ETV Bharat / bharat

IND vs SA 1st T20 : नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

author img

By

Published : Sep 28, 2022, 6:57 PM IST

पहिला टी-20 सामना ( IND vs SA 1st T20 ) खेळला जाणार आहे. या सामन्याला सातला सुरुवात होणार असून दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( IND won the toss and choose bowl first ) आहे.

IND vs SA
IND vs SA

तिरुवनंतपुरम: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात आज तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील ( IND vs SA T20 Series ) पहिला टी-20 सामना ( IND vs SA 1st T20 ) खेळला जाणार आहे. ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियम तिरुवनंतपुरम ( Greenfield International Stadium Thiruvananthapuram ) येथे खेळला जाणार आहे. या सामन्याला सातला सुरुवात होणार असून दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( IND won the toss and choose bowl first ) आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघाची धुरा पुन्हा एकदा रोहित शर्माच्या ( Captain Rohit Sharma ) खांद्यावर आहे. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिका संघाचे नेतृत्व टेंबा बावुमाच्या ( Captain Temba Bavuma ) हाती आहे. दुसरीकडे, टी-20 मालिकेबद्दल बोलायचे तर, भारत आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेला त्याच्या भूमीवर पराभूत करू शकला नाही. भारताने आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध घरच्या मैदानावर एकूण तीन टी-20 मालिका खेळल्या आहेत. ज्यामध्ये एक दक्षिण आफ्रिकेने जिंकली आणि दोन मालिका अनिर्णित राहिल्या. त्यामुळे या दृष्टीने भारताला चांगली संधी आहे.

भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, दीपक चहर, अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन): क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा (कर्णधार), रिले रोसो, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, कागिसो रबाडा, केशव महाराज, एनरिक नॉर्टजे, तबरेझ शामसी.

हेही वाचा - Pak Vs Eng 5th T20 : पाचव्या टी 20 सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का; 'हा' गोलंदाज झाला बाहेर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.