ETV Bharat / bharat

India Vs New Zealand : न्यूझीलंडच्या फलंदाजांनी कापले संघाचे नाक, रचला 'हा' लाजीरवाणा विक्रम

author img

By

Published : Jan 21, 2023, 5:40 PM IST

Updated : Jan 21, 2023, 6:49 PM IST

टीम इंडियाने रायपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या ODI मध्ये न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला. यासह रोहित शर्माच्या संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अपराजित आघाडीही घेतली आहे.

India Vs New Zealand
India Vs New Zealand

India Vs New Zealand : न्यूझीलंडच्या फलंदाजांनी कापले संघाचे नाक, रचला 'हा' लाजीरवाणा विक्रम

रायपूर - भारत, न्यूझीलंड यांच्यात आज दुसरा एकदिवसीय सामना खेळला जात आहे. रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. टीम इंडियाने रायपूर येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या ODI मध्ये न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला. यासह रोहित शर्माच्या संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अपराजित आघाडीही घेतली आहे.

येथे प्रथमच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. भारतासमोर केवळ 109 धावांचे लक्ष्य आहे. न्यूझीलंडचा डाव 34.4 षटकांत संपला. न्यूझीलंड संघाकडून ग्लेन फिलिप्सने (36) सर्वाधिक धावा केल्या. त्याने 52 चेंडूंच्या खेळीत पाच चौकार मारले. भारताकडून मोहम्मद शमीने तीन विकेट घेतल्या. हार्दिक पांड्या आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी दोन तर मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

लाजीरवाणा विक्रम - न्यूझीलंड संघाने वनडे क्रिकेटमधील एक लाजिरवाण्या विक्रमाची नोंद केली. न्यूझीलंडचा निम्मा संघ स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये परतला आहे. असा विक्रम संघाच्या इतिहासात यापूर्वी कधीही घडले नव्हते. न्यूझीलंडचा संघ अवघ्या ३४.३ षटकांत १०८ धावांवर गारद झाला.

न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाल्याने प्रथम फलंदाजी करताना संघ पत्त्यासारखा कोसळला. सलामीवीर फिन ऍलन (0) वर बाद झाला. हेन्री निकोल्स (2), डॅरिल मिशेल (1) आणि डेव्हॉन कॉनवे (7) चांगली कामगीरी करु शकले नाही. कर्णधार टॉम लॅथम 17 चेंडूत केवळ 1 धावच करू शकला.

न्यूझीलंड संघाचे 5 खेळाडू अवघ्या 15 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतले. फिलिप्सने सहाव्या विकेटसाठी मायकेल ब्रेसवेल (22) सोबत 41 धावांची भागीदारी केली. मिचेल सँटनरने (27) करीत सातव्या विकेटसाठी 47 धावांची भागीदारी करत न्यूझीलंडला शतकापर्यंत पोहोचवले. लॉकी फर्ग्युसनने 1 धाव, ब्लेअर टिकनरने 2 धावांचे योगदान दिले. हेन्री शिपले 2 धावा करून नाबाद राहिला.

भारताने दोन विकेट गमावल्या - भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने 50 चेंडूनत 51 रण बनवत पहिली विकेट दिली. तर, भारताची दुसरी विकेट 98 धावांवर पडली आहे. विराट कोहली नऊ चेंडूत 11 धावा करून बाद झाला आहे. त्याला मिचेल सँटनरने बाद केले. सँटनरने त्याला यष्टिरक्षक टॉम लॅथमकडून बाद केले. भारतीय संघला विजयासाठी 11 धावांची गरज आहे.

हेही वाचा - Hockey World Cup 2023 : हॉकी विश्वचषकाच्या १४ व्या आवृत्तीत किती गोल झालेत, ते जाणून घेऊया

Last Updated : Jan 21, 2023, 6:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.