ETV Bharat / bharat

G20 Summit : जी २० दरम्यान सायबर हल्ल्याची भिती, जाणून घ्या काय आहे भारताचा फुलप्रूफ प्लॅन

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 8:53 AM IST

G20
जी २०

G20 Summit : ९ ते १० सप्टेंबर दरम्यान जी २० नेत्यांची १८ वी शिखर परिषद भारतात होणार आहे. यासाठी देशविदेशातील नेते भारतात दाखल झाले आहेत. या नेत्यांना सायबर हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी फुलप्रूफ व्यवस्था करण्यात आलीय. जाणून घ्या याबद्दल सविस्तर..

नवी दिल्ली : नवी दिल्ली विमानतळावर जी २० शिखर परिषदेसाठी येणार्‍या जागतिक नेत्यांचं स्वागत करण्याची जबाबदारी केंद्रीय मंत्री आणि केंद्र सरकारच्या इतर वरिष्ठ अधिकार्‍यांवर सोपवण्यात आली आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी या दरम्यान संभाव्य सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी सर्व पावलं उचलली असल्याचं सांगितलं.

पाकिस्तान आणि चीनकडून सायबर हल्ल्याचा धोका : केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर युनिटच्या अधिकार्‍यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितलं की, कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम बैठकीच्या ठिकाणी सायबर सुरक्षा हाताळत आहे. तर उर्वरित शहर दिल्ली पोलिसांच्या सायबर सुरक्षा शाखेद्वारे सुरक्षित केलं जात आहे. 'पाकिस्तान आणि चीनकडून सायबर हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन सर्व संभाव्य खबरदारी घेण्यात आली आहे', असं एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. 'सरकारी एजन्सींना सध्याच्या परिस्थितीची जाणीव आहे. अशा ठिकाणी हॅकर्स नेहमीच माहिती चोरण्याचा प्रयत्न करतात', असं अधिकाऱ्यानं सांगितलं.

हॉटेल्समध्ये सायबर अलर्ट जारी : जी २० समिट दरम्यान व्हीव्हीआयपी आणि प्रतिनिधी मुक्काम करतील, अशा सर्व २० हॉटेल्समध्ये सायबर अलर्ट जारी करण्यात आलाय. सायबर पथक आयटीसी मौर्या हॉटेलमध्ये तैनात करण्यात आलं आहे. इथं अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन राहणार आहेत. इतर हॉटेल्स, जसे की, शांग्री-ला, द ललित, क्लेरिजेस, रॅडिसन ब्लू, ताज हॉटेल, प्राइड प्लाझा, विवांता बाय ताज, हॉटेल ग्रँड, राजदूत बाय ताज, इरॉस हॉटेल, द अशोका, हयात रिजेंसी, जेडब्ल्यू मॅरियट, पुलमन, रोझेट यांच्यासाठीही अशीच व्यवस्था करण्यात आली आहे.

उच्च सायबर तज्ञ आणि सुरक्षा अधिकाऱ्यांची चर्चा : याशिवाय, द लोधी, द लीला, द सूर्या, साकेत येथील शेरेटन, गुडगाव येथील ओबेरॉय, द लीला, ट्रायडेंट, इम्पीरियल, द ओबेरॉय आणि आयटीसी भारत या हॉटेल्समध्येही अशीच व्यवस्था करण्यात आलीय. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, गृह मंत्रालयात नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान हा पुढाकार घेण्यात आला. येथे जी २० शिखर परिषदेदरम्यान सायबर हल्ल्यांच्या घटनांवर उच्च सायबर तज्ञ आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी चर्चा केली.

जी २० शिखर परिषदेत झाला होता सायबर हल्ला : इथे नमूद करण्याजोगी बाब म्हणजे, २०११ मध्ये पॅरिस जी २० शिखर परिषद, २०१४ मध्ये ब्रिस्बेनमधील जी २० शिखर परिषद आणि २०१७ मधील हॅम्बर्ग जी २० शिखर परिषद देखील गंभीर सायबर हल्ल्यांना बळी पडली होती.

हेही वाचा :

  1. G20 Summit : भारत मंडपममध्ये भोजनाकरिता निमंत्रण नाही... विरोधकांची मोदी सरकारवर टीका
  2. Daksh Boopathi interview: १२ वर्षांचा दक्ष मृदंग वाजवून जी-२० परिषदेत पाहुण्यांच करणार स्वागत, पहा विशेष मुलाखत
  3. Joe Biden reach Delhi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात द्विपक्षीय चर्चा सुरू, 'या' मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.