ETV Bharat / bharat

Weather Update : उत्तर भारतात पावसामुळे हाहाकार, रस्ते जलमय ; चंदीगडमध्ये 23 वर्षांचा विक्रम मोडला!

author img

By

Published : Jul 9, 2023, 4:03 PM IST

उत्तर भारतात पावसामुळे हाहाकार उडाला आहे. डोंगरासह मैदानी भागात मुसळधार पाऊस पडत आहे. चंदीगडमध्ये गेल्या 30 तासांत इतका पाऊस झाला की, 23 वर्षांचा विक्रम मोडला गेला आहे. हरियाणातही पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. पंचकुला येथे दरड कोसळल्याने मोरनी-पंचकुला रस्ता बंद आहे.

heavy rainfall in north India
उत्तर भारतात मुसळधार पाऊस

चंदीगड : चंदीगडमध्ये पावसाने गेल्या 23 वर्षांचा विक्रम मोडला आहे. चंदीगड हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चंदीगडमध्ये गेल्या 30 तासांत तब्बल 322.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यापूर्वी 18 जुलै 2000 रोजी शहरात 262 मिमी पावसाची नोंद झाली होती. गेल्या 30 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे चंदीगडमधील रस्त्यांवर पाणी साचले आहे. चंदीगड पोलिसांनी शहरातील अनेक मार्ग बंद केले आहेत.

5 दिवस पाऊस असाच सुरु राहील : चंदीगड हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, येत्या 5 दिवसांत पाऊस असाच सुरू राहील. 9 जुलै म्हणजेच रविवारी दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर 10 जुलै रोजीही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हरियाणाबद्दल बोलायचे झाले तर, हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, यमुनानगर जिल्ह्यातील रादौरमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासात येथे 246 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कुठे किती पाऊस झाला? : कालकामध्ये 244 आणि पंचकुलामध्ये 239 मिमी पाऊस झाला आहे. याशिवाय अंबाला येथे 224 मिमी तर बरवाला येथे 220 मिमी पाऊस झाला आहे. दुसरीकडे, कुरुक्षेत्रात गेल्या 24 तासांत 229 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हरियाणातील फतेहाबाद येथे सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. येथे सुमारे 47 मिमी पाऊस झाला आहे. यासह, हरियाणाचे कमाल तापमान 34.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. त्याच वेळी, अंबाला येथे सर्वात कमी 18.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे.

पंचकुलामध्ये भूस्खलन : मुसळधार पावसामुळे मोर्नी येथे दरड कोसळली. त्यामुळे मोर्नी-पंचकुला रस्ता अनेक तास बंद होता. डगराणा गावाजवळ डोंगराचा मोठा भाग रस्त्यावर पडला. त्यामुळे मोरनी ते थापलीमार्गे पंचकुला हा रस्ता विस्कळीत झाला होता. दरड कोसळल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पंचकुलामध्ये मुसळधार पावसामुळे भुड गावाजवळ एक मोठे झाड रस्त्यावर पडले. त्यामुळे ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण झाली होती.

  • #WATCH हरियाणा: पंचकुला के मोरनी हिल्स पर भारी बारिश के कारण भूस्खलन हुआ। pic.twitter.com/MaH7XqHEG3

    — ANI_HindiNews (@AHindinews) July 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

गुरुग्राममध्ये पावसामुळे पाणी साचले : गुरुग्राममध्येही मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. पाणी साचल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रविवारमुळे शहरात वाहतूककोंडीसारखी समस्या निर्माण झाली नसली तरी पाणी साचल्याने वाहनांचा वेग मंदावला होता. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुग्राममधील बादशाहपूरमध्ये 103 मिमी पाऊस झाला आहे.

  • #WATCH | Chandigarh receives light rainfall

    Chandigarh to witness generally cloudy sky with one or two spells of rain or thundershowers today, says IMD. pic.twitter.com/8cIgMQs3tb

    — ANI (@ANI) July 9, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा :

  1. Car Drowned In Uttarakhand : उत्तराखंडमध्ये जलप्रलय!, पर्यटकांची कार गेली वाहून ; पहा व्हिडिओ
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.