ETV Bharat / bharat

India Corona : 24 तासात 15 हजार नव्या रुग्णांची नोंद, तर 278 मृत्यू

author img

By

Published : Feb 23, 2022, 9:57 AM IST

गेल्या 24 तासात 15 हजार 102 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काही दिवसांपुर्वी रोजचा आकडा 2 लाखाच्या पेक्षा जास्त असायचा. असे असले तरी एका दिवसात कोरोना संसर्गाने मृत्यू (India Corona death) पावणाऱ्या रुग्णांचा आकडा 278 आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये 31 हजार 377 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोना अपडेट
India Corona

नवी दिल्ली - भारतातील दररोजच्या कोरोना रुग्णांच्या (India Corona New Patient) नोंदीत कधी घट तर कधी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात 15 हजार 102 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. काही दिवसांपुर्वी रोजचा आकडा 2 लाखाच्या पेक्षा जास्त असायचा. असे असले तरी एका दिवसात कोरोना संसर्गाने मृत्यू (India Corona death) पावणाऱ्या रुग्णांचा आकडा 278 आहे. यात दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांमध्ये 31 हजार 377 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने शनिवारी दिलेल्या माहिती प्रमाणे देशात सध्या 1 लाख 64 हजार 522 सक्रिय रुग्ण आहेत. भारतातील दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट 1.28 टक्के नोंदवला गेला आहे. तर आतापर्यंत 4,21,89,887 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाचा प्रसार झाल्यापासून आतापर्यंत कोरोनामुळे तब्बल 5 लाख 12 हजार 622 लोकांचा बळी गेला आहे.

मागील अडीच वर्षापासून संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलेले आहे. रोज सातत्याने कोरोनाची लागण झालेल्या लोकांची वाढत आहे. तसेच भारतात काही दिवसांपासून नव्याने कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांमधे मोठी घट नोंदवली जात होती. कोरोना महामारीपासून सुरक्षित राहण्यासाठी देशव्यापी सुरू असलेल्या कोरोना लसीकरण मोहिमेअंतर्गत,देशात आतापर्यंत 1,76,19,39,020 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

हेही वाचा - India Corona Update: 24 तासात 1 लाख 61 हजार 386 नवीन कोरोना रुग्ण, 1,733 मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.