ETV Bharat / bharat

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी घेतले केदारनाथांचे दर्शन.. एक लाखाहून अधिक भाविक केदारनाथमध्ये दाखल

author img

By

Published : Oct 20, 2021, 5:20 PM IST

मागील काही दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर आज हवामान स्वच्छ झाल्याने तीर्थयात्राकरूंना दिलासा मिळाला आहे. प्रशासनाने बुधवारी सकाळी 12 हजाराहून अधिक तीर्थयात्रा करूंना केदारनाथकडे सोडले. दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीही केदारनाथांचे दर्शन घेतले.

bhagat-singh-koshyari-visit-kedarnath
bhagat-singh-koshyari-visit-kedarnath

रुद्रप्रयाग - मागील काही दिवसांपासून कोसळलेल्या मुसळधार पावसानंतर आज हवामान स्वच्छ झाल्याने तीर्थयात्राकरूंना दिलासा मिळाला आहे. केदारनाथ जाण्यासाठी तीर्थयात्राकरू अनेक ठिकाणी अडकून पडले होते. हवामान स्वच्छ होताच भाविक मोठ्या उत्साहाने केदारनाथकडे रवाना झाले. प्रशासनाने बुधवारी सकाळी 12 हजाराहून अधिक तीर्थयात्रा करूंना केदारनाथकडे सोडले. दरम्यान महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनीही केदारनाथांचे दर्शन घेतले. यावेळी रुद्रप्रयाग ते सोनप्रयाग दरम्यान महामार्गावर यात्रेकरूंना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी घेतले केदारनाथांचे दर्शन

हवामान विभागाने जारी केलेल्या हाय अलर्टनंतर तीन दिवस उत्तराखंड राज्यात मुसळधार पाऊस बरसला. पावसामुळे प्रशासनाने केदारनाथ यात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित केली. यामुळे अनेक यात्रेकरून ठिकठिकाणी अडकून पडले. रात्रीच्या वेळी राहण्या व खाण्याची समस्याही भेडसावली. बुधवारी सूर्यदर्शन झाल्याने तीर्थयात्रेकरूंचे चेहरे खुलले व ते पुढच्या यात्रेसाठी रवाना झाले.

भगत सिंह कोश्यारींनी घेतले बाबा केदारनाथांचे दर्शन -

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज केदारनाथांचे दर्शन घेतले. मंदिर पुजाऱ्यांनी त्यांना तेथील समस्या सांगितल्या. या समस्या लवकरच सोडविण्याचे आश्वासन कोश्यारी यांनी दिले. प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे की, आज हवामान स्वच्छ असल्याने 12 हजाराहून अधिक तीर्थकरूंना केदारनाथ धामसाठी रवाना करण्यात आले. त्याचबरोबर हेली सेवेच्या माध्यामातूनही तीर्थकरू केदारनाथ धाम पोहचत आहे. आतापर्यंत केदारनाथमध्ये दाखल होणाऱ्यांचा आकडा एक लाख 15 हजारांहून अधिक झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.