ETV Bharat / state

Home Minister On New Year : नवीन वर्षाचे स्वागत करायचे असेल तर नियम पाळा - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

author img

By

Published : Dec 31, 2021, 4:07 AM IST

सरकारचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे अवैध धंदे राहिले त्यावर निर्बध घालणे. कोरोना रुग्णांच्या बाबतीत जो अंदाज दिला जात आहे त्यानुसार वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेवटी आरोग्य विभाग आणि टास्कफोर्सच्या सल्ल्याने मुख्यमंत्री निर्णय घेत असतात, असेही गृहमंत्री म्हणाले. ( Dilip Walse Patil on New Year Celebration )

Home Minister Dilip Walse-Patil
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई - नवीन वर्षाचे स्वागत करायचे असेल तर जनतेने काळजी घ्यायची गरज आहे. प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची आणि स्वतःची काळजी घ्यावी. सरकारने ज्या गाईडलाईन्स घातल्या आहेत त्याचे सर्वच नागरिकानी पालन केले नाही तर लॉकडाऊन शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. पोलिसांनी कारवाई करावी, असे वागू नका. ( Dilip Walse Patil on New Year Celebration )

सरकारचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे अवैध धंदे राहिले त्यावर निर्बध घालणे. कोरोना रुग्णांच्या बाबतीत जो अंदाज दिला जात आहे त्यानुसार वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शेवटी आरोग्य विभाग आणि टास्कफोर्सच्या सल्ल्याने मुख्यमंत्री निर्णय घेत असतात, असेही गृहमंत्री म्हणाले.

हेही वाचा - Omicron Death In Maharashtra : भारतात ओमायक्रॉनचा पहिला बळी; पिंपरी-चिंचवडमध्ये हृदयविकाराने मृत्यू झालेल्या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह

नितेश राणेंबाबत खबरदारी -

भाजप आमदार नितेश राणे यांच्या अटकेबाबत गृहमंत्र्यांना विचारले असता, हा पोलीस तपासाचा भाग आहे. स्थानिक पोलीस परिस्थितीनुसार निर्णय घेतील. तिथले वातवरण देखील तनावपूर्वक असले तरी पोलीस खबरदारी घेत आहेत, असेही गृहमंत्री म्हणाले.

गाईडलाईन्सचे पालन करावे -

नियम प्रत्येकाने पाळले पाहिजेत. बडे नेते असतील, सामान्य माणूस असेल सर्वांनी नियम पाळले पाहिजेत. नेत्यांच्या मुलांच्या लग्न समारंभात मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते. त्यावर नेत्यांनीही याची खबरदारी घ्यावी, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले. पोलिसांना कारवाई करावी लागेल असे वागू नका. सरकारचा नेहमीच प्रयत्न राहिला आहे जे अवैध धंदे राहिले त्यावर निर्बध घालणे. गृहविभागाने ज्या गाईडलाईन्स दिल्या आहेत त्याचे पालन सर्वांनी केलं पाहिजे, असे गृहमंत्री म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.