिप्ती शर्मा, पूजा वस्त्रकर यांनी प्रत्येकी एक एक बळी घेतला. यांच्याशिवाय इतर गोलंदाजांनाही एकही बळी घेता आला नाही.

महिला भारतीय संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, ऋचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणुका ठाकूर, अंजली सरवानी, पूजा वस्त्रेकर, राजेश्वरी, पानेश्वरी, राजेशराव .

महिला पाकिस्तान संघ : बिस्मा मारूफ (कर्णधार), आयमान अन्वर, आलिया रियाझ, आयशा नसीम, ​​सदफ शमास, फातिमा सना, जवेरिया खान, मुनीबा अली, नशरा संधू, निदा दार, ओमिमा सोहेल, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, तुबा हसन

हेही वाचा - Shashikant Warise : पत्रकार वारिसे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 25 लाखांच्या मदतीची घोषणा; उदय सामंतांची माहिती

Last Updated : Feb 12, 2023, 10:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.