ETV Bharat / bharat

Karnataka Assembly Election : कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभेकरिता मतदान, 13 मे रोजी होणार मतमोजणी

author img

By

Published : Mar 29, 2023, 8:59 AM IST

Updated : Mar 29, 2023, 2:10 PM IST

निवडणूक आयोगाने आज कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. कर्नाटकातील विधानसभेसाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे. राज्यात एकाच टप्यात मतदान होणार आहे.

Karnataka Assembly Election
कर्नाटक विधानसभा निवडणूक

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. निवडणूक आयोगाने आज निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले की, राज्यात बुधवारी, 10 मे रोजी मतदान होणार आहे. तर शनिवारी, 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

  • First-time voters have increased from 2018-19 by 9.17 lakhs in Karnataka. All young voters who are turning 18 years of age by April 1, will be able to vote in Karnataka Assembly elections: Chief Election Commissioner Rajiv Kumar pic.twitter.com/fNlVxVcta6

    — ANI (@ANI) March 29, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

80 वर्षांवरील लोक घरून मतदान करू शकतील : राजीव कुमार म्हणाले की, कर्नाटकात पहिल्यांदाच 80 वर्षांवरील लोक घरबसल्या मतदान करू शकणार आहेत. अधिकाधिक तरुणांना मतदान करता यावे, यावर आयोगाचा भर असल्याचेही ते म्हणाले. त्यांनी सांगितले की 1 एप्रिल 2023 पर्यंत 18 वर्षांचे तरुण देखील मतदान करू शकतात. मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, कर्नाटकमध्ये 9.17 लाख नवीन मतदार जोडले गेले आहेत. कर्नाटकातील 224 विधानसभा मतदारसंघात 5,21,73,579 नोंदणीकृत मतदार आहेत. मतदानासाठी राज्यात एकूण 58,282 मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.

2018 ची विधानसभा : कर्नाटक विधानसभेत एकूण 224 सदस्य आहेत. 2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 38.14 टक्के मते मिळाली होती. तर जेडीएसला 18.3 आणि भाजपला 36.35 टक्के मते मिळाली होती. या निवडणुकांमध्ये काँग्रेसचे 80 आणि जेडीएसचे 37 उमेदवार विजयी होऊन विधानसभेत पोहोचले होते. निवडणुकीत भाजपला 104 जागांवर यश मिळाले होते. कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने काँग्रेस आणि जेडीएसने युतीचे सरकार स्थापन केले आणि त्यानंतर जेडीएस नेते कुमारस्वामी किंग मेकर बनले होते. मात्र काँग्रेस आणि जेडीएसचे युतीचे सरकार केवळ 14 महिनेच चालू शकले. युतीच्या सुमारे 19 आमदारांनी सरकारचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस आणि जेडीएसचे युतीचे सरकार पडले आणि येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सरकार स्थापन केले.

19 जिल्ह्यांमध्ये चेकपोस्ट उभारल्या : एका अहवालानुसार, निवडणूक आयोगाने अंमली पदार्थ आणि इतर बेकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील 19 जिल्ह्यांमध्ये 171 चेकपोस्ट उभारल्या आहेत. आयोगाच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, आचारसंहिता लागू झाल्यानंतर आवश्यकतेनुसार या चेकपोस्टची संख्या वाढण्याची शक्यता आहे. सर्व जिल्हा उपायुक्तांना या चेकपोस्टवर वेबकास्टिंग सुविधांसह टेहळणी करणारे कॅमेरे बसविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

निवडणुकीदरम्यान पैशांच्या गैरवापरावर लक्ष : मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी मान्य केले होते की, कर्नाटकातील मुख्य चिंतेची बाब म्हणजे निवडणुकीदरम्यान पैशांचा गैरवापर. मार्चच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी कर्नाटकातील तयारीचा आढावा घेतला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ, महाराष्ट्र आणि गोवा येथून कर्नाटकात प्रवेश करणार्‍या राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांवर आंतरराज्य चेकपोस्ट उभारण्यात आले आहेत. येथून वाहनांच्या हालचालींवर लक्ष ठेवले जाणार आहे.

अन्य राज्यांची देखील मदत घेणार : निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, कर्नाटकचे मुख्य सचिव आणि सीईओ यांनी शेजारील राज्यांच्या पोलिस आणि इतर अंमलबजावणी संस्थांचे सहकार्य मागितले आहे. यामध्ये अंमलबजावणी संचालनालयाव्यतिरिक्त राज्य पोलीस, महसूल गुप्तचर संचालनालय, अबकारी, आयकर, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ, भारतीय तटरक्षक आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि भारतीय रिझर्व्ह बँक यासारख्या अनेक अंमलबजावणी संस्थांचा समावेश आहे.

हेही वाचा : No Confidence Motion In Lok Sabha : विरोधी पक्ष लोकसभा अध्यक्षांविरुद्ध आणणार अविश्वास प्रस्ताव? काँग्रेसकडून तयारी

Last Updated : Mar 29, 2023, 2:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.