ETV Bharat / bharat

Happy Birthday Rekha : वयाच्या 68 व्या वर्षीही आपल्या मादक सौंदर्याने वेड लावणारी अभिनेत्री रेखा

author img

By

Published : Oct 7, 2022, 4:35 PM IST

हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री रेखाचा १० ऑक्टोबर रोजी (Even at the age of 68 actress 68) वा वाढदिवस (Happy Birthday Rekha) आहे. मात्र, या वयातही ती आपले चिरतरुण सौंदर्य (maddening with her sexy beauty) , उत्कृष्ट नृत्यकला, आणि सकारात्मक ऊर्जा टिकवुन आहे. चला तर मग रेखा यांच्या जन्मदिना निमित्य जाणुन घेऊया त्यांच्या कारकीर्दि विषयी आणि काय आहे त्यांच्या सौंदर्याचे रहस्य याबाबत.

Happy Birthday Rekha
सौंदर्याने वेड लावणारी अभिनेत्री रेखा

भानुरेखा गणेशन ऊर्फ रेखा (Happy Birthday Rekha) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री (maddening with her sexy beauty) आहे. रेखाचा जन्म १० ऑक्टोबर १९५४ साली चेन्नईत (Even at the age of 68 actress 68) झाला. तिचे वडील जेमिनी गणेशन तमिळ अभिनेते होते आणि आई पुष्पावली तेलुगू अभिनेत्री होती. मोहन सैगल यांना त्यांच्या नव्या चित्रपटासाठी नव्या मुलीची गरज होती. धीरेंद्र महाजनने रेखाची मोहन सैगल यांच्याशी ओळख करून दिली. त्यांनी विचारले, 'तुला हिंदी बोलता येते?, तुला नाच येते? ' अशा प्रकारच्या सर्वच प्रश्नांची उत्तर रेखाने नकाराने दिली. रेखाच्या आईला चिंता वाटू लागली, तिने मोहन सैगलना म्हठले, की 'हिची स्क्रीन टेस्ट घ्या'. ते म्हणाले 'काही गरज नाही, ही मुलगी माझ्या आगामी चित्रपटत काम करेल.'

'सच है' बाॅक्स ऑफीसवर यशस्वी : 'सच है'च्या सेटवरती तेच झाले, पुण्याच्या फिल्म इन्टिट्यूटमधून अभिनय शिकून आलेला चित्रपटाचा नायक नवीन निश्चल म्हणाला, 'ही काळी मद्रासीण' कुठून पकडून आणली?' पण जेव्हा सिनेमा प्रदर्शित झाला, तेव्हा एकच हंगामा झाला. नवीन निश्चल हे जीतेंद्रसारखे उछल-उछल करून नाचण्याचा प्रयत्न करीत असताना या 'काळ्या मद्रासिणी'करिता गीत गात होते. 'कान में झुमका, चाल में ठुमका, लगे पचासी झटके, हो तेरा रंग है नशीला, अंग-अंग है नशीला. सिनेमागृहात प्रेक्षकांनी पडद्यावर नाणी फेकून या 'काळ्या मद्रासण अभिनेत्रीचे स्वागत केले. आणि 'सच है' बाॅक्स ऑफीसवर यशस्वी झाला.

Happy Birthday Rekha
सौंदर्याने वेड लावणारी अभिनेत्री रेखा

1963 मध्ये चित्रपट यशस्वी : १९७१ साली, रेखाला तीन चित्रपट मिळाले. विनोद मेहराबरोबरचा 'एलान', संजय खानबरोबरचा 'हसीनों के देवता' आणि प्रेमेंद्रबरोबरचा 'साज और सनम'. १९७२ मध्ये ही संख्या पाच झाली, आणि तीही बड्या अभिनेत्यांबरोबर. गोरा और काला, गॉंव हमारा शहर तुम्हारा, एक बेचारा, रामपुर का लक्ष्मण आणि जमीन आसमान. १९७३ या वर्षी रेखाचे नऊ चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातील बहुतेक यशस्वी ठरले. बड्या हिरोंसह हृषीकेश मुखर्जींसारख्या बड्या दिग्दर्शकांबरोबरही रेखाला कामे मिळू लागली.

१८० हून अधिक सिनेमामंध्ये केले काम : रेखाने १९६६ पासून सिनेमात काम करायला सुरावात केली. रंगूला रत्नम नावाच्या तेलुगू सिनेमात तिने बालकलाकाराची भूमिका केली. १९७० मध्ये सावन भादों या चित्रपटापासून तिने मुख्य अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली. रेखा यांनी हिंदीसोबतच तामिळ, तेलगू आणि कानडी भाषेत १८० हून अधिक सिनेमामंध्ये काम केले आहे. त्यांना चित्रपट क्षेत्रात अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. 2010 मध्ये रेखाला पद्मश्री देऊन गौरविण्यात आले.

वाढत्या वयाबरोबर रेखाचे सौंदर्यही वाढत आहे. रेखा या वयातही खूप सुंदर आहे आणि आजही ती आपल्या सौंदर्याने अनेक तरुण अभिनेत्रींशी स्पर्धा करते आहे. आज रेखाच्या वाढदिवसानिमित्त तिने तिच्या सौंदर्याचे काही रहस्य सांगितले आहे. जाणुन घेऊया काय आहे तिच्या सौंदर्याचे रहस्य काय आहे ते?

Happy Birthday Rekha
सौंदर्याने वेड लावणारी अभिनेत्री रेखा

योगासने आणि व्यायाम करा : 65 पार केल्यानंतरही रेखाने स्वत:ला उत्तम प्रकारे सांभाळले आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी रेखा दररोज व्यायाम आणि योगा करते आणि रात्री 8 वाजेपर्यंत जेवण करून लवकर झोपते. चांगली झोप आणि पुरेशी झोप घेतल्याने चेहऱ्यावर चमक येते.

रेखा खूप पाणी पितात : ती दिवसभरात 10-12 ग्लास पाणी पिते. पाणी आपल्या शरीरातील सर्व घाण काढून टाकते. ज्यामुळे आपण आतून सुंदर दिसू लागतो आणि आपला चेहरा देखील चमकू लागतो. रेखा देखील असेच करते आणि हेच तिच्या चमकणाऱ्या चेहऱ्याचे रहस्य आहे.

तळलेल्या गोष्टी टाळा : यासोबतच रेखा तळलेल्या गोष्टी खाणे टाळतात. ती रोज काय खाते याबद्दल बोलताना तिने एकदा सांगितले की ती अनेकदा ताज्या भाज्या खाते, तसेच दही आणि कोशिंबीर देखील तिच्या रोजच्या आहारात समाविष्ट करते. रेखाने असेही सांगितले होते की ती भात खात नाही तर रोटी खाते.

योगासने आणि व्यायाम करा : वयाच्या 65 पार केल्यानंतरही रेखाने स्वत:ला उत्तम प्रकारे सांभाळले आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी रेखा दररोज व्यायाम आणि योगा करते आणि रात्री 8 वाजेपर्यंत जेवण करून लवकर झोपते. चांगली झोप आणि पुरेशी झोप घेतल्याने चेहऱ्यावर चमक येते.

आयुर्वेदिक स्पा उपचार घ्या : आजकालच्या मुली रोज महागड्या स्किन प्रोडक्ट्स वापरत असताना रेखा मात्र आयुर्वेदाच्या जुन्या पद्धतींचा अवलंब करतात. रेखा अरोमाथेरपी आणि आयुर्वेदिक स्पा ट्रीटमेंट घेतात असे सांगितले जाते. यासोबतच रेखा शिस्तबद्ध जीवनशैली जगतात, ज्यामुळे कितीही आजाकांचा त्रास असला तरी, त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही प्रभाव दिसत नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.