ETV Bharat / bharat

GT vs SRH : गुजरात टायटन्सचा सनरायझर्स हैदराबादवर पाच गडी राखून विजय

author img

By

Published : Apr 28, 2022, 6:59 AM IST

GT vs SRH
GT vs SRH

गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 6 गडी गमावून 195 धावा केल्या. ( Gujarat Titans beat Sunrisers Hyderabad ) प्रत्युत्तरात गुजरात संघाने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला. सध्या हैदराबाद संघ आठ सामन्यांतून पाच विजय आणि 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

मुंबई - गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा पाच गडी राखून पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने 20 षटकांत 6 गडी गमावून 195 धावा केल्या. प्रत्युत्तरात गुजरात संघाने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला. गुजरात संघाला शेवटच्या षटकात 22 धावा करायच्या होत्या. ( Gujarat Titans beat Sunrisers Hyderabad ) त्यानंतर राहुल तेवतिया आणि रशीद खान क्रीजवर होते. मार्को यानसेन शेवटच्या षटकात गोलंदाजी करायला आला. तेवतियाने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला. तेवतियाने दुसऱ्या चेंडूवर धाव घेतली.


यानसेनच्या तिसऱ्या चेंडूवर राशिदने षटकार ठोकला. चौथ्या चेंडूवर राशिदला एकही धाव करता आली नाही. पाचव्या चेंडूवर रशीदने पुन्हा एकदा षटकार ठोकला. शेवटच्या चेंडूवर गुजरातला विजयासाठी तीन धावांची गरज होती. (Hyderabad lost 6 wickets) रशीदनेही या चेंडूवर षटकार ठोकत गुजरातला सामना जिंकून दिला. हैदराबादकडून उमरान मलिकने पाच बळी घेतले. त्याने चार षटकात 25 धावा देऊन चार विकेट घेतल्या. त्याच्याशिवाय हैदराबादचे उर्वरित गोलंदाज अपयशी ठरले.

रशीद खानच्या 31 धावा आणि राहुल तेवतियाच्या नाबाद 40 धावांच्या जोरावर गुजरात टायटन्सने सनरायझर्स हैदराबादचा 5 गडी राखून पराभव करत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. ( GT vs SRH IPL 2022 ) सलामीवीर अभिषेक शर्मा (65) आणि एडन मार्कराम (56) यांनी शानदार अर्धशतके आणि शशांक सिंगच्या नाबाद 25 धावांच्या जोरावर हैदराबादने 6 बाद 195 अशी भक्कम धावसंख्या उभारली. पण गुजरातने विकेट गमावूनही 20 षटकांत 5 बाद 199 धावा केल्या, शेवटच्या षटकात चार षटकार मारत आठ सामन्यांमधला सातवा विजय मिळवला आणि प्लेऑफच्या जवळ पोहोचले. मोठी धावसंख्या उभारूनही हैदराबादला त्याचा बचाव करता आला नाही आणि आठ सामन्यांत तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.


विजयासाठी 196 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातला शेवटच्या षटकात 22 धावांची गरज होती. मार्को जॅन्सनच्या पहिल्या चेंडूवर राहुल तेवतियाने षटकार ठोकला आणि दुसऱ्या चेंडूवर धाव घेतली. रशीदच्या नावावर (११ चेंडूत नाबाद ३१) ज्याने शेवटच्या चेंडूवर फाइन लेगमध्ये षटकार मारून अशक्य ते शक्य केले. दरम्यान, या विजयासह गुजरातचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. आठ सामन्यांत सात विजयांसह त्यांचे 14 गुण आहेत. संघाने आतापर्यंत फक्त एकच सामना गमावला आहे. हैदराबाद संघ आठ सामन्यांतून पाच विजय आणि 10 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

हेही वाचा - इंधनावरील व्हॅट कमी करण्याच्या आवाहनावरून विरोधी नेत्यांची पंतप्रधान मोदींवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.