ETV Bharat / bharat

Diwali Celebration : दिवाळीत साफसफाई करताना चुकुनही करु नका 'ही' चूक, पाहा व्हिडिओ

author img

By

Published : Oct 21, 2022, 4:06 PM IST

दिवाळी (Diwali Celebration) जवळ येताच घरोघरी साफसफाई केली जाते. मात्र हे करीत असतांना कुठल्याही गोष्टीचा अतिरेक न करता, काळजी घेऊन (Do not make this mistake while cleaning in Diwali) साफ सफाई करणे गरजेचे आहे. आपली दिवाळी आनंदी व सुरक्षित साजरी (Safe Diwali Happy Diwali) करणे, ही आपली जबाबदारी आहे.

Diwali Celebration
चुकुनही करु नका ही चुक

यंदा (Diwali Celebration) दिवाळी 21 ऑक्टोबर पासून 26 ऑक्टोबरपर्यंत आहे. दिव्यांची आणि आनंदाची उधळण करणारा असा हा सण प्रत्येकाच्या आयुष्यासाठी शुभ व्हावा म्हणून, अनेक गोष्टींची तुम्ही काळजी घेतल्यास तुम्हाला फायदा होईल. वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज असा हा दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाता देशभरात साजरा होतो. दिवाळीत फराळ, सजावटीसोबतच घराची साफसफाई महत्त्वाची आहे. जाणुन घेऊया कशी करावी सुरक्षितपणे (Do not make this mistake while cleaning in Diwali) घराची साफसफाई. Safe Diwali Happy Diwali

चुकुनही करु नका ही चुक : दिवाळी म्हणटलं की, सर्वप्रथम घरातील महीलांच्या डोळ्यापूढे येते ती घरातील साफसफाई. घरातील केर काढण्यापासुन ते दारे, खिडक्या व एकुण एक गोष्ट स्वच्छ करण्यासाठी महीला दक्ष असतात. सोबतच स्वयंपाक घर आवरतांना महीलांची प्रचंड दमछाक होत असते. मात्र, हे सगळं करित असतांना महीलांनी स्वत:ची काळजी घेणे देखील तेवढेच आवश्यक आहे. परंतु, बऱ्याच ठीकाणी याच्या विपरित होतांना दिसुन येते. जसे की, विजेची उपकरणे बंद न करताच ती स्वच्छ करणे, पायात पादत्राणे न वापरता विजेच्या वस्तु हाताळणे, स्वच्छता करतांना पायाच चप्पल न घालणे, काचेच्या वस्तु योग्य प्रकारे न हाताळणे, जिवावर जोखीम ओढवुन स्वच्छता करणे, ईत्यादी अनेक गोष्टी महीलांच्या हातुन कळत-नकळत घडत असतात.

सुऱक्षित व आनंदी दिवाळी : दिवाळी हा आनंदाचा व उत्सहाचा सण आहे. तेव्हा घराची साफसफाई करतांना जर का आपण थोडी काळजी घेतली तर, आपण आपल्या कुटूंबासह सुरक्षित आणि आनंदी दिवाळी आपण साजरी करु शकताे. याशिवाय आज आपण जाणुन घेणार आहोत की, कशी करावी घराची स्वच्छता. काय करावे आणि काय करु नये.

'या' वस्तू घरात ठेवू नका : खराब वस्तू, जुने कपडे, तुटलेली भांडी, जुनी आणि साचलेली घाण, देवाच्या तुटलेल्या मूर्ती किंवा फोटो, घराच्या ईशान्य कोपऱ्यात कोणतीही धारदार किंवा तुटलेली वस्तू ठेवू नका, घरात कोणतेही हिंसक प्राणी किंवा नकारात्मक फोटो ठेवू नका.

'या' वस्तू कधी फेकू नका : जुनी नाणी, जुना झाडू, मोरपंख, शंख. दिवाळी म्हटलं म्हणजे घरी लक्ष्मीचे आगमन होणार. असं म्हटलं जातं की, 'स्वच्छता जेथे जेथे लक्ष्मी सदैव नांदे तेथे'. मग जर तुमच्या घरात सदैव लक्ष्मी नांदली पाहिजे तर चला लागा पटकन साफसफाईला. मात्र तुम्हाला माहिती आहे का? घरात दिवाळीची साफ- सफाई करताना कुठून सुरुवात करायला हवी ते? तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, कुठल्या दिशेने साफसफाई सुरु करायची ते.

'या' दिशेने सुरु करा साफसफाई : ज्योतिषशास्त्रानुसार ईशान्य कोपऱ्यापासून साफसफाई सुरुवात करणे शुभ मानले जाते. कारण वास्तूशास्त्रानुसार घरातील ईशान्य दिशा देवतांची दिशा आणि कुबेराची दिशा मानली जाते. त्यामुळे घरात दिवाळीची साफसफाई करताना ईशान्य कोपऱ्यापासून करावी.

आता 'या' दिशेची करा साफसफाई : पूर्वदिशा ही सुर्योदयाची दिशा आहे. त्यामुळे या दिशेने घरात सदैव सकारात्मक उर्जा येत असते. घरात पूजा मांडतांना सदैव ती सुरजमुखी मांडण्याची प्रथा आहे.

हा घरातील महत्त्वपूर्ण भाग : वास्तु शास्त्रानुसार घरातील मध्य भागाला ब्रम्हस्थान म्हटलं जातं. हा भाग घरातील महत्वाचा भाग मानला जातो. त्यामुळे या भागात कधीही अडगळ ठेवू नये. यासह वजनदार वस्तू जसे कि फर्निचर, कपाट अशा वस्तूही ब्रम्हस्थानावर ठेवू नये. यामुळे घरात वादविवाद होण्याच्या भीती असते.

ही गोष्ट नक्की करा : संपूर्ण साफ सफाई झाल्यावर एका भांड्यात पाणी घेऊन त्यात थोडे मीठ मिसळून घरभर शिंपडा. मीठ घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि घरातून घातक किटक काढून टाकते. Safe Diwali Happy Diwali. Diwali Celebration. Do not make this mistake while cleaning in Diwali .

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.