ETV Bharat / bharat

IND vs AUS 3rd T20 : रोमहर्षक विजयानंतर कोहली-रोहितने 'अशा' प्रकारे साजरा केला आनंद, पाहा व्हिडिओ

author img

By

Published : Sep 26, 2022, 3:22 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात विजयी धाव घेताच विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी एकत्र आनंद साजरा ( Rohit Sharma and Virat Kohli Celebration )केला. या विजया बरोबरच भारताने तीन सामन्यांची टी-20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

Rohit Virat
रोहित विराट

हैदराबाद : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत ( IND vs AUS T20 Series ) भारताने शेवटचा सामना जिंकून ट्रॉफीवर कब्जा केला आहे. टीम इंडियाने 187 धावांचा पाठलाग करताना 6 गडी राखून विजय मिळवला. अखेरच्या षटकात भारताला हा विजय मिळाला. हार्दिक पांड्याने एक चेंडू शिल्लक असताना टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. या विजयानंतर विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांचा एक व्हिडिओ ( Rohit and Virat Celebration Video ) चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रोहित आणि कोहली विजय साजरा करताना दिसत आहेत.

शेवटच्या षटकात भारताला 11 धावांची -

भारताला शेवटच्या षटकात 11 धावांची गरज होती. विराटने ( Virat Kohli ) पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. पण, पुढच्याच चेंडूवर तो बाद झाला. दिनेश कार्तिकने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. पण, चौथ्या चेंडूवर हार्दिक पांड्याला ( Hardik Pandya ) एकही धाव करता आली नाही. आता दोन चेंडूत चार धावा हव्या होत्या. वातावरण खूपच तंग झाले होते. त्यानंतर हार्दिक पांड्याने पाचव्या चेंडूवर चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. विराट आणि रोहित पॅव्हेलियनच्या पायऱ्यांवर मोठ्या टेन्शनने सामना पाहत होते. पांड्याच्या चौकारानंतर त्याने जबरदस्त सेलिब्रेशन केले.

सूर्यकुमार यादव आणि विराट कोहलीच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला ( India beat Australia by 6 wickets ). ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 186 धावा केल्या होत्या, प्रत्युत्तरात टीम इंडियाने शेवटच्या षटकात विजय मिळवला. यासह भारताने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली.

हेही वाचा - T20 World Cup 2022 : आशिया चषकातील पराभव आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयातून टीम इंडियाने घ्यावे 'हे' 6 धडे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.