ETV Bharat / bharat

YouTuber Devraj Patel : 'दिल से बुरा लगता है भाई' फेम युट्यूबरचे अपघाती निधन

author img

By

Published : Jun 26, 2023, 9:40 PM IST

लोकप्रिय यूट्यूबर देवराज पटेलचे रायपूरमध्ये निधन झाले. तो एक कॉमेडी व्हिडिओ शूट करायला जात होता, तेव्हा एका ट्रकने त्याला धडक दिली. या अपघातात त्याचा मृत्यू झाला. देवराज पटेल याच्या निधनावर मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला आहे.

Devraj Patel
देवराज पटेल

रायपूर : छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये झालेल्या एका रस्ता अपघातात प्रसिद्ध यूट्यूबर देवराज पटेलचे निधन झाले. कॉमेडी व्हिडिओ शूट करायला जात असताना त्याच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. 'दिल से बुरा लगता है भाई' या डायलॉगने देवराज रातोरात सोशल मीडिया स्टार झाला होता.

  • “दिल से बुरा लगता है” से करोड़ों लोगों के बीच अपनी जगह बनाने वाले, हम सबको हंसाने वाले देवराज पटेल आज हमारे बीच से चले गए.

    इस बाल उम्र में अद्भुत प्रतिभा की क्षति बहुत दुखदायी है.

    ईश्वर उनके परिवार और चाहने वालों को यह दुःख सहने की शक्ति दे. ओम् शांति: pic.twitter.com/6kRMQ94o4v

    — Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) June 26, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

असा झाला अपघात : देवराज पटेल आणि त्याचा मित्र राकेश मनहर एक व्हिडिओ शूट करण्यासाठी दुचाकीवरून जात होते. तेव्हा पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात देवराज गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. देवराजचा मित्र राकेश मनहर याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे.

मुख्यमंत्रांनी शोक व्यक्त केला : देवराज पटेल याच्या अकाली निधनावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, 'कोट्यवधी लोकांमध्ये आपले स्थान निर्माण करून सर्वांना हसवणारे देवराज पटेल आज आपल्यातून निघून गेले. इतक्या लहान वयात या अप्रतिम प्रतिभेचे हरपणे अत्यंत वेदनादायी आहे', असे ते म्हणाले. देवराज पटेल हा भूपेश बघेल यांचा आवडता कलाकार होता. 24 ऑक्टोबर 2021 रोजी रायपूर येथे त्यांची भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी सोबत एक व्हिडिओही बनवला होता. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.

कोण होता देवराज पटेल? : छत्तीसगडचा कॉमेडी यूट्यूबर देवराज पटेल मूळचा महासमुंदचा रहिवासी होता. सध्या कॉमेडी व्हिडिओ बनवण्यासाठी तो रायपूरमध्ये राहायचा. तो मुळचा महासमुंदच्या डबपाली गावचा रहिवासी होता. त्याचे वडील घनश्याम पटेल हे शेतीचे काम करतात. देवराजचे कुटुंब अजूनही गावात आहे. या घटनेमुळे संपूर्ण छत्तीसगडमध्ये शोककळा पसरली आहे.

हे ही वाचा :

  1. Thalapathy Vijay courts controversy : ना रेडी गाण्यात धुम्रपान केल्याबद्दल थलपथी विजयवर खटला दाखल
  2. Malayalam actor Prithviraj Sukumaran injured : पृथ्वीराज सुकुमारन 'विलायथ बुद्धा'च्या शूटिंगदरम्यान कार अपघातात जखमी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.