ETV Bharat / bharat

G२० Summit : जी20 परिषदेतील दिग्गजांनी राजघाटवर महात्मा गांधींना वाहिली आदरांजली; महाराष्ट्रातील बापू कुटीची प्रतिमा दिली भेट

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 10, 2023, 12:40 PM IST

Updated : Sep 10, 2023, 12:59 PM IST

G20 Summit
दिग्गज नेत्यांनी राजघाटावर महात्मा गांधींना वाहिली आदरांजली

G२० Summit : जी20 परिषदेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजली वाहून करण्यात आली. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी सकाळी राजघाटावर महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विविध देशांच्या प्रमुखांना महाराष्ट्रातील बापू कुटीची प्रतिमा भेट दिली.

नवी दिल्ली G२० Summit : देशाच्या राजधानीत जी20 परिषदेला सुरुवात झाली आहे. जी20 परिषदेच्या दुसऱ्या दिवशी सगळ्या दिग्गज नेत्यांनी राजघाटावर महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. विविध देशांच्या दिग्गज नेत्यांनी महात्मा गांधीच्या स्मृतीस्थळावर नतमस्तक होत आदरांजली अर्पण केल्यानंतर दुसऱ्या दिवशीच्या कामकाजाला सुरुवात झाली.

राजघाटावर जमले विविध देशाचे दिग्गज नेते : दिल्लीतील राजघाटावर दिग्गज नेत्यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विविध राष्ट्रप्रमुखांनी सकाळीच राजघाटकडं कूच केली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँटोनी अल्बानिस, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रॅूडो, बांग्लादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना, रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह आदी दिग्गज नेत्यांचा समावेश होता.

  • #WATCH | G 20 in India: Prime Minister Narendra Modi, US President Joe Biden, UK PM Rishi Sunak, Australian PM Anthony Albanese, Canadian PM Justin Trudeau, Russian Foreign Minister Sergey Lavrov and other Heads of state and government and Heads of international organizations… pic.twitter.com/nmGjxJIr3s

    — ANI (@ANI) September 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • #WATCH | G 20 in India: Prime Minister Narendra Modi, US President Joe Biden, UK PM Rishi Sunak, Australian PM Anthony Albanese, Canadian PM Justin Trudeau, Russian Foreign Minister Sergey Lavrov and other Heads of state and government and Heads of international organizations at… pic.twitter.com/HP6iGlNq3h

    — ANI (@ANI) September 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

पंतप्रधान मोदींनी बापू आश्रमाची प्रतिमा दिली भेट : राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजली देण्यासाठी आलेल्या विविध देशाच्या प्रमुखांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील बापू आश्रमाची प्रतिमा भेट दिली आहे. महात्मा गांधी हे बापू कुटीत आश्रमात 1938 ते 1948 पर्यंत राहिले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बापू कुटीची प्रतिमा भेट दिल्यानं महाराष्ट्रासाठी ही अभिमानाची बाब आहे.

  • #WATCH | G 20 in India: Prime Minister Narendra Modi, US President Joe Biden, UK PM Rishi Sunak, Australian PM Anthony Albanese, Canadian PM Justin Trudeau, Premier of the People's Republic of China Li Qiang, Russian Foreign Minister Sergey Lavrov and other Heads of state and… pic.twitter.com/jKX5RnW8CV

    — ANI (@ANI) September 10, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'रघुपती राघव राजा राम' गीतानं मंत्रमुग्ध झाले पाहुणे : विविध देशांचे राष्ट्रप्रमुख राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना आदरांजलीसाठी आले होते. यावेळी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिल्यानंतर राजघाटावर रघुपती राघव राजा राम या गिताचं गुंजारव सुरु झालं. त्यामुळे राजघाटावरील सगळेच पाहुणे भारावून गेले. या पाहुण्यांना रघुपती राघव राजा राम या गितानं पाहुण्यांना मंत्रमुग्ध केलं.

जी20 परिषदेचा आजचा दुसरा दिवस : दिल्लीत सुरू असलेल्या जी 20 परिषदेचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी विविध राष्ट्रांच्या प्रमुखांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना राजघाटावर आदरांजली वाहिली. त्यानंतर आज जी20 परिषदेच्या दुसऱ्या दिवसाच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली. ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी जी20 परिषदेत ग्रीन क्लायमेट निधीसाठी 2 बिलियनची घोषणा केली आहे.

हेही वाचा :

  1. G२० Summit : जी 20 परिषदेच्या दुसऱ्या दिवसाचा अजेंडा, जाणून घ्या सविस्तर
  2. Rishi Sunak Visit Akshardham Temple : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दिली अक्षरधाम मंदिराला भेट, भक्तीभावानं केली पूजा
Last Updated :Sep 10, 2023, 12:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.