ETV Bharat / bharat

IND Vs AUS 1st ODI : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला सामना कुठं, कधी होणार?, जाणून घ्या सर्व माहिती

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 21, 2023, 8:21 PM IST

IND Vs AUS 1st ODI: भारत, ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला ODI सामना 22 सप्टेंबर रोजी मोहालीच्या IS बिंद्रा स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे, तर ऑस्ट्रेलियाची कमान पॅट कमिन्सकडं असणार आहे.

IND Vs AUS 1st ODI
IND Vs AUS 1st ODI

नवी दिल्ली IND Vs AUS 1st ODI : भारत, ऑस्ट्रेलिया यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना 22 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता मोहालीत खेळला जाणार आहे. पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियम भारत ऑस्ट्रेलिया सामना होणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कमान पॅट कमिन्सकडे असणार आहे. तर केएल राहुल भारताचं नेतृत्व करताना दिसणार आहे. मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्याशिवाय भारतीय संघ नव्या फॉर्ममध्ये दिसणार आहे.

भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा : आतापर्यंत दोन्ही संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यांचा रेकॉर्ड पाहिल्यास, ऑस्ट्रेलियन संघाचा वरचष्मा दिसून येत आहे. भारत, ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत 146 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी ऑस्ट्रेलियाने 82 जिंकले आहेत. तर भारतानं 54 जिंकले आहेत. 67 एकदिवसीय सामन्यांपैकी ऑस्ट्रेलियानं 32 तर भारतानं 30 सामने जिंकले आहेत.

आतापर्यंत बिंद्रा मौदानावर झाले 26 सामने : या मैदानावर आतापर्यंत 26 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 15 सामने जिंकले आहेत, तर दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने 11 सामने जिंकले आहेत. या खेळपट्टीवर एकदिवसीय सामन्यातील पहिल्या डावाची सरासरी धावसंख्या 265 धावांची आहे, तर दुसऱ्या डावाची सरासरी धावसंख्या 228 आहे.

सामन्या दरम्यान हवामान अंदाज : भारत, ऑस्ट्रेलिया यांच्यातील संपूर्ण सामना तुम्हाला सलग पाहायला मिळण्याची शक्यता आहे. या सामन्यात पावसाची शक्यता सध्या तरी दिसत नाहीय. हवामान खात्याच्या अहवालानुसार, बिंद्रा स्टेडीयमवर पावसाची शक्यता 0 टक्के आहे. याशिवाय दुपारचं तापमान 32 अंश, तर सायंकाळी तापमान 36 अंशांपर्यंत राहण्याची शक्यता आहे.

हेही वाचा -

  1. ICC ODI World Cup 2023 Trophy : जगातील सर्वात मोठ्या फिल्म सिटीत क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी प्रदर्शित, पहा व्हिडिओ
  2. ICC World Cup Trophy : रामोजी फिल्म सिटीमध्ये प्रदर्शित होणार आयसीसी विश्वचषक ट्रॉफी, जाणून घ्या ट्रॉफीबद्दल सर्वकाही
  3. IND Vs SL Final Match : भारतीय संघाकडून 'लंका पतन'; भारताचा 10 गडी राखून धडाकेबाज विजय, आशिया कपावर आठव्यांदा कोरलं नाव
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.