ETV Bharat / bharat

Gujrat Election 2022 : आज निकाल, 'घाटलोडिया' च्या हायप्रोफाईल सीटवर भूपेंद्र पटेलांनी मारली बाजी

author img

By

Published : Dec 8, 2022, 5:01 AM IST

Updated : Dec 8, 2022, 2:00 PM IST

यावेळी अहमदाबादच्या घाटलोडिया विधानसभेच्या जागेवर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल 66,337 मते मिळवून (CM Bhupendra Patel ghatlodia assembly seat) विजयी झाले आहेत. त्यांच्यासह भाजपचे इतर 13 उमेद्ववार देखील विजयी झाले आहेत.भाजपची ही सर्वात सुरक्षित जागा मानली जाते, कारण भाजपने ही जागा कधीही गमावलेली नाही. (Gujrat Election 2022).

Etv Bharat
Etv Bharat

अहमदाबाद : यावेळी अहमदाबादच्या घाटलोडिया विधानसभेच्या जागेवर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल 66,337 मते मिळवून (CM Bhupendra Patel ghatlodia assembly seat) विजयी झाले आहेत. त्यांच्यासह भाजपचे इतर 13 उमेद्ववार देखील विजयी झाले आहेत. ही तीच जागा आहे, जिने राज्याला 2-2 मुख्यमंत्री दिले आहेत. यावेळीही भाजपने या जागेवरून मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (CM Bhupendra Patel) यांना उमेदवारी दिली आहे. (Gujrat Election 2022).

जागेचे महत्त्व : घाटलोडिया विधानसभा जागा गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. या भागात सर्वाधिक पाटीदार मतदार आहेत. या जागेवरून गुजरातला 2 मुख्यमंत्री मिळाले आहेत. तसेच, ही जागा गृहमंत्री अमित शहा यांच्या मतदारसंघात येते. 2016 मध्ये जेव्हा पाटीदार आंदोलनामुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले होते, तेव्हा घाटलोडिया हे आंदोलनाचे मुख्य केंद्र होते. तत्कालीन मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर भूपेंद्र पटेल हे मुख्यमंत्री झाले. ते देखील घाटलोडिया मतदारसंघातून निवडून आले होते.

या जागेवर किती मतदान झाले : 2022 मध्ये या जागेवर 59.62 टक्के मतदान झाले, तर 2017 मध्ये 68.71 टक्के मतदान झाले होते. म्हणजेच यावेळी 9.09 टक्के घट नोंदवण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबादमध्ये रोड शो व सभा घेऊन रेकॉर्डब्रेक मतदान करण्याचे आवाहन केले होते. मात्र, यावेळी राज्यभरात मतदानात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे त्यांच्या आवाहनाचा मतदारांवर काहीही परिणाम झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या जागेवर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल विरोधात काँग्रेसने ज्येष्ठ नेत्या अमीबेन याज्ञिक यांना तर आम आदमी पक्षाने सामाजिक कार्यकर्ते विजय पटेल यांना उमेदवारी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनीही मतदारांना आकर्षित करण्यासाठी येथे रोड शो केला होता. मात्र काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचे उमेदवार प्रचारासाठीही आले नाहीत.

जातीय समीकरण : या जागेवर पाटीदारांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. याशिवाय रबारी, भारवाड, ठाकोर जातीही येथे आहेत. त्यामुळे पाटीदारांसोबतच इतर जातीतील लोकांचाही मतदानात महत्त्वाचा वाटा आहे. या मतदारसंघात साक्षरतेचे प्रमाण 83 टक्के आहे. त्यात महिलांच्या साक्षरतेचे प्रमाण 80 टक्के असल्याचे आहे.

Last Updated : Dec 8, 2022, 2:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.