ETV Bharat / bharat

IND vs WI 5th T20 : भारतीय संघाचा प्रथम फलंदाजीचा निर्णय; रोहित ऐवजी 'या' खेळाडूकडे भारतीय संघाची धुरा

author img

By

Published : Aug 7, 2022, 7:53 PM IST

टी-20 मालिकेतील पाचवा सामना लॉडरहिल येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंडवर खेळला जाणार ( IND vs WI 5th T20 ) आहे. या सामन्याला रात्री आठला सुरुवात होईल.

IND vs WI
वेस्ट इंडिज विरुद्ध भारत

फ्लोरिडा: भारत आणि वेस्ट इंडिज संघात पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पाचवा सामना लॉडरहिल येथील सेंट्रल ब्रॉवर्ड रिजनल पार्क स्टेडियम टर्फ ग्राउंडवर खेळला जाणार ( IND vs WI 5th T20 ) आहे. या सामन्याला रात्री आठला सुरुवात होईल. तत्पुर्वी दोन्ही संघाच्या कर्णधारांमध्ये नाणेफेक पार पडली. हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( India opt to bat ) आहे.

या मालिकेत भारतीय संघाने अगोदर 3-1 ने विजयी आघडी घेतली आहे. त्यामुळे आजचा सामना फक्त औपचारिक्ता असणार आहे. भारताने शनिवारी चौथ्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडिजचा एकतर्फी 59 धावांनी पराभव केला होता. तसेच आज ही भारतीय संघ त्याच निर्धाराने मैदानात प्रवेश करेल. दुसरीकडे वेस्ट इंडिजचा मालिकेची सांगता विजयाने करण्यासाठी उत्सुक असणार आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), दीपक हुडा, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, आवेश खान, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग.

वेस्ट इंडीज (प्लेइंग इलेव्हन): शमारह ब्रूक्स, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन (कर्णधार), डेव्हॉन थॉमस (यष्टीरक्षक), जेसन होल्डर, ओडियन स्मिथ, कीमो पॉल, डॉमिनिक ड्रेक्स, ओबेद मॅककॉय, हेडन वॉल्श आणि रोव्हमन पॉवेल.

हेही वाचा - CWG 2022 : चालण्यात संदीपने तर भालाफेकमध्ये अन्नूने जिंकले कांस्यपदक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.