ETV Bharat / bharat

दिलासादायक! देशात कोरोना लसीकरणाने ओलांडला 75 कोटींचा टप्पा

author img

By

Published : Sep 13, 2021, 10:15 PM IST

Updated : Sep 13, 2021, 10:25 PM IST

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लसीकरण वेगवान पद्धतीने करण्याबद्दल भारताचे अभिनंदन केले. आरोग्य संघटनेने म्हटले, की भारताने केवळ 13 दिवसांमध्ये 65 कोटी डोसवरून 75 कोटी डोसपर्यंतचा टप्पा गाठला आहे. ही बातमी सविस्तर वाचा.

कोरोना लसीकरण
कोरोना लसीकरण

नवी दिल्ली - कोरोना लसीकरणात देशाने मैलाचा दगड गाठला आहे. कोरोना लसीकरणाच्या आकडेवारीत आज भारताने 75 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. याबद्दल केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी देशातील नागरिकांचे अभिनंदन केले.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ट्विट करत लसीकरणातील टप्प्यावर मत व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'सबका साथ सबका प्रयास' या मंत्राने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम सातत्याने नवीन टप्पे गाठत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात देशाने 75 कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे.

हेही वाचा-मध्य प्रदेशमध्ये विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमात मिळणार उपनिषदासह पुराणाचे धडे!

लसीकरण करत अनेक देशांना टाकले मागे-

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लसीकरण वेगवान पद्धतीने करण्याबद्दल भारताचे अभिनंदन केले. आरोग्य संघटनेने म्हटले, की भारताने केवळ 13 दिवसांमध्ये 65 कोटी डोसवरून 75 कोटी डोसपर्यंतचा टप्पा गाठला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी हे मोठे यश असल्याचे म्हटले आहे. अनुराग ठाकूर यांनी म्हटले, की मी जनता, कोरोना योद्धा, राज्य सरकार आणि पंतप्रधानांचे आभार व्यक्त करत आहे. त्यांनी सर्व मोफत लशीचे डोस उपलब्ध केले आहेत. भारताने आपल्या लोकसंख्येचे लसीकरण करत अनेक देशांना मागे टाकले आहे.

हेही वाचा-कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून चालू आठवड्यात मिळणार मान्यता

Last Updated : Sep 13, 2021, 10:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.