ETV Bharat / bharat

Gujarat Result 2022 : राज्याचा अपमान करणाऱ्यांना गुजरातच्या जनतेने चोख उत्तर दिले - मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल

author img

By

Published : Dec 8, 2022, 1:52 PM IST

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Chief Minister Seat of Gujarat) घाटलोडिया मतदारसंघातून विजयी (Ghatlodia Assembly Seat Results 2022) झाले आहेत. भूपेंद्र पटेल यांच्या विरोधात कॉंग्रेसचे राज्यसभा खासदार अमी याज्ञिक यांनी लढत दिली होती. Ghatlodia

Ghatlodia
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल विजयी

नवी दिल्ली : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल (Chief Minister Seat of Gujarat) घाटलोडिया मतदारसंघातून विजयी (Ghatlodia Assembly Seat Results 2022) झाले आहेत. 'गुजरातच्या जनतेने भाजपसोबतच राहणार असल्याचा संदेश दिला आहे. राज्याचा अपमान करणाऱ्यांना गुजरातच्या जनतेने चोख प्रत्युत्तर दिले आहे. यापुढे गुजरातच्या प्रगतीसाठी काम करण्याचे आमचे ध्येय असेल. गुजरातमध्ये प्रचंड विजय मिळवून भाजपने नवा संदेश दिला आहे, असे वक्तव्य निवडणूक जिंकल्यानंतर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी केले.' Ghatlodia

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे स्वतः गुजरातच्या घाटलोडिया जागेवर भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत होते. दोन मुख्यमंत्र्यांना कोणती जागा दिली जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. घाटलोडियाची जागा गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबादमध्ये आल्याने तिन्ही राजकीय पक्षांनी आपली पूर्ण ताकद इथे लावली आहे. येथे काँग्रेसने भूपेंद्र पटेल यांच्या विरोधात आपल्या पक्षाचे राज्यसभा खासदार अमी याज्ञिक यांना उभे करून लढत कठीण करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जनतेने भाजपवर विश्वास व्यक्त केला. तिन्ही बाजूंनी रिंगणात उतरलेले आम आदमी पक्षाचे विजय पटेल यांना कोणताही करिष्मा दाखवता आला नाही.

मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल निवडणुकीच्या रिंगणात असल्याने अहमदाबाद जिल्ह्यातील घाटलोडिया ही जागा सर्वाधिक चर्चेत आली होती. 2008 मध्ये परिसीमनानंतर घाटलोडिया जागा अस्तित्वात आली. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत या जागेवरून भाजपच्या आनंदी बेन पटेल विजयी झाल्या आणि त्या राज्याच्या मुख्यमंत्री झाल्या. त्यानंतर 2017 च्या विधानसभा निवडणुकीत या जागेवरून विजयी झालेले भूपेंद्र पटेल हेही सतत बदलणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत सामील झाले. अशा प्रकारे येथून विजयी झालेले दोन्ही आमदार राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भूपेंद्र पटेल यांनी काँग्रेसचे उमेदवार शशिकांत पटेल यांचा एक लाख 17 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता. Ghatlodia

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.