ETV Bharat / bharat

Stopped Manufacturing Cough Syrup : आरोग्य मंत्रालयाने डॉक१ मॅक्स कफ सिरपचे उत्पादन थांबवले ; कंपनीवर कारवाई होण्याची शक्यता

author img

By

Published : Dec 31, 2022, 11:56 AM IST

कफ सिरपमध्ये भेसळ प्रकरण्यात ( Adulterated in cough syrup ) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सध्या नोएडास्थित मेरियन बायोटेकच्या डॉक-१ मॅक्सच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. उझबेकिस्तानमध्ये कफ सिरप घेतल्याने 18 मुलांचा मृत्यू झाला होता.( Uzbekistan Children Death ) तर नोएडास्थित मेरियन बायोटेक कंपनी डॉक-१ मॅक्स कफ सिरप तयार करते.( Stopped Manufacturing Of Dok1 Max Cough Syrup )

Health Minister Mansukh Mandaviya
आरोग्य मंत्री मनसुख मांडविया

नवी दिल्ली : भारत हा उझबेकिस्तानला कफ सिरप आणि इतर औषधांचा मोठा पुरवठादार आहे. ( India is a major supplier of medicines ) गुरुवारी, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) आणि यूपी ड्रग्ज कंट्रोलच्या संयुक्त पथकाने नोएडामधील मेरियन बायोटेकच्या उत्पादन युनिटची तपासणी केली. आरोग्य मंत्री मनसुख मांडविया ( Health Minister Mansukh Mandaviya ) म्हणाले, सीडीएससीओ टीमने कफ सिरप डॉक 1 मॅक्समध्ये भेसळ झाल्याचा अहवाल दिल्यानंतर काल रात्री नोएडा युनिटमधील मेरियन बायोटेकचे सर्व उत्पादन थांबवण्यात आले आहेत, तर पुढील तपास सुरू आहे. ( Health Ministry Stopped Manufacturing Of Dok1 Max Cough Syrup )

ड्रग कंट्रोलरचा परवाना : सीडीएससीओ उझबेकिस्तानच्या राष्ट्रीय औषध नियामकाच्या ( National drug regulator Uzbekistan ) सतत संपर्कात आहे. मैरियन बायोटेक ( Marion Biotech ) एक परवानाधारक उत्पादक आहे आणि निर्यातीच्या उद्देशाने डॉक1 मैक्स कॉग आणि टॅब्लेटचे उत्पादन करण्यासाठी उत्तर प्रदेशातील ड्रग कंट्रोलरचा परवाना त्याच्याकडे आहे. आरोग्य मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ईटीव्ही भारतला सांगितले की, कंपनी कोणत्याही गैरव्यवहारात गुंतल्याचे आढळल्यास, तिचा परवाना रद्द केला जाऊ शकतो.

सिरपच्या वापरामुळे 18 मुलांचा मृत्यू : ( 18 children died ) यापूर्वी, कफ सिरपचे नमुने चाचणीसाठी प्रादेशिक औषध चाचणी प्रयोगशाळा (RDTL) चंदीगड येथे पाठवण्यात आले आहेत. उझबेकिस्तानमध्ये डॉक-1 मॅक्स सिरपच्या वापरामुळे 18 मुलांचा मृत्यू झाल्यानंतर, ( Uzbekistan Children Death ) उझबेकिस्तानमधील सरकारने मॅरियन बायोटेकच्या कायदेशीर प्रतिनिधीविरुद्ध आधीच कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानेही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.

कायदेशीर कारवाई सुरू : एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, उझबेकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी हे प्रकरण परराष्ट्र मंत्रालयाकडे नेले नसले तरी उझबेकिस्तानमधील दूतावासाने त्यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्या तपासाबाबत अधिक माहिती मागितली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी गुरुवारी सांगितले, आम्हाला समजले आहे की उझबेकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी कंपनीच्या स्थानिक प्रतिनिधीसह काही लोकांवर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.

या आधी सिरपच्या सेवनामुळे मृत्यू : ( Uzbekistan Children Death ) उझबेकिस्तानमध्ये कफ सिरपमुळे 18 मुलांचा मृत्यू झाला होता. उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने यासाठी भारतीय औषधाच्या कंपनीला जबाबदार धरले आहे. आरोग्य मंत्रालयने सांगितलं की, मृत झालेल्या 18 मुलांनी नोएडा येथील मॅरियन बायोटेकमध्ये तयार झालेल्या डॉक-1 मॅक्स सिरपचं सेवन केले होते. उज्बेकिस्तानच्या आरोग्य मंत्रलयाने 18 जणांच्या मृत्यूसाठी भारताला जबाबदार धरले. गँबियामध्ये 66 मुलांचा कप सिरपच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याचे प्रकरण शांत होते ना होते तोच हे नवीन प्रकरण समोर आले आहे. उज्बेकिस्तान सरकार म्हटले की, मॅरियन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या कफ सिरपमुळे 18 मुलांचा मृत्यू झाला आहे. ही कंपनी 2012 मध्ये उज्बेकिस्तानमध्ये रजिस्टर्ड झाली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.