ETV Bharat / bharat

Horoscope : या राशीच्या व्यक्तींचा निष्काळजीपणा करू शकतो मोठे नुकसान, वाचा आजचे राशीभविष्य...

author img

By

Published : May 23, 2023, 4:09 PM IST

Updated : May 24, 2023, 7:58 AM IST

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 24 मेच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horoscope
आजचे राशीभविष्य

मेष : ह्या आठवड्यात आपला आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. विवाहित व्यक्ती आपल्या जोडीदारासह फिरावयास जाण्याची योजना आखतील व घरातील कामात सुद्धा एकमेकांना मदत करतील. प्रणयी जीवनात आपली कृतिशीलता कामी आल्याने आपल्या प्रेमिकेचा रुसवा दूर होईल व आपण तिच्यासह फिरावयास जाण्याचा कार्यक्रम आखाल. आपण आपल्या प्रोफाइल मध्ये सुधारणा करण्याचा खूप प्रयत्न कराल. काही नवीन ठिकाणी नोकरीसाठी मुलाखत देऊ शकाल, ज्यात आपणास यश प्राप्तीची संभावना असेल. एखादी नवीन नोकरी मिळविण्यात यशस्वी होऊ शकता. व्यापारी अत्यंत आनंदात असतील व आपल्या व्यापाराची प्रगती पाहून खुश होतील. ते ह्या दिशेने अजून सुद्धा जास्त प्रयत्न करतील. विद्यार्थ्यांना अध्ययनात काही अडथळे येतील. त्यांना एकाग्र होण्यात त्रास होईल. म्हणून त्यांना ध्यानधारणा करावी लागेल. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक कोणताही त्रास होताना दिसत नसला तरी आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. आठवड्याचा अखेरचा दिवस वगळता इतर सर्व दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृश्चिक : हा आठवडा आपल्यासाठी आनंददायी आहे. विवाहितांसाठी आठवडा उत्तम असून दांपत्य जीवनाच्या बाबतीत आपण निश्चिन्त राहाल. एकमेकांत सामंजस्य राहील. प्रेमीजनांना मात्र काहीसा त्रास जाणवेल. त्यांच्यात सामंजस्याचा अभाव असल्याचे दिसून येईल. घरगुती खर्च व घरगुती कामे ह्यावर जास्त लक्ष राहील. जमीन - जुमल्याशी संबंधित गोष्टी आपले लक्ष वेधून घेतील. त्यासाठी भरपूर खर्च सुद्धा होईल. ह्या आठवड्यात आपण खर्चाच्या भोवऱ्यात अडकल्याचे दिसून येईल. आपल्या प्राप्तीत कपात होऊन खर्च अत्यंत तीव्र वेगाने वाढू शकतात. ह्या खर्चांवर आपले नियंत्रण न राहिल्याने आपणास त्रास होईल, तेव्हा सावध राहा. ह्या आठवड्यात कोणतेही नवीन कर्ज घेऊ नका, अन्यथा त्रास होईल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती आपणास अनुकूल राहील. कोणाशीही वाद होणार नाही याची दक्षता घ्यावी. व्यापारात उत्तम यश प्राप्ती संभवते. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी उत्तम आहे. त्यांचे अभ्यासात मन लागून त्यांना त्याचे चांगले परिणाम सुद्धा मिळतील. ह्या आठवड्यात आपली प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. एखादी दुखापत सुद्धा संभवते. तेव्हा काळजी घ्यावी. आठवड्याचे सुरवातीचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मिथुन : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात प्रगती करण्याचा विचार करतील. संतती प्राप्तीची इच्छा जागृत होऊ शकते. प्रणयी जीवनात चढ - उतार येऊन सुद्धा नात्यातील प्रेम टिकून राहील. आठवड्याच्या सुरवातीस आपण मित्रांसह एखाद्या ठिकाणी फिरावयास जाऊ शकता. आपल्या शेजाऱ्यांशी आपला सलोखा राहील. आपल्या लहान भावंडांचा सुद्धा आपणास पाठिंबा मिळेल. आपल्या प्राप्तीत वाढ झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीच्या ठिकाणी मात्र काही लोकांपासून आपणास सतर्क राहावे लागेल. ते आपले वरिष्ठ सुद्धा असू शकतात. कोणाशीही क्रोधीत होऊन संवाद करू नका, विषय समजून घेऊनच पुढे जावे. हा आठवडा व्यापाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. ते आपल्या कामात वेगाने प्रगती करतील. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल. त्याचे त्यांना चांगले परिणाम मिळतील. ह्या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहील. असे असून सुद्धा आपणास आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. आठवड्याच्या सुरवाती पासून ते मध्या पर्यंतचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कर्क : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात काही नवीन अनुभव आले तरी जोडीदाराच्या वागणुकीचा आपणास थोडा त्रास होऊ शकतो. आपल्या जोडीदाराचे लहान - सहान गोष्टींवरून क्रोधीत होणे ह्यास कारणीभूत होऊ शकते. प्रणयी जीवन सुखद असेल. नात्यात दृढता राहील. एकमेकांवरील विश्वास वाढेल. आपण आपल्या प्रणयी जीवनात समाधानी असल्याचे दिसून येईल. आपणास काही नवीन काम करण्याची संधी सुद्धा मिळेल. आपली ऊर्जा वृद्धिंगत होईल. आपण काही नवीन कामे हाती घ्याल, ज्यामुळे आपण खुश व्हाल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात मग्न राहतील, परंतु काही लोकांशी आपले मतभेद सुद्धा संभवतात. व्यापारी आपल्या कामांसाठी खूप मेहनत करतील. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी खूपच चांगला आहे. त्यांना अभ्यासात आपली प्रतिभा दाखविण्याची संधी मिळेल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. अति श्रमाचा प्रभाव आपल्या प्रकृतीवर होताना दिसून येईल. तेव्हा काळजी घ्यावी. आठवड्याचे सुरवातीचे व मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

सिंह : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात समाधान अनुभवास येईल. खूप दिवसा नंतर आपण जोडीदाराच्या सहवासात वेळ घालवू शकाल. प्रेमीजनांना आपल्या नात्यात दृढता प्राप्त होईल. आपल्या नात्यास ईश्वरकृपा लाभल्याने आपले नाते दृढपणे प्रगती करेल. आपण आपल्या प्रेमिकेस विवाहासाठी मागणी सुद्धा घालू शकता. आपण आपल्या इच्छेनुसार काम करण्याचा प्रयत्न कराल, त्यातच आपणास फायदा व यश प्राप्त होईल. मित्रांचे सहकार्य मिळेल. एखाद्या धार्मिक स्थळी सुद्धा जाऊ शकता. आपल्या प्राप्तीत मोठी वाढ झाल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती उत्तम असेल. व्यापारी स्वतःला अनुभवी समजून त्याच्या आधारे नवीन संपर्क स्थापित करून व्यापारात प्रगती करतील. हा आठवडा विद्यार्थ्यांना अनुकूल आहे. जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असतील त्यांच्यासाठी तर हा आठवडा अत्यंत अनुकूल आहे. ह्या आठवड्यात आरोग्य विषयक कोणतीही मोठी समस्या असल्याचे दिसत नाही. असे असले तरी आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल, तसेच आपल्या दिनचर्येत नियमितता बाळगावी लागेल. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.

कन्या : हा आठवडा आपल्यासाठी मिश्र फलदायी आहे. विवाहितांना आपले वैवाहिक जीवन सुखद असल्याचे जाणवेल. सासुरवाडी कडील लोकांशी सुद्धा सलोखा राहील. असे असले तरी लहान - सहान वाद सुद्धा संभवतात. जोडीदाराची प्रकृती उत्तम राहील. कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही ह्यासाठी आपण प्रयत्नशील राहाल. प्रणयी जीवनासाठी आठवडा सामान्यच आहे. आपली प्रेमिका आपले म्हणणे टाळणार नाही यासाठी आपण प्रयत्न कराल. ह्या आठवड्यात आपल्यात आत्मविश्वासाचा थोडा अभाव असण्याची संभावना आहे. त्यामुळे काही ठिकाणी आपल्या कामात सुद्धा खोळंबा होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा सामान्यच आहे. आपण एखादे मोठे आव्हान स्वीकारून वाटचाल कराल. व्यापाऱ्यांना आपल्या व्यापारवृद्धीसाठी एखाद्या व्यक्तीच्या मदतीची आवश्यकता भासेल. विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. त्यांना आपल्या अध्ययनात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती बिघडण्याची संभावना असून आपण आजारी पडू शकता. आपली रोग प्रतिकार शक्ती कमकुवत होईल. ह्या दरम्यान शक्यतो प्रवाही पदार्थ व भाज्यांचे सेवन करावे, कि ज्यामुळे आपली प्रकृती बिघडणार नाही. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

तूळ : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. असे असले तरी सध्या आपण कौटुंबिक जीवनापासून काहीसे दूर राहाल. दांपत्य जीवनात सुद्धा काही प्रमाणात तणाव असू शकतो. हा तणाव दूर करण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा वाद वाढू शकतो. प्रणयी जीवनासाठी आठवडा अनुकूल आहे. आपण आपल्या प्रेमिकेस आपल्या स्थितीची जाणीव करून द्याल. आपल्या मनात धार्मिक विचार येतील एखाद्या मंदिरात किंवा धार्मिक ठिकाणी जाऊन बराच वेळ ध्यान करत बसणे आपणास आवडेल. नोकरी करणाऱ्यांना आपल्या कामात वरिष्ठांच्या मदतीची आवश्यकता भासेल. व्यापारी आपल्या कामात मोठी वाढ करण्यासाठी विचार - विनिमय करताना दिसतील. ह्या आठवड्यात विद्यार्थी आपल्या अध्ययनात खूप मग्न असल्याचे दिसून येईल. आरोग्याच्या दृष्टीने आपणास ह्या आठवड्यात तणावा पासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा लागेल. कामात खूप मेहनत केल्याने थकवा जाणवेल. तो जाणवू नये म्हणून आपणास विश्रांतीची गरज भासेल. त्याचे आपणास चांगले परिणाम मिळत असल्याचे दिसून येईल. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

वृश्चिक : हा आठवडा आपल्यासाठी बहुतांशी चांगला आहे. प्रणयी जीवनासाठी आठवडा उत्तम आहे. आपले काही मित्र आपले प्रणयी जीवन अधिक बहारदार करण्यासाठी मदत करू शकतील. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकतील. जोडीदाराचे सहकार्य प्राप्त होईल. नात्यात रोमांस सुद्धा राहील. आपणास आपल्या कार्यात यश प्राप्त होईल. नशीब बलवान असल्याने मनात खुशीची भावना राहील. नोकरीसाठी केलेले प्रयत्न यशस्वी झाल्याने आपली स्थिती मजबूत होईल. व्यापारास गती आल्याने आपण खुश व्हाल. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चढ - उतारांचा आहे. हे लक्षात ठेवावे. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. ह्या आठवड्यात आपणास आजारपण येण्याची संभावना आहे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

धनु : हा आठवडा आपल्यासाठी खूपच चांगला आहे. प्रणयी जीवनासाठी मात्र आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. एकमेकात गैरसमज संभवतो. विवाहितांचा जोडीदाराशी समन्वय उत्तम राहील. ह्या आठवड्यात आपली इच्छापूर्ती होईल. नशिबाची साथ मिळाल्याने आपली प्रलंबित कामे पूर्णत्वास जातील. आपण जे काम हाती घ्याल त्यात आपणास यश प्राप्त होईल. आर्थिक लाभ संभवतात. आपल्याकडे अनेक मार्गाने पैसा येऊ शकतो. कोणास उसने पैसे दिले असल्यास ते परत मिळतील. जुने कर्ज फेडण्यास नवीन कर्ज घेऊ शकता. नोकरीत स्थिती उत्तम राहील. व्यापाऱ्यांना चढ - उतारांचा सामना करावा लागू शकतो. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. लक्ष विचलित होणाऱ्या स्थितीत ध्यानधारणा केल्यास लाभ होऊ शकतो. ह्या आठवड्यात आपली प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. पोटाचे विकार आपणास त्रस्त करू शकतात. तेव्हा साधे भोजन घ्यावे व मनात चांगले विचार करावेत. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मकर : हा आठवडा आपल्यासाठी मध्यम फलदायी आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनात खुश असल्याचे दिसून येईल. परंतु जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. प्रणयी जीवनासाठी आठवडा सकारात्मक आहे. ह्या आठवड्यात आपणास अचानक धनलाभ होण्याची संभावना आहे. आपला अडकलेला पैसा सुद्धा मिळू शकतो. आपण कोणास उसने पैसे दिले असल्यास अचानकपणे ते पैसे आपणास मिळू शकतात. त्यामुळे आपण अत्यंत आनंदित व्हाल. आपण हे पैसे नवीन कामात गुंतवू शकता. नोकरीत परिस्थिती नाजूक असल्याने सावध राहावे. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे. आपण व आपले व्यावसायिक भागीदार एकत्रितपणे काम करू लागल्यास आपल्या विचारांमुळे एखादा नवीन सौदा सुद्धा होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. स्पर्धेत यश मिळाल्याने ते खुश होतील. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. शक्यतो तेलकट व मसालेदार पदार्थ आहारातून टाळावेत. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

कुंभ : हा आठवडा आपल्यासाठी आनंद घेऊन येणारा आहे. मित्रांसह मौजमजा करण्याची संधी मिळेल, एखाद्या ठिकाणी फिरावयास सुद्धा जाऊ शकता. वैवाहिक जोडीदाराशी सुद्धा संबंध सुधारल्याने वैवाहिक जीवन सुखद होईल. आपल्या प्रणयी जीवनात मित्रांचा हस्तक्षेप संभवतो, तो टाळण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा नात्यात समस्या वाढू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा सामान्यच आहे. आपणास नोकरीची एखादी नवीन संधी मिळू शकते. प्रवासाचा आपल्या व्यापारास फायदा होऊ शकतो. काही नवीन योजनांवर काम झाल्याने व्यापारास गती येऊन आपणास लाभ होईल. विद्यार्थी अभ्यास करण्याची इच्छा व्यक्त करतील. त्यांना अभ्यासासाठी शांत जागा व वातावरणाची गरज भासेल. हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने आपल्यासाठी चांगला आहे. कोणतीही मोठी समस्या होताना दिसत नाही. आठवड्याचे सुरवातीचे व अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

मीन : हा आठवडा आपल्यासाठी सामान्य फलदायी आहे. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखावह राहील. प्रणयी जीवन सुद्धा सुखद असल्याचे दिसून येईल. कौटुंबिक व्यवसायात यश प्राप्ती झाल्याने कुटुंबाचा मान - सन्मान वृद्धिंगत होईल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीस एखादा मोठा पुरस्कार मिळू शकतो. आपणास मित्रां कडून सुद्धा लाभ होईल. आठवड्याच्या सुरवातीस आपल्या प्राप्तीत वृद्धी होईल. असे असले तरी आठवड्याच्या मध्यास काही खर्च सुद्धा वाढतील. त्यामुळे आपण चिंतीत व्हाल. परंतु आठवड्याच्या अखेरीस परिस्थितीत सुधारणा होईल व आपण त्रासमुक्त व्हाल. आपले वाकचातुर्य आपणास अग्रस्थानी ठेवेल व आपल्या हजर जवाबीपणामुळे आपली बरीच कामे होतील. ह्या आठवड्यात आपण जी गोष्ट बोलू नये अशी एखादी गोष्ट बोलाल. त्याचे परिणाम आपणास भोगावे लागू शकतात. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल. वेळापत्रक बनवून अभ्यास केल्यास त्यांना फायदा होईल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती चांगली राहील. कोणतीही समस्या होताना दिसत नाही. आठवड्याचे अखेरचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.

Last Updated : May 24, 2023, 7:58 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.