ETV Bharat / bharat

IND vs IRE 1st T20 : नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; उमरान मलिकला मिळाली पदार्पणाची संधी

author img

By

Published : Jun 26, 2022, 9:41 PM IST

Updated : Jun 26, 2022, 10:57 PM IST

भारत विरुद्ध आयर्लंड ( India vs Ireland ) संघात आज मालिकेती पहिला टी-20 सामना खेळला जाणार आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच आजच्या सामन्याच्या माध्यमातून उमरान मलिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आहे. पावसाच्या व्यत्ययामुळे सामना सुरु होण्याला विलंभ झाला आहे ( Match start delayed due to rain )

IND vs IRE 1st T20
IND vs IRE 1st T20

डब्लिन : भारत विरुद्ध आयर्लंड संघातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील ( India vs Ireland T20 Series ) पहिला सामना आज डब्लिन येथील द विलेज स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तत्पुर्वी दोन्ही संघात नाणेफेक पार पडली आहे. भारतीय संघाचा नवनियुक्त कर्णधार हार्दिक पांड्याने ( Newly appointed captain Hardik Pandya ) नाणेफेक जिंकून प्रथम गोललंदाजी करण्याचा निर्णय घेतला ( India won toss and choose bowl ) आहे. या सामन्याला रात्री 9 वाजता सुरुवात होणार होती. मात्र पावसाच्या व्यत्ययामुळे सामन्याला विलंब ( Match start delayed due to rain ) झाला आहे.

आतापर्यंत या स्टेडियवर 15 टी-20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी 6 वेळा प्रथम फलंदाजी करणारा संघ जिंकला आहे, तर 9 वेळा लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ जिंकला आहे. मागच्या पाच टी-20 सामन्यांमध्ये याठिकाणी 180 पेक्षा मोठी धावसंख्या उभी केली गेली आहे. याठिकाणी प्रथम फलंदाजी करणारा संघ सरासरी 160, तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ सरासरी 140 धावा करतो. त्यामुळे सामन्यात फलंदाजी बघायला मजा येईल असे अनेकांचे मत आहे.

आजच्या सामन्याच्या माध्यमातून आयपीएल स्टार गोलंदाज उमरान मलिक आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण ( Umran Malik T20 international debut ) करत आहे. त्याला भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.

भारतीय प्लेइंग इलेव्हन : हार्दिक पंड्या (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), सुर्यकुमार यादव, दिपक हुड्डा, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल आणि उमरान मलिक.

आयर्लंड प्लेइंग इलेव्हन : अँड्र्यू बालबर्नी (कर्णधार), गॅरेथ डेलेनी, हॅरी टेक्टर, पॉल स्टर्लिंग, लॉर्कन टर्कर (यष्टीरक्षक), मार्क अडायर, अँडी मॅकब्राईन, जॉर्ज डॉकरेल, क्रेग यंग, जोशुआ लिटल आणि कॉनोर ऑल्फर्ट.

हेही वाचा - Ranji Trophy 2021 22 Final : रणजी स्पर्धेला मिळाला नवा चॅम्पियन; रणजी करंडकवर मध्य प्रदेशने प्रथमच कोरले नाव

Last Updated : Jun 26, 2022, 10:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.