ETV Bharat / bharat

गोवा सरकारने महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करावी - पर्यटकांचा सूर

author img

By

Published : Aug 1, 2021, 1:32 PM IST

Goa government
गोव्यातील सरकारने सक्त होत महिलांनावर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करावी

२५ जुलैला गोव्याच्या बेनॉलिम बीचवर १४ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर गोव्यात महिल्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून रणकंदन माजले होते. दरम्यान मागील काही महिन्यांचा गोव्यातील महिला अत्याचारांच्या घटनाचा आलेख पाहिला तर तो उंचावत असल्याचे दिसून येते. 2021 च्या सुरुवातीपासून म्हणजेच मागील सात महिन्यांत गोव्यात महिला अत्याचाराच्या 153 घटना घडल्या आहेत.

पणजी (गोवा) - बाणावली समुद्रकिनारी 2 अल्पवयीन मुलींवर बलात्काराच्या प्रकरणावरून विधानसभेत मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी अश्या घटना घडू नये म्हणून पालकांनी आपल्या मुलांची योग्य ती काळजी घ्यावी, दरवेळी पोलिस किंवा सरकार यांवर अवलंबून राहू नये असे खेदजनक वक्तव्य केले होते. मागील काही महिन्यांचा गोव्यातील महिला अत्याचारांच्या घटनांचा आलेख पाहिला तर तो उंचावत असल्याचे दिसून येते. 2021 च्या सुरुवातीपासून म्हणजेच मागील सात महिन्यांत गोव्यात महिला अत्याचाराच्या 153 घटना घडल्या आहेत. यावर गोव्यातील पर्यटकांशी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने चर्चा केली आहे.

गोव्यातील सरकारने सक्त होत महिलांनावर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करावी

पोलिसांनी सक्त होण्याची गरज -

बाणावली समुद्रकिनारी झालेली घटना ही अत्यंत दुर्देवी आहे. त्यामुळे गोवा पोलिसांनी सक्त होण्याची गरज आहे. गोवा हे नेहमीच पर्यटकाचे आकर्षण राहिले आहे. त्यामुळे पर्यटकाच्या सुरक्षिततेसाठी कडक पावले उचलण्याची गरज आहे. तर गोव्यातील सरकारने सक्त नियम आणि कायदे करुन होत महिलांनावर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करावी. असा सुर पर्यटकांनी यावेळी काढला.

गोव्यात सात महिन्यात 153 घटना -

२५ जुलैला गोव्याच्या बेनॉलिम बीचवर १४ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक लैंगिक अत्याचाराची घटना घडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. यानंतर गोव्यात महिल्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून रणकंदन माजले होते. दरम्यान मागील काही महिन्यांचा गोव्यातील महिला अत्याचारांच्या घटनाचा आलेख पाहिला तर तो उंचावत असल्याचे दिसून येते. 2021 च्या सुरुवातीपासून म्हणजेच मागील सात महिन्यात गोव्यात महिला अत्याचाराच्या 153 घटना घडल्या आहेत.

पावसाळी अधिवेशनात रणकंदन -

बाणावली समुद्रकिनारी झालेल्या दोन अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेनंतर गोव्यातील महिला सुरक्षेची लक्तरे पार विधानसभेत मांडली गेली. बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी प्रथम पावसाळी अधिवेशनात या प्रकरणाला वाचा फोडली. नंतर विरोधकांनी यावर रणकंदन माजवले असता, मुलांच्या सुरक्षेची जबाबदारी ही त्यांच्या पालकांची असून यासाठी प्रत्येक वेळी सरकार आणि पोलिसांना जबाबदार धरू नये, असे बेजबाबदार विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत केले होते.

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी -

मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा गोव्याच्या सर्वच स्तरातून निषेध केला जातोय, त्यातच शुक्रवारी काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर मोर्चा काढून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मुख्यमंत्री सावंत यांच्या राज्यात महिला सुरक्षित नसल्याचा आरोप गोव्यातील महिलांनी केला आहे.

कोविड काळातही महिला अत्याचाराचा आलेख चढता -

गोव्यात जानेवारी 2021 पासून आतापर्यंत महिला अत्याचाराच्या तब्बल 153 प्रकरणाची नोंद झाली आहे. यामध्ये बलात्कार, विवाहितेचा हुंड्यासाठी छळ, लैंगिक अत्याचार, विनयभंग, वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणे अशा घटनांच्या गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्यापैकी 142 गुन्ह्याचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यांमध्ये सर्वाधिक 45 घटना बलात्काराचा असून 44 प्रकरणात पोलिसांनी संशयितांना अटक केली आहे. जानेवारी 2021 पासून आतापर्यंत 20 महिलांचे अपहरण झाले आहे. तर 23 महिलांची छेडछाड आणि 55 महिलांच्या विनयभंगाच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. एका विवाहित महिलेची घरगूती कारणावरून छळवणूक झाल्याचीही तक्रार नोंद करण्यात आली आहे. तर 9 महिलांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद झाली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.