ETV Bharat / bharat

कोरोना लसीकरण मोहिमेवर टीका करणाऱ्यांवर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची टीका, म्हणाले...

author img

By

Published : Jul 1, 2021, 8:28 PM IST

लसीकरण मोहिमेवर राजकीय पक्षांकडून टीका होत असताना केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की विविध नेत्यांकडून कोरोना लसीकरण मोहिमेबाबत बेजबाबदार विधाने होत असल्याचे दिसत आहेत. कें

Harsh Vardhan
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन

नवी दिल्ली -कोरोना लसीकरण मोहिमेवर राजकीय नेत्यांकडून बेजबाबदार वक्तव्ये होत असल्याची टीका केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केली. कोरोना लसीकरण मोहिमेत जुलैमध्ये १२ कोटी डोस उपलब्ध होणार असल्याची त्यांनी दिली आहे. राजकीय नेत्यांनी भीती निर्माण करू नये, अशी विनंती आरोग्य मंत्र्यांनी केली आहे.

लसीकरण मोहिमेवर राजकीय पक्षांकडून टीका होत असताना केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी ट्विट करून नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की विविध नेत्यांकडून कोरोना लसीकरण मोहिमेबाबत बेजबाबदार विधाने होत असल्याचे दिसत आहेत. केंद्र सरकारने ७५ टक्के लस मोफत उपलब्ध केली आहे. लसीकरणाचा वग वाढून जूनमध्ये ११.५० कोटी लशींचे डोस देण्यात आले आहेत. जुलैमध्ये होणाऱ्या लशींच्या पुरवठ्याची माहिती राज्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा-VIDEO: गावात शिरली मगर, रस्त्यावरुन चालतानाचा व्हिडिओ व्हायरल

राज्यांतर्गत वाहतूक आणि नियोजनाची जबाबदारी ही राज्यांकडे!

राज्यांना लसीकरणाबाबत १५ दिवसांपूर्वी माहिती देण्यात आली होती. त्यामध्ये रोज होणाऱ्या पुरवठ्याटी माहिती देण्यात आली आहे. खासगी रुग्णालयांना करण्यात येणाऱ्या लस पुरवठ्याबाबतही माहिती देण्यात आली आहे. कोरोनाच्या काळात राजकारण करू नये. राज्यांतर्गत वाहतूक आणि नियोजनाची जबाबदारी ही राज्यांकडे असल्याचेही केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा-DOCTORS DAY कोरोनात लोकांचे प्राण वाचविल्याने पंतप्रधानांकडून डॉक्टरांचे कौतुक

राज्यांच्या नेत्यांनी त्यांची उर्जा ही नियोजनावर खर्च करावी-
जर नेत्यांना माहित असतानाही ते बेजबाबदार विधाने करत असतील तर मला वाटते ही सर्वाधिक दुर्दैवी बाब आहे. जर त्यांना माहित नसेल तर त्यांना प्रशाकीय बाबीवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. राज्यांच्या नेत्यांनी त्यांची उर्जा ही नियोजनावर खर्च करावी. चिंताजनक स्थिती तयार करण्यासाठी वापरू नये.

दरम्यान, झारखंड, छत्तीसगड, राजस्थान या राज्यांनी कोरोना लशीचा कमी पुरवठा होत असल्याचे म्हटले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.