ETV Bharat / bharat

देशात पहिल्यांदाच... 205 क्राईम सीन ऑफ क्राईम ऑफिसरची कर्नाटकमध्ये होणार नियुक्ती

author img

By

Published : Jul 13, 2021, 10:05 PM IST

Updated : Jul 14, 2021, 2:34 PM IST

सीन ऑफ क्राईम ऑफिसर हे पुराव्याची ओळख, संकलन आणि जतन करण्यात विशेष प्रशिक्षित असणार आहेत. त्यांना फॉरेन्सेक सायन्स लॅबमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे.

कर्नाटक पोलीस
कर्नाटक पोलीस

बंगळुरू - पोलिसांकरिता पुरावे गोळा करून गुन्ह्यांचा तपास लावणे म्हणजे मोठे जिकिरीचे काम असते. कर्नाटकमधील पोलिसांचे हे काम सोपे होणार आहे. कारण, गुन्हा घडलेल्या ठिकाणी पुरावे गोळा करून महत्त्वपूर्ण माहिती मिळविण्याकरिता कर्नाटक सरकारने सीन ऑफ क्राईम ऑफिसरचे खास पद निर्माण केले आहे. या पदासाठी कर्नाटकमध्ये 205 पोलीस अधिकाऱ्यांच्या नियुक्ती होणार आहेत.

सीन ऑफ क्राईम ऑफिसर हे पुराव्याची ओळख, संकलन आणि जतन करण्यात विशेष प्रशिक्षित असणार आहेत. त्यांना फॉरेन्सेक सायन्स लॅबमध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये गुन्हा घडलेल्या ठिकाणी पुराव्याची ओळख पटविणे, रेकॉर्डिंग आणि पुराव्याचे संकलन याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

हेही वाचा-NEET PG 2021 exam 11 सप्टेंबरला होणार- मनसुख मांडवीय

आरोपींना लवकर अटक होणे शक्य होणार-

मुख्यमंत्री बी. एस. येडीयुराप्पा यांनी 206 अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले आहे. हे अधिकारी गुन्हा घडलेल्या ठिकाणावरून पुरावे गोळा करत फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविणार आहे. त्यामधून काही दुवा मिळत असल्यास दोषींना लवकर अटक करणे शक्य होईल. अशा अधिकाऱ्यांची नियुक्ती केवळ प्रगत देशांमध्ये करण्यात येते.

हेही वाचा-Kanwar Yatra कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुसऱ्या वर्षी रद्द

Last Updated : Jul 14, 2021, 2:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.