ETV Bharat / bharat

Good Health : घरगुती उपाय करा आणि अर्धशिशीपासून दुर राहा

author img

By

Published : Oct 3, 2022, 6:49 PM IST

Updated : Oct 7, 2022, 1:03 PM IST

अर्धशिशी (stay away from Migraine) हा चेतासंस्थेचा आजार आहे. हा आजार माणसाला बेजार करुन सोडतो. जाणुन घेऊया घरगुती उपायांचा (Do home remedies) अवलंब करुन आपण यापासुन कसे बरे होऊ शकु.Good Health

Good Health
अर्धशिशीपासून दुर राहा

अर्धशिशी हा चेतासंस्थेचा (stay away from Migraine) आजार आहे. यामध्ये हलक्या ते उच्च तीव्रतेची डोकेदुखी वारंवार होत राहते. ही डोकेदुखी विशेषतः डोक्याच्या अर्ध्या भागातच होते आणि यामध्ये डोके दोन तासांपासून ते दोन दिवसांपेक्षा अधिक दिवस दुखत राहते. जेव्हा अर्धशिशीचा अटॅक येतो तेव्हा या व्याधीने ग्रस्त व्यक्तीला उजेड आणि आवाज अजिबात सहन होत नाही. वांती होणे, मळमळणे आणि कोणतेही शारीरिक काम केल्याने डोक्यातील वेदना वाढणे ही अर्धशिशीच्या आजाराची काही सामान्य लक्षणे आहेत.Good Health

यातून सुटका कशी करायची? : जर तुम्ही अनेक वर्षांपासून डोक्याचा भुगा करून टाकणाऱ्या डोके दुखीने त्रस्त आहात किंवा तुम्हाला अर्धशिशी आहे असे निदान केले गेले आहे. तर औषधोपचाराव्यतिरिक्त अनेक मार्ग आहेत ज्याने तुमच्या दुखण्यावर विजय मिळवता येईल. धमनीची शस्त्रक्रिया, स्नायूंची शस्त्रक्रिया, डोक्याच्या मागील भागांच्या मज्जातंतूंचे उद्दीपन, बोटाँक्स, बीटा-ब्लॉकर्स आणि नैराश्य घालवणारी औषधे हे काही उपचार आहेत जी अर्धशिशीच्या अटॅकला प्रतिबंध पद्धती म्हणून वापरली जातात. परंतू सावधान: या सर्व गोष्टींचे दुष्परिणाम आहेत. यातील काही उपचारांमुळे उच्च रक्तदाब, हृदयविकाराचा झटका, निद्रानाश आणि मळमळणे किंवा अन्नाचा तिटकारा या व्याधींचा धोका वाढतो.

घरगुती उपाय : (Do home remedies) योग हे प्राचीन तंत्र आहे. जे समग्र जीवन जगण्याकरिता आसने आणि श्वसन तंत्रे यांच्या संयोगाचा पुरस्कार करते. अर्धशिशीपासून आराम मिळवण्याची योग हे पूर्णपणे दुष्परिणाम रहित पद्धती आहे. खालील दिलेल्या सोप्या आसनांचा सराव दररोज केल्याने तुम्ही पुढच्या अर्धशिशीच्या अटॅकला अटकाव करण्याकरिता तयार राहाल.

तसेच, जास्त वेळ डोळ्यावर प्रकाश पडणारी उपकरणे न बघणे. म्हणजे टि. व्ही. व मोबाईलचा कमी वापर करणे, फायबर युक्त आणि प्रोटीन असलेली फळे खाणे, शक्य झाल्यास दरदोज एक सपरचंद खाणे, मॅग्नेशिअम युक्त फळे खाणे, सकाळच्या थंड हवेत बाहेर फिरणे, इत्यादी गोष्टींचे पालन केल्यास या आजाराला नेहमी होण्यापासुन आपण अटकाव घालु शकतो.Good Health

Last Updated : Oct 7, 2022, 1:03 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.