ETV Bharat / bharat

Today's Top News in Marathi : निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची बैठक; वाचा, एका क्लिकवर...

author img

By

Published : Dec 31, 2021, 6:20 AM IST

ETV Bharat Today's Top News in Marathi
आजच्या टॉप न्यूज

आज आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्यांसाठी येथे जाणून घ्या. आजच्या बातम्या, ज्यांच्यावर आपली नजर असेल आणि कालच्या महत्त्वाच्या बातम्या, ज्यांच्याबाबत तुम्हाला माहिती घ्यायला नक्की आवडेल.

  • आज दिवसभरात -
  1. GST Council Meeting : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली आज (शुक्रवारी) जीएसटी परिषदेची 46वी बैठक होणार आहे. यात जीएसटी दरांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
  2. UP School Winter Vacation: उत्तर प्रदेशच्या पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आजपासून 14 जनवरी 2022 पर्यंत हिवाळी सुट्टी मिळाली आहे. उत्तर प्रदेशच्या माध्यमिक शिक्षण परिषदेकडून हा निर्णय घेण्यात आला.
  3. शिवसेनेचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 31 डिसेंबर 1951मध्ये झाला आहे.
  4. लेखक बासुदेव दासगुप्ता यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 31 डिसेंबर 1938मध्ये झाला होता.

काल दिवसभरात -

  1. मुंबई - नवीन वर्षाचे स्वागत करायचे असेल तर जनतेने काळजी घ्यायची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्यावी. सरकारने ज्या गाईडलाईन्स घातल्या आहेत त्याचे सर्वच नागरिकानी पालन केले नाही तर लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. पोलिसांनी कारवाई करावी, असे वागू नका. ( Dilip Walse Patil on New Year Celebration ) सविस्तर वाचा -
  2. मुंबई - मुंबईत एकीकडे कोरोना विषाणूचा प्रसार वाढत असताना नवीन व्हेरिएंट असलेल्या ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. मुंबईत परदेश प्रवास केलेले १२ तर, जिनोम सिक्वेन्सिंगमधून १४१, असे एकूण १५३ ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे मुंबईमधील ओमायक्रॉन रुग्णांची संख्या २९० झाली आहे. त्यापैकी ८२ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. सविस्तर वाचा -
  3. मुंबई - महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांना कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करत त्यांनी याबाबतची माहिती दिली. ( Minister Balasaheb Thorat Tested Positive for Covid 19 ) सविस्तर वाचा -
  4. मुंबई - पत्रकारिता ही देशाचा चौथा आधारस्तंभ आहे. मात्र, सध्याची पत्रकारिता ही विचारांसह बातम्यांचे मिश्रण करणे म्हणजे हा प्रकार एक धोकादायक कॉकटेल आहे. अशाप्रकारे विचार आणि बातमीचे मिश्रण केल्याने त्यामधून पत्रकारिताचा खरा अर्थ लोकांसमोर येत नाही. पत्रकारिता करताना कोणावर अन्याय तर होणार नाही ना, याची आपण काळजी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांनी केले. मुंबई प्रेस क्लबच्या रेड इंक अवॉर्ड 2021 या दहाव्या ऑनलाईन पुरस्कार सोहळ्यात त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. ( CJI Ramana in Mumbai Press Club Award ) सविस्तर वाचा -
  5. मुंबई - राज्यात कोरोना पुन्हा फोफावला असून, आज दिवसभरात सुमारे पाच हजार 368 तर ओमायक्रॉनच्या 198 नव्या बाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड येथे ओमायक्रॉनचा पहिल्या मृत्यूची नोंद झाली ( Omicron Death In Maharashtra ) आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची डोकेदुखी वाढली आहे. सविस्तर वाचा -

वाचा आजचे राशीभविष्य -

31 December Rashi Bhavishya : 'या' राशीवाल्यांना आज कोर्टाच्या कामात यश मिळेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.